Farm Mechanization

शेतकरी आता शेतामध्ये यंत्राचा उपयोग मोठ्या प्रमाणात करीत आहेत. कारण यंत्राच्या वापरामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा या दोन्हींची बचत चांगल्या प्रकारे होते.तसेच उत्पन्नातही वाढ होताना दिसत आहे. सरकारही विविध यांत्रिकीकरण योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. याच सरकारी योजनांचा भाग म्हणून महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने कृषी यांत्रिकीकरण उप अभियानाच्यामाध्यमातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पावर टिलर,शेतीमधील अवजारे इत्यादी यंत्र साठी अनुदान उपलब्ध करून देत असते. या लेखात आपण कृषी यांत्रिकीकरण उप अभियाना साठी अर्ज कूठे करायचा? वगैरे बाबींसंबंधी ची इतंभूत माहिती घेणार आहोत.

Updated on 08 September, 2021 12:18 PM IST

 या योजनेसाठी अर्ज कोठे करायचा?

 शेतकऱ्यांना जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकरी https://madbtmahait.gov.in/या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करणे आवश्यक आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांची निवडी लॉटरी पद्धतीने करण्यात येते तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, महिला शेतकरी यांना प्राधान्य देण्यात येते.

 या योजने साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदार शेतकऱ्याकडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार शेतकऱ्याकडे जमिनीचा सातबारा उतारा असणे आवश्यक.
  • 8अ चा उतारा असणे आवश्यक.
  • शतकरी जर अनुसूचित जाती, जमातीमधील असेल तर जातीचा दाखला अनिवार्य आहे.
  • जर एखाद्या अर्जदाराने या योजनेच्या माध्यमातून लाभ घेतला असेल तर पुढील दहा वर्ष संबंधित अर्जदाराला अर्ज करता येत नाही.
  • ज्या यंत्राची खरेदी करायची आहे त्याचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल
  • पूर्व संमती पत्र

 कृषी यांत्रिकीकरण उप अभियानाच्या माध्यमातून मिळणारे अवजारे

  • ट्रॅक्टर
  • पावर टिलर
  • बैलचलित यंत्र आणि अवजारे
  • मनुष्य चलित यंत्र आणि अवजारे
  • प्रक्रिया संच
  • पिकांच्या काढणीपश्‍चात तंत्रज्ञान
  • फलोत्पादन यंत्रे व अवजारे
  • स्वयंचलित यंत्र

 या योजनेसाठी अर्ज कसा करावा?

 कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत पेट्रोलचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी सगळ्यात अगोदर https://mahadbtmahait.gov.inया संकेत स्थळाला भेट देणे आवश्यक आहे. त्यानंतर शेतकरी योजना या पर्यायावर क्लिक करून पुढे कृषी यांत्रिकीकरण उप अभियान योजना निवडावी. महाडीबीटी पोर्टल वर नवीन नोंदणी करीत असाल तर नवीन वापरकर्ता नोंदणी वर क्लिक करावे व तुमचे नाव, युजरनेम आणि पासवर्ड टाकून महाडीबीटी वर लॉगीन तयार करावे. लॉगिन झाल्यानंतर संबंधित अर्ज भरावा लागतो.  लोगिन केल्यानंतर आधार कार्ड क्रमांक टाकून आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. 

शेतकऱ्यांनी वैयक्तिक माहिती व शेतजमिनीची माहिती भरा. लोगिन केल्यानंतर शेतकऱ्यांनी पुढील माहिती भरून एकाच आधारे विविध योजनेचा लाभ घेता येतो. या विविध पर्याय मधून कृषी यांत्रिकीकरण पर्याय निवडून पुढे जावे.नंतर शेतकऱ्यांनी कृषी यंत्रांच्या खरेदीसाठी असलेला पर्याय निवडावा. सर्व माहिती भरुन अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करावे. अर्ज सादर केल्यानंतर प्राधान्य क्रमांक निवडावा व त्यानंतर अर्जाची फी भरावी व संबंधित कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावीत.

English Summary: krushi yantrikikaran upabhiyaan yojna krushi yantra
Published on: 08 September 2021, 12:18 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)