Farm Mechanization

शेतीची बहुतेक कामे आता ट्रॅक्टरवर अवलंबून आहेत. पण ट्रॅक्टर खरेदी करताना काही तांत्रिक बाबींची माहिती असणं गरजेचे असते. आपल्या शेतीच्या कामासाठी कोणत्याप्रकारचे ट्रॅक्टर फायद्याचे राहिल किंवा राहणार नाही याची माहिती असणं आवश्यक आहे.

Updated on 12 May, 2020 3:07 PM IST


शेतीची बहुतेक कामे आता ट्रॅक्टरवर अवलंबून आहेत. पण ट्रॅक्टर खरेदी करताना काही तांत्रिक बाबींची माहिती असणं गरजेचे असते. आपल्या शेतीच्या कामासाठी कोणत्याप्रकारचे ट्रॅक्टर फायद्याचे राहिल किंवा राहणार नाही याची माहिती असणं आवश्यक आहे. आपण आज त्याविषयी माहिती घेणार आहोत.  तर आपल्याकडे साधारण ५ ते १० एकर जमीन आहे तर आपल्याकजे ३५ ते ४० एचपीचा ट्रॅक्टर हवा. जे शेतकरी वर्षातून फक्त दोनदाच ट्रॅक्टरचा शेतीसाठी उपयोग करतात त्यांच्यासाठी कोणता ट्रॅक्टर योग्य राहिल त्याविषयीही आम्ही आपणांस सांगत आहोत.

दोनदा वापरल्यानंतर ट्रॅक्टरचा उपयोग होत नसेल तर त्यापासून पैसा कसा कमावता येईल याचा विचार केला गेला हवा. छोट्या पाड्यावर गिरणी नसते तर आपण ट्रॅक्टरच्या पाठी जर गिरणीची चाके बसवली तर पाड्यावर जाऊन आपण हंगामी पिठाच्या गिरणी व्यवसाय सुरू करु शकता. याचप्रकारे घास आणि बाजरीच्या पिकांचा भूसा बनिण्यासाठी मशीन कुट्टा ट्रॅक्टरवर लावू शकतो. हे मशीन चालविण्यासाठी ४० एचपी चे ट्रॅक्टर हवे असते. साधरण शेतकरी वापरत असलेल्या ट्रॅक्टरविषयी हे ट्रॅक्टर रस्ते आणि खोदकामासाठी वापरतात. हाइड्रोलिक लावू शकतो.

शेतीच्या कामाशिवाय इतर कामेही काही शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने करत  असतात. शेतात खोदाई करून, ते एका ठिकाणी गोळा करणे, जर मजुरांचा अभाव असल्यास खते ट्रॉलीमध्ये भरण्यासाठी हाइड्रोलिकने केली जातात. ट्रॅक्टरमध्ये अधिक जड साधने लावण्यासाठी ६० ते ७० एचपीच्या ट्रॅक्टर हवे.  जमीन समान सपाट करण्यासाठी सूपाचा वापर होत असतो. जमिन खोदून विजेचे खांब गाडणे, या कामांसाठी साधरण ५० ते ५५ एचपीच्या ट्रॅक्टर असणे आवश्यक असते. शेतीसह इतर कामांकरिता जे शेतकरी ट्रॅक्टरचा उपयोग करतात. त्याविषयी आपण जाणून घेऊ. शेतातील खोदकाम करणे, खते ट्रॉलीमध्ये भरणे, मनुष्यबळ कमी असल्यास हाइड्रोलिक सिस्टमने  ट्रॉलीमध्ये वस्तू भरल्या जातात. तसेच अधिक मोठे जड साधने ट्रॅक्टरला जोडण्यासाठी ६० ते ७० एचपीचे ट्रॅक्टरचा उपयोग  करावा. देशातील अनेक अशा कंपन्या आहेत ज्या शेतकऱ्यांच्या गरजेनुसार ट्रॅक्टर बनवतात.

English Summary: know the which tractor best for farm work
Published on: 12 May 2020, 03:01 IST