डॉ. तुळशिदास बास्टेवाड, प्रा. एम. एम. पाचारणे
शेतीमध्ये विविध शेती कामाचे यांत्रिकीकरण करणे गरजेचे आहे. अशा यांत्रिकीकरणाने शेतीची कामे वेळचीवेळी होऊन उत्पन्नामध्ये वाढ होते. फक्त मोठया शेतकऱ्यांनाच यांत्रिकीकरणाचा फायदा होऊ शकतो असा एक गैरसमज शेतकऱ्यांमध्ये असल्याचे दिसून येते. शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न येण्यासाठी ज्या कमाल गरजा आहेत त्या म्हणजे पेरणीपुर्व शेतीची मशागत, वेळेवर पेरणी आणि बियांची योग्य खोलीवर पेरणी, पाणी किटकनाशक आणि खत व्यवस्थापन, पीक काढणी व मळणी मध्ये कमीत कमी नासधूस आणि वेळेत शेतीची कामे पूर्ण करणे. यासारख्या गोष्टी केवळ यांत्रिकीकरणामुळे शक्य होतात.
शेती कामासाठी पशुशक्ती व मनुष्य शक्तीचा वापर यापुढेही चालू राहणार आहे. परंतु या शक्ती वेळेवर शेतीची कामे पूर्ण करण्यासाठी पुरेशा नाहीत. यासाठी योग्य सुधारीत शेती अवजारे वापरणे गरजेचे आहे. सदर लेखाव्दारे महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसीत केलेली सुधारित कृषि अवजारे व त्यांचा वापर आणि उपयुक्तता याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे. ही माहिती शेतकऱ्यांना दैनंदिन शेती कामामध्ये सुधारित अवजारांचा वापर करतांना निश्चितच उपयुक्त ठरणारी असून त्यांचे उत्पादन खर्च कमी होऊन एकूण उत्पन्नात वाढ होण्यासाठी फायद्याची ठरेल.
ट्रॅक्टरचलित ज्योती बहुपिक टोकण यंत्र ठळक वैशिष्टयेः
*भुईमुग, सुर्यफुल, करडई, सोयाबीन, ज्वारी, मका, गहू,हरभरा, तुर इ. पिकांची टोकण करण्यासाठी तसेच दाणेदार खत पेरणीसाठी
*पिकांच्या दोन ओळीतील अंतर २२.५, ३० किंवा ४५ से.मी. राखता येते.
*दोन ओळीतील अंतराप्रमाणे फणांची संख्या ५ ते ९ ठेवता येते.
*३५ व त्यापेक्षा जास्त अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते
*या यंत्राची प्रक्षेत्रीय कार्यक्षमता ३.० ते ३.५ हेक्टर प्रति दिवस इतकी आहे.
ट्रॅक्टरचलित फुले बंदिस्त वाफे तयार करणारे अवजार
ठळक वैशिष्टयेः
*३५ व त्यापेक्षा जास्त अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते
*एका दिवसात ४.०० ते ४.५० हेक्टर क्षेत्रावर बंदिस्त वाफे तयार करता येतात.
*रब्बी ज्वारीसाठी जमीनीत पावसाचे पाणि मुरविण्यासाठी ६ मि x २ मि आकाराचे बंदिस्त वाफे तयार करता येतात.
ट्रॅक्टरचलित फुले मोल नांगर
ठळक वैशिष्टयेः
*६० व त्यापेक्षा जास्त अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते
*क्षारपड व पाणथळ जमिनीतील अतिरिक्त पाण्याच्या व क्षारांच्या निचरा करण्यासाठी उपयुक्त.
*मोल नांगराध्दारे दोन मोलमध्ये ४ मिटर अंतर ठेवलयास एका दिवसात २.५० हेक्टर क्षेत्रावर मोल निचरा पध्दत तयार करता येते.
ट्रॅक्टरचलित फुले ऊस रोपे पुर्नलागवड यंत्र
ठळक वैशिष्टयेः
*४५ व त्यापेक्षा जास्त अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते.
*१२० सें.मी. ते १५० सें. मी. दोन ओळीतील अंतरावर ऊस रोपांची पुनर्लागवड करण्यासाठी उपयुक्त
*एका दिवसात २.७५ ते ३.०० हेक्टर क्षेत्रावर ऊस रोपांची पुर्नलागवड शक्य.
*पारंपारिक पध्दतीपेक्षा खर्चात ६० ते ७० टक्के बचतहोते
*पारंपारिक पध्दतापेक्षा वेळेत ७० ते ८० टक्के वेळेची बचत
ट्रॅक्टरचलित फुले हायड्रो मेकॅनिक नियंत्रित तण काढणी यंत्र
ठळक वैशिष्टयेः
*३५ व त्यापेक्षा जास्त अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते.
*दोन झाडांच्या मधलया जागेतील किंवा दोन ओळीमधील तण काढण्यासाठी उपयुक्त.
*रोटरी युनीट दोन झाडांच्या मध्ये व बाहेर हायडो- मेकॅनिकल यंत्रनेद्वारे सहजपणे कार्य करते.
*एका तासामध्ये ०. १६ हेक्टर क्षेत्रावरील तण काढणी करता येते.
*या यंत्राच्या वापरामुळे पारंपारिक पध्दतीपेक्षा खर्चामध्ये डाळींब बागेत ४४ टक्के व द्राक्ष बागेत ३७ टक्के बचत होते.
ट्रॅक्टरचलित फुले कुटटी यंत्र
ठळक वैशिष्टयेः
*३५ व त्यापेक्षा जास्त अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते
*फळबागेतील छाटणी नंतर पडणा-या अवशेषांची कुटी करून बेडवर दोन्ही बाजुस समांतर टाकण्याकरीता उपयुक्त. उदा- द्राक्षे
*अवशेषांची कुटटी करण्याकरीता ट्रॅक्टरच्या पी टी ओशक्तीचा वापर केला आहे तर कुटटी केलेलया अवशेषांची बेडवर दोन्ही बाजुस समांतर टाकण्याकरीता हायड्रोलिक शक्तीचा वापर केलेला आहे.
*प्रक्षेत्रीय क्षमता ७८ टक्के
*एका तासात ०.४७ हेक्टर क्षेत्रावर अवशेषांची कुटटी करून टाकते.
*पारंपारिक पध्दतीपेक्षा खर्चामध्ये ७२ टक्के बचत.
ट्रॅक्टरचलित फुले हायड्रो मेकॅनिक नियंत्रित फळबाग ऑफसेट व्यवस्थापन यंत्र
ठळक वैशिष्टयेः
*३५ व त्यापेक्षा जास्त अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते.
* फळबागेतील झाडांना कोणतीही इजा न होता
*एकाच वेळी फळबागेतील जारवा तसेच वरंबा फोडण्यासाठी उपयुक्त.
*पारंपारिक पध्दतीपेक्षा खर्चात ४८ टक्के बचत.
*प्रक्षेत्रीय कार्यक्षमता ०.७२ टक्के आहे.
ट्रॅक्टरचलित फुले अॅटोमॅटिक पल्टी नांगर
ठळक वैशिष्टयेः
*४५ व त्यापेक्षा जास्त अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरनेचालवता येते.
*नांगरणी करतांना कष्ट कमी करन वेळ वाचविण्याकरीता हे यंत्र उपयुक्त आहे.
*या नांगरांची प्रक्षेत्रीय कार्यक्षमता ८० टक्के इतकी आहे.
*या नांगरासाठी हायड्रोलिक नांगरापेक्षा देखभाल व दुरुस्तीचा खर्च कमी येतो.
*या नांगराची किंमत हायड्रोलिक नांगरापेक्षा १५ ते २० टक्के कमी आहे.
ट्रॅक्टरचलितफुले दोन ओळीमध्ये चालणारा फॉरवर्ड रिव्हर्स रोटाव्हेटर
ठळक वैशिष्टयेः
*४५ व त्यापेक्षा जास्त अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालवता येते.
*हा रोटाव्हेटर जेव्हा पुढील दिशेने चालतो त्यावेळी आंतरमशागत होते तर विरुध्द दिशेने चालविलयास पिकास भर लावण्याचे काम होते. पिकांच्या दोन ओळीतील अंतरानुसार रुंदी समायोजित करता येते.
*या यंत्राने एका तासामध्ये ०.८४ हेक्टर क्षेत्रावरील आंतरमशागत / भर लावणे हि कामे केली जातात.
*पारंपारिक पध्दतीपेक्षा खर्चामध्ये ६२ टक्के बचत.
ट्रॅक्टरचलित फुले सेंद्रिय भर खते देण्याचे यंत्र
ठळक वैशिष्टये-
* ३० अश्वशक्तीव त्यापेक्षा जास्त ट्रॅक्टरने चालवता येते.
* फळबागेला सेंद्रिय खते देण्यासाठी उपयुक्त • खते देण्याचा दर कमी जास्त करता येतो
* प्रभावी क्षेत्रीय कार्यक्षमता ०.३३ हे. प्रति तास आणि प्रक्षेत्रीय कार्यक्षमता ८१ टक्के आहे
* पारंपारिक पध्दतीपेक्षा खर्चात ६८ टक्के बचत.
* या यंत्राच्या वापरामुळे मजुराची, श्रमाची वेळेची बचत होते.
ट्रॅक्टरचलित फुले केळी खोड कुटटी यंत्र
ठळक वैशिष्टये
*४५ व त्यापेक्षा जास्त अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते.
*केळीचे खोड शेतामध्ये कुटटी करण्यासाठी उपयुक्त.
* केळीच्या खोडाचे बारीक तुकडे केलयामुळे सेंद्रीय खत तसेच आच्छादन तयार होते.
*प्रक्षेत्रीय कार्यक्षमता ०.२० हे. प्रति तास आहे.
*या यंत्राच्या वापरामुळे मजुराची, श्रमाची वेळेची बचत होते.
ट्रॅक्टरचलित फुले ऊस पाने काढणी व कुटटी यंत्र
ठळक वैशिष्टयेः
*१८ ते २८ अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते.
*उभ्या उसाची पाने काढण्यासाठी उपयुक्त.
*उसाची पाने काढून त्याची कुटटी करुन टाकलयामुळे त्याचा उपयोग आच्छादान म्हणुन तसेच कंपोस्ट म्हणून देखील होतो.
*पिकांच्या वाढीसाठी पोषक हवा व सूर्यप्रकाश मिळतो
*एका तासात ०.३१ हेक्टर क्षेत्रावरील ऊसाचा पाला काढून कुटट्टी करते.
* प्रक्षेत्रीय कार्यक्षमता ८२ टक्के आहे
विद्युत मोटारचलीत फुले औषधी वनस्पती बीया कवच फोडणी यंत्र
ठळक वैशिष्टयेः
*या यंत्राद्वारे हिरडा, बेहडा व रिठा या औषधी वनस्पतींच्या फळांचे कवच फोडता येते.
*एक अश्वशक्ती सिंगल फेज विद्युत मोटारचलित यंत्र
*कार्यक्षमता १२५ ते १५० किलो प्रति तास
विद्युत मोटारचलीत फुले कडबा कुटी यंत्र
ठळक वैशिष्टयेः
*लहान व मध्यम शेतक-यासाठी विद्युत चलित कडबा कुटी यंत्र.
* सिंगल फेज एक अश्वशक्ती विद्युत मोटार चलित यंत्र.
*ओला चारा तसेच कोरडा चारा कुटटी करण्यासाठी उपयुक्त.
*ओला चारा कुटटी करण्याची कार्यक्षमता
*ज्वारी : ८६ टक्के मकाः ८५ टक्के ऊसः ९२ टक्के
*कोरडा चारा कुट्टी करण्याची कार्यक्षमता
*ज्वारीः ८६ टक्के मकाः ८१ टक्के
विद्युत मोटारचलीत फुले ऊस बेणे तोडणी यंत्र
ठळक वैशिष्टयेः
*एक अश्वशक्तीच्या व सिंगल फेज विद्युत मोटार चलीत यंत्र
*एका तासात ५००० ते ६००० ऊस बेणे तयार करता येते
*पारंपारीक पध्दतीपेक्षा खर्चामध्ये ८० ते ८५ टक्के बचत
*पारंपारीक पध्दतीपेक्षा वेळेमध्ये ८५ ते ९५ टक्के बचत
*ऊस रोपवाटीकेसाठी ४० ते ७० सें.मी. लांबीचे ऊस बेणे तयार करण्यासाठी उपयुक्त
विद्युत मोटारचलीत फुले भुईमुग शेंगा फोडणीव प्रतवारी यंत्र
ठळक वैशिष्टये-
*सिंगल फेज एक अश्वशक्ती विद्युत मोटार चलित यंत्र.
* शेगा फोडणे तसेचशेंगदाणे, फुटके शेंगदाणे, शेंगा आणि टरफले वेगळे करण्यासाठी उपयुक्त
*शेंगा फोडणी कार्यक्षमता ९४ टक्के
*या यंत्राने एका तासात ६४ किलो भुईमुग शेंगा फोडणी तसेच प्रतवारी करता येते.
*या यंत्राच्या वापरामुळे मजुराची, श्रमाची वेळेची बचत होते.
मनुष्यचलित फुले शेवगा काढणी झेला
ठळक वैशिष्टयेः
*देठासहित शेंगा तोडणी करता येते.
*शेंगाला इजा होत नाही.
*शेवग्याच्या झाडाच्या शेंगा काढण्यासाठी
*मनुष्यचलित फुले ज्वारी काढणी यंत्र उपयुक्त.
*टेलिस्कोपिक पाईपमुळे झेलयाची उंची कमी जास्त करता येते.
मनुष्यचलित फुले ज्वारी काढणी यंत्र
ठळक वैशिष्टयेः
*या अवजाराचा उपयोग ज्वारीचे ताट मुळासहित काढण्यासाठी होतो.
*या यंत्राद्वारे एका दिवसात ८ ते १० गुंठे ज्वारीच्या ताटाची काढणी सुलभरित्या करता येते.
लेखक - डॉ. तुळशिदास बास्टेवाड, प्रा. एम. एम. पाचारणे, अखिल भारतीय समन्वित कृषि अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर (महाराष्ट्र)
Published on: 09 October 2023, 05:23 IST