आता शेती आणि यांत्रिकीकरण या एकमेकांची पूरक अशा गोष्टी आहेत. यांत्रिकीकरणा शिवाय शेती शक्यच नाही. आता शेतकरी शेतामध्ये विविध प्रकारच्या कामांसाठी विविध प्रकारची यंत्रे वापरू लागले आहेत. परंतु या सगळे यंत्रांमध्ये ट्रॅक्टर हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. परंतु ट्रॅक्टर घेणे सगळ्या शेतकऱ्यांना शक्य होते असे नाही.
परंतु आता स्टेट बँक ऑफ इंडिया च्या मदतीने ट्रॅक्टर घेणे शेतकऱ्यांना सोपे होईल. या लेखात आपण याबद्दल माहिती घेणार आहोत.
भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआय तात्काळ ट्रॅक्टर लोन च्या मदतीने ट्रॅक्टरच्या किमतीचे शंभर टक्के पर्यंत विमा आणि रजिस्ट्रेशन फीसह एसबीआय कडून कर्ज घेतले जाऊ शकते.
कर्ज फेडण्यासाठीची मुदत
एसबीआय तत्काळ ट्रॅक्टर कृषी मुदतीचे कर्ज आहे. इन्शुरन्स आणि रजिस्ट्रेशन फीसह ट्रॅक्टरच्या किमतीच्या शंभर टक्के पर्यंत कर्ज म्हणून घेता येते. यामध्ये ॲक्सेसरीज च्या किमती चा समावेश होणार नाही. कर्जाची परतफेड अठ्ठेचाळीस ते 60 महिन्यात होऊ शकते.
बँकेने वित्तपुरवठा केलेले ट्रॅक्टर मध्ये सर्वसमावेशक विमा असतो.
यामध्ये असलेला मार्जिन -25/40/50 टक्के( चालान + विमा + नोंदणी) ट्रॅक्टर च्या किमती ची रक्कम शून्य दाराच्या टीडीआर मध्ये जमा करावी.
कर्ज घेण्यासाठी पात्रता
- कर्ज घेणाराकडे किमान दोन एकर जमीन असावी.
- असे सर्व शेतकरी जे वैयक्तिक किंवा संयुक्त कर्जदार जे स्वतः शेतकरी आहेत.
- कर्जामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया द्वारा निर्दिष्ट केलेल्या नातेवाईकांच्या यादीतील नातेवाईक सह अर्जदार होऊ शकतात.
या कर्जावरील व्याजदर आणि प्रक्रिया शुल्क
कर्जाच्या रकमेतून टीडीआरची रक्कम वजा केल्यानंतर शिल्लक असलेली रक्कम व त्यावरील व्याज खालील प्रमाणे असेल.
- मार्जिन 25% : एक वर्षाचा MCLR+3.25 टक्के a.अर्थात 10.25 टक्के
- मार्जिन 40% : एक वर्षाचा MCLR+3.10 टक्के a.अर्थात 10.10 टक्के
- मार्जिन 50% : एक वर्ष MCLR+3.00 टक्के a. म्हणजे दहा टक्के
प्रारंभिक शुल्क म्हणून कर्जाच्या रकमेच्या 0.50 टक्के प्रक्रिया शुल्क आहे.
या साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
- व्यवस्थित भरलेला अर्ज
- एखाद्या प्रतिष्ठित व्यापाऱ्याकडून ट्रॅक्टर चे कोटेशन
- ओळखीचा पुरावा म्हणून मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी.
- पत्त्याचा पुरावा म्हणून मतदार ओळखपत्र, पासपोर्ट किंवा आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स
- शेतजमीन / लागवडीचा पुरावा
- पोस्ट डेटेड चेक/इसीस
( साभार-MHlive24.com)
Published on: 05 October 2021, 10:40 IST