Farm Mechanization

शेतात कमी पाण्याचा वापर करुन अधिक उत्पन्न व्हावे यासाठी शेतकरी सूक्ष्म सिंचनाचा अवलंब करतात. परंतु, आपण इतके प्रगत झालो आहे कि ऊसासारख्या पिकातही ठिंबक सिंचनाचा वापर होताना आपण पाहू शकतो.

Updated on 25 August, 2020 11:11 PM IST


शेतात कमी पाण्याचा वापर करुन अधिक उत्पन्न व्हावे यासाठी शेतकरी सूक्ष्म सिंचनाचा अवलंब करतात. परंतु, आपण इतके प्रगत झालो आहे कि ऊसासारख्या पिकातही ठिंबक सिंचनाचा वापर होताना आपण पाहू शकतो.  दरम्यान बळीराजा मोठ्या प्रमाणात ठिंबक सिंचनाचा उपयोग करत आहेत. पण या लेखात संचाची काळजी व देखभाल कशी करायची याची माहिती घेणार आहोत.  जेणेकरून वेळेची, वीजेची बचत होते व उपकरण, जीवनमान बदलत आहे.

पंपाच्या पुढेच एक पाणी मोजण्याचे मशीन (वॉटर मीटर) बसवावे. पाण्याचा दाब प्रमाणापेक्षा कमी अधिक झाल्यास पंप तपासून त्याची अडचण काय आहे. पाहावी व दुरुस्ती करावी. दर दोन किंवा तीन दिवसांनी पंपाचा आवाज, त्याचे तापमान, गळती तपासावी. विद्युत मोटार, स्विचेस, मीटर व स्टार्टर यांची उत्पादकाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार निगा ठेवावी.

ठिबक सिंचन संचाच्या गाळण यंत्रणेची देखभाल:

अ) स्क्रीन फिल्टर (जाळीची गाळणी) ची स्वच्छता :

  • ठिबक सिंचन पाण्याच्या गाळणीसाठी स्क्रीन फिल्टर वापरतात. सामान्यत: १२० मेश (०.१३ मिमी) आकाराच्या छिद्रांची जाळी वापरली जाते.
  • पहिले संच बंद करून स्क्रीन फिल्टर दाब विरहीत करावा.
  • फिल्टरचे बाहेरील भाग खोलून फिल्टरची जाळी वेगळी करावी व स्वच्छ पाण्याने साफ करावी.
  • रबर सील जाळी पासून काढून आवश्यकता वाटत असल्यास नवीन बसवून सील नीट असल्याची पाहणी करा.
  • फिल्टर च्या तळाशी असलेल्या हॉल्व्हचा उपयोग करून जाळी भोवतीची घाण काढून टाकावी.

 

ब) सँड/ ग्रॅव्हेल फिल्टरची स्वच्छता:

धरणे, नद्या, कालवे यांतील पाण्यातून येणारे शेवाळ, सेंद्रिय पदार्थ व कचरा वेगळा करण्यासाठी सँड/ ग्रॅव्हेल फिल्टरचा उपयोग होतो. ग्रॅव्हेल फिल्टरच्या अगोदर व पूढे असे २ दाबमापक यंत्रे (प्रेशर गेज) बसवलेले असतात. दाबमापक यंत्रातील पाण्याच्या दाबाचे १० टक्क्यापेक्षा जास्त पतन झाल्यास ग्रॅव्हेल फिल्टर स्वच्छ करावे, किंवा सात दिवसामध्ये एकदा तरी साफ करावे. याची स्वच्छता करताना बॅक फ्लशिंग (विरुध्द प्रवाह) तंत्राचा वापर करतात. याद्वारे पाण्याचा प्रवाह विरुध्द उलट दिशेने करून फिल्टर स्वच्छ केले जाते ते पुढीलप्रमाणे :

सिंचनप्रणाली चालू असताना बायपास हॉल्व्ह पूर्णपणे उघडा करून बॅक फ्लशिंग हॉल्व्ह पूर्णपणे चालू करावा.

  • मुख्य कंट्रोल हॉल्व्ह व आऊटलेट हॉल्व्ह पूर्णपणे बंद केला याची खात्री करा.
  • फ्लशिंग करते वेळी बायपास हॉल्व्ह पूर्णता : बंद करून सिंचन प्रणालीचा दाब सामान्य दाबापेक्षा ३० टक्के जास्त करावा.
  • बॅक फ्लश हॉल्व्हमधून स्वच्छ पाणी येईपर्यंत पंप चालू ठेवावा. स्वच्छ पाणी आल्यानंतर पंप बंद करावा.

क) हायड्रोसायक्लोन फिल्टरची स्वच्छता:

या फिल्टरचा उपयोग मुख्यत: सिंचनाच्या पाण्यातील वाळूचे कण वेगळे करण्यासाठी होतो. हा फिल्टर नरसाळ्याचा आकाराचा असतो, त्याचा कमी भाग तळाशी एका आडव्या टाकीला जोडलेला असतो. टाकी मध्ये पाण्यातून वेगळी काढलेली वाळू गोळा होते. टाकीला असलेला हॉल्व्ह उघडून जमा झालेली वाळू खाली करूंन घ्या.

ड) डिस्क फिल्टरची स्वच्छता:

  • या फिल्टरचा उपयोग जास्त करून सिंचनाच्या पाण्यातून घन कण काढून टाकण्यासाठी होतो.
  • डिस्क फिल्टर उघडून सर्व प्लेट मोकळ्या कराव्यात व एका दोरीत बांधून घेऊन स्वच्छ पाण्यात धुवून घ्या.
  • मोठ्या बादलीत १० टक्के तीव्रतेचे हायड्रोक्लोरिक अॅसिड अथवा हायड्रोजन परॉक्साईडच्या द्रावणात या चकत्या साधारणपणे अर्धा तास किंवा दोन तास बुडवून ठेवून स्वच्छ धुवून घ्याव्यात.
  • सर्व चकत्या अगोदर होत्या त्या स्थितीत ठेवून फिल्टरची जोडणी करा.

आम्ल प्रक्रिया:

लॅटरल व ड्रीपमध्ये साचलेले क्षार जसे कॅल्शिअम कार्बोनेट, मॅग्नेशिअम कार्बोनेट, किंवा फेरीक ऑक्साइड ठिबक सिंचन संचाचे कार्य मंदावतात अथवा बंद पडतात. हे जमा झालेले क्षार स्वच्छ करण्यासाठी आम्ल प्रक्रिया करतात. त्यासाठी सल्फुरिक आम्ल (६५ टक्के), हायड्रोक्लोरिक आम्ल (३६ टक्के), नायट्रिक आम्ल (६० टक्के) किंवा फॉस्फेरिक आम्ल (८५ टक्के) यापैकी कुठलेही उपलब्ध होणारे आम्ल वापरू शकतो.

आम्ल द्रावण तयार करण्याची पध्दती : 

  • एका प्लॅस्टिकच्या बादलीमध्ये एक लिटर पाणी घेऊन, त्यात आम्ल (अॅसिड) मिश्रण करून घ्या.
  • आम्ल मिसळताना मधेमध्ये पाण्याचा सामू पीएच मीटरने किवा लिटमस पेपरने मोजान घ्या.
  • पाण्याचा सामू ३ ते ४ होईपर्यंत (लिटमस पेपर चा रंग फिकट गुलाबी होईपर्यंत) पाण्यात आम्ल मिसळत जावे.
  • पाण्याचा सामू ३ ते ४ करण्यासाठी किती आम्ल लागले हे कायम लक्षात ठेवावे.
  • पंप चालू केल्यानंतर संचाच्या शेवटच्या ड्रीपर पर्यंत पाणी पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो याची नोंद घ्यावी. साधारणत: २० मिनिटे वेळ लागतो असे गृहीत धरू.

संचातून पाणी वाहण्याचा दर लक्षात घेऊन २० मिनिटात त्या संचामधून किती पाणी जाते व गणित करून घ्या.

क्लोरीन प्रक्रिया (क्लोरिनेशन) :

ठिबक संचातील पाईप, लॅटरल, ड्रीपर्स यामध्ये झालेल्या शेवाळ वाढीमुळे संचाची कार्यक्षमता कमी होते. ठिबक सिंचन संचामध्ये जैविक व सेंद्रिय पदार्थाची झालेली वाढ रोखण्यासाठी क्लोरीन प्रक्रियेचा उपयोग होतो. यासाठी ब्लिचिंग पावडर (कॅल्शिअम हायपोक्लोराईट) चा उपयोग करावा, त्यामध्ये ६५ टक्के मुक्त क्लोरीन असतो. अथवा सोडीअम हायपोक्लोराईट वापरावे, त्यामध्ये १५ टक्के मुक्त क्लोरीन असतो. ब्लिचिंग पावडर हा सर्वात स्वस्त व सहज बाजारात उपलब्ध होणारा क्लोरीनचा स्रोत आहे. परंतु, सिंचनाच्या पाण्यामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असल्यास ब्लिचिंग पावडर वापरू नये.

क्लोरीन प्रक्रिया खालीलप्रमाणे करावी :

  • ठिबक सिंचन संचाच्या विसर्ग दराप्रमाणे पूर्ण संचातून २० ते ३० पीपीएम क्लोरीन जाईल इतके क्लोरीन द्रावण संचात सोडून संच २४ तास किवा एक दिवस बंद ठेवावा.
  • क्लोरीनचे द्रावणातील प्रमाण मोजण्यासाठी क्लोरीन पेपरचा उपयोग करावा.
  • नंतर संपूर्ण ठिबक संच फ्लश करून घ्यावा.
English Summary: How to maintain drip set? Learn how to maintain drip irrigation
Published on: 25 August 2020, 10:19 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)