शेतीमध्ये नवनवीन टेक्नॉलॉजीचे वादळ सध्या येत आहे. टेक्नॉलॉजीस नाही तर वेगळ्या प्रकारची अत्याधुनिक यंत्रे देखील शेती क्षेत्रासाठी विकसित करण्यात येत आहे. म्हणून शेती आता खऱ्या अर्थाने उद्योग म्हणून नावारूपाला येत आहे. त्याचीच एक पायरी म्हणून शेती कामांमध्ये ड्रोनच्या वापराला केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये भर देण्यात आला आहे.
केंद्र सरकार खुद्द ड्रोनच्या वापराला प्रोत्साहन देत असून कृषी यांत्रिकीकरण उप अभियानाच्या माध्यमातून ड्रोन खरेदीसाठी अनुदान देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या लेखामध्ये आपण ड्रोन साठी अर्ज कसा करावा? त्यासोबतच किती अनुदान मिळते? याची माहिती या लेखात घेणार आहोत.
हे नक्की वाचा:सुरु ऊसातील आंतरपिके ठरतील फायद्याचे, जाणून घेऊ कोणती आंतरपिके घेणे ठरले फायद्याचे
ड्रोन साठी कोणाला अनुदान मिळते?
1- कृषी विज्ञान केंद्रे
2- शेतकरी उत्पादन संस्था व विद्यापीठे
3- कृषी संशोधन संस्था
4- कृषी यंत्रे व अवजारे तपासणी संस्था इत्यादी.
कोणाला किती अनुदान मिळणार?
1-कृषी संशोधन संस्था, कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विद्यापीठ यांना ड्रोन आणि त्याचे भाग खरेदी करण्यासाठी 100% म्हणजे 10 लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.
2- शेतकरी उत्पादक संस्थांना ड्रोन खरेदी करण्यासाठी 75% म्हणजे एकंदरीत साडेसात लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
3- जे ड्रोन खरेदी करणार नाहीत परंतु ड्रोन भाड्याने घेऊन प्रात्यक्षिके राबवतील अशा यंत्रणेला भाडे व त्यासंबंधीच्या खर्चासाठी प्रति हेक्टर सहा हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
4- परंतु ज्या यंत्रणा ड्रोन खरेदी करतील व प्रात्यक्षिके राबवतील अशा यंत्रणांना प्रतिहेक्टर किरकोळ खर्चासाठी तीन हजार रुपये अनुदान मिळणार आहे.
5- नव्याने सेवा सुविधा केंद्र स्थापन करण्याची इच्छा असणाऱ्या सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था किंवा ग्रामीण नवउद्योजक यांनादेखील सेवा सुविधा केंद्राच्या यंत्रसामग्रीत ड्रोनचा समावेश करून या योजनेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी जे कृषी पदवीधारक पुढाकार घेतील त्यांना ड्रोन खरेदीसाठी 50 टक्के अथवा पाच लाख रुपये किंवा यापैकी कमी असलेला अनुदान देण्यात येणार आहे.
हे नक्की वाचा:जाणून घ्या ! ही आहेत शेतीसाठी उपयुक्त आधुनिक अवजारे
ड्रोन साठी अर्ज कसा करावा?
ड्रोन खरेदी साठी अनुदान मिळवण्यासाठी चा अर्ज हा ड्रोन आधारित सेवा सुविधा या योजनेच्या अंतर्गत ड्रोन खरेदी साठी अनुदान आणि पूर्वसंमती मिळावी यासाठी अर्ज करता येईल. हा अर्ज संचालक, निविष्ठा व गुणनियंत्रण कृषी आयुक्तालय, पुणे यांच्या नावे करायचा आहे. अर्ज भरताना अर्जदार संबंधित संस्थेची माहिती, संस्थेचे नाव तसेच बँकेचा तपशील, आधार कार्ड किंवा क्रमांक, सातबारा व आठ अ चा माहिती तसेच जे ड्रोन उपकरण खरेदी करायचे आहे याचा संपूर्ण तपशील देणे बंधनकारक आहे. महत्त्वाचे म्हणजे जर अर्जदार कृषी पदवीधारक असेल तर त्याचाही तपशील द्यावा किंवा ग्रामीण नवउद्योजक जरी असेल तरी त्यासंबंधीचा तपशील संपूर्ण द्यावा लागणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे डीजीसीए ने प्राधिकृत केलेल्या रिमोट पायलट ट्रेनिंग संस्थेकडील रिमोट पायलट परवाना असणे बंधनकारक आहे.
अर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
1- आधार कार्ड
2- बँकेच्या पासबुकची झेरॉक्स किंवा कॅन्सल केलेला चेक
3- संबंधित संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र
4- रिमोट पायलट परवाना धारक चालकाचे नाव आणि तपशिलाची कागदपत्रे जोडावीत.
5- ड्रोन ज्या विक्रेत्याकडून घ्यायचे आहे त्याचे दर पत्रक आवश्यक आहे.
Published on: 18 March 2022, 07:30 IST