तंत्रज्ञानाच्या युगात भारत प्रत्येक क्षेत्रात वेगाने पुढे जात आहे. कृषी क्षेत्रातही भारताने आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये (AI)ने बरीच प्रगती केली आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे ड्रोन. शेतीत ड्रोनच्या वापरामुळे खत फवारणी सारख्या गोष्टी अगदी सोप्या झाल्या आहेत. तसंच औषधी फवारणीसाठी लागणारे मनुष्यबळाचा खर्च देखील वाचला आहे.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांना कमी किमतीत आणि सहजतेने ड्रोन उपलब्ध करून देण्यासाठी अनेक योजना आणल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे 'किसान ड्रोन योजना'ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ मध्ये सुरु केली. तसंच अनेक शेतकऱ्यांना देखील कृषी विद्यापीठ अंतर्गत ड्रोन प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसंच जागा मोजणे, डेटा गोळा करणे, अशी कामे ड्रोनमुळे सोपी झाली आहेत.
कोणत्या कंपन्या ड्रोनची निर्मिती करतात?
गरुरा एयरोस्पेस , आयोटेक वर्ल्ड , थैनोस टेक्नोलॉजीज और दक्षा उनमैंनेद सिस्टम या कंपन्या ड्रोन निर्मिती करतात. तसंच गरजू शेतकऱ्यांना देखील या कंपन्या ड्रोन पुरवतात.
ड्रोन वापराचे फायदे काय?
ड्रोन जास्त उंचीवर अधिक वजन घेऊन उडू शकतात. त्यामुळे मनुष्यबळ कमी आणि जास्त काम होते. ड्रोन हवेत साधारणतः दोन, तीन तास उडू शकत असल्यामुळे जास्त अंतरावर प्रवास करणे, जास्त क्षेत्रावर कामे करणे शक्य होते. आता जमिनीचे नकाशे काढणे, पीक सर्वेक्षण करणे किंवा पीकपाहणी करणे यासाठी प्रामुख्याने केला जातो.
ड्रोनद्वारे औषध फवारणी करताना काय काळजी घ्यावी?
ड्रोन फवारणी करत असताना त्याचा उडण्याचा वेग साधारणतः ४.५ ते ५.० मीटर प्रति सेकंद एवढा असावा. सर्वसाधारणपणे ड्रोन उडताना त्याची पिकापासूनची उंची १.५ ते २.५ मीटर असावी. पीक ड्रोनच्या उड्डाणामुळे लोळू शकणारे असल्यास ड्रोनची पिकापासून उंची २.० ते २.५ मीटर एवढी असावी.
Published on: 09 August 2023, 05:52 IST