Farm Mechanization

शेती क्षेत्राचा विकास करण्यासाठी आणि शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी सरकार अनेक प्रयत्न करत आहे. सरकारसह अनेक कंपन्याही शेतकऱ्यांचा आर्थिक विकास व्हावा यासाठी प्रयत्न करत आहे. अशीच एक कंपनी आहे, या कंपनीचा शेतकऱ्यांसाठी खूप मोठा फायदा होणार आहे.

Updated on 16 January, 2021 11:53 AM IST

शेती क्षेत्राचा विकास करण्यासाठी  आणि शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी सरकार अनेक प्रयत्न करत आहे. सरकारसह अनेक कंपन्याही शेतकऱ्यांचा आर्थिक विकास व्हावा यासाठी प्रयत्न करत आहे. अशीच एक कंपनी आहे, या कंपनीचा शेतकऱ्यांसाठी खूप मोठा फायदा होणार आहे.

एग्रीकल्चर मधील स्टार्ट अप(Agriculture Startup) कंपनी 'अगधी'ने  एक आर्टिफिशअल  इंटेलिजेंस टेक्नोलॉजी आणली आहे. (AI Technology)  याच्या मदतीने आपण बियाणे पाहून आपल्याला कसे उत्पन्न येईल याची माहिती होणार आहे. यामुळे मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी बियाण्यांची निवड आणि पेरणी करू शकतील.  या आर्टिफिशअल इंटेलिजेंस टेक्नोलॉजीच्या मदतीने  बियाण्यांना पाहून पिकांची गुणवत्ता कशी असेल. यासह शेतकऱ्यांना कोणत्या बियाण्यांचा वापर केल्याने आपल्याला उत्पन्न अधिक होईल याचीही माहिती मिळेल.

दरम्यान एका माध्यमांशी बोलताना या  स्टार्ट अपचे संस्थापक निखिल दास म्हणाले की, या तंत्रज्ञाने उत्पन्न वाढण्यास मदत होईल आणि शेतकऱ्यांचेही उत्पन्न वाढण्यास मदत होईल.स्टार्ट अपच्या अंतर्गत बीज आणि पिकांमधील उणीव जाणण्यासाठी मशीन लर्निंग आणि कॉम्प्यूटर व्हिजन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. याच्या मदतीने शेतकऱ्यांना चांगले  बी आणि अधिक उत्पन्न मिळू शकेल. शेतकरी कमकूवत बियांची पेरणी  केल्यानंतर होणाऱ्या नुकसानीपासून बचाव यापासून होणार आहे.

 

बियाण्याची गुणवत्ता कशी आहे याची माहिती आपल्याला काही सेंकदातच कळणार आहे.जुन्या पद्धतीने शेतकऱ्यांना खूप वेळ लागत होता. एआय पद्धतीचा मदतीने बियाण्यांचा तपास करणं आणि बियाण्यांची सॅम्पलिग करणे आणि पिकांच्या उत्पादनातील कालावधी किती याची माहिती सहज होणार आहे. दरम्यान बियाण्यांमधील निकृष्टपणा जाणून घेण्यासाठी फिजिकल टेस्टवर अवलंवून राहावे  लागते. या पद्धतीने ऑटोमॉटीक यंत्रामुळे बियाण्यांची तपासणी केली जाईल. अगधी च्या एआय व्हिजन तंत्रज्ञाने फोटोमेट्री, रेडिओमेट्री आणि कॉम्प्यूटर व्हिजनची मदतीने बिजांची गुणवत्तेची तपासणी केली जाईल.

बिजाच्या इमेजपासून त्यांचा रंग,बनावट आणि आकार काढून कॉम्प्युटर व्हिजनने बियांचा निकृष्टपणाची ओळख केली जाईल.दरम्यान हे तंत्रज्ञान बियाणे तयार करणाऱ्या कंपनींसाठी खुप उपयुक्त आहे.

English Summary: Good news for farmers! Now the seed will know how the crop will be
Published on: 15 January 2021, 08:23 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)