Farm Mechanization

पिकातील तण नियंत्रणासाठी पेरणी झाल्यानंतर तीन, सहा, व नऊ आठवड्यांनी कोळपे या अवजाराच्या साहाय्याने शेतीची कोळपणी केली जाते. प्रारंभी पिकाची वाढ संथगतीने होत असते.

Updated on 07 March, 2022 5:19 PM IST

पिकातील तण नियंत्रणासाठी पेरणी झाल्यानंतर तीन, सहा, व नऊआठवड्यांनी कोळपे या अवजाराच्या साहाय्याने शेतीची कोळपणी केली जाते. प्रारंभी पिकाची वाढ संथगतीने होत असते.

त्यामुळे पिका व्यतिरिक्त तणांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असतो. तसेच फेरी नंतरच्या सुरुवातीच्या दोन तीन आठवड्याच्या कालावधीत तणनियंत्रण न केल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता असते, यासाठी कोळपणी करणे हे त्याचे मानले जाते.

 पिकातील आतील मशागतीसाठी तसेच पिकाला भर देण्यासाठी वापरण्यात येणारे अवजाराला कोळपेअसे म्हणतात. कोळपे हे खूप लहान अवजार असल्याने एका बैलगाडी च्या सहाय्याने दोन किंवा तीन कोळपी चालविता येतात. पिकांची पेरणी ज्या रांगेत केलेली असते. तेथे कोळपी त्या आऱ्यामध्ये शेतकरी वरच्यावर न दाबता कोळपे चालवत असतो.म्हणून बैलांनाही जास्त शक्ती लावण्याची गरज नसते. त्यामुळेच एका जुवाडला तीन  कोळपे लावली जाऊ शकतात.

  • कोळपे याचे अनेक प्रकार ग्रामीण भागात प्रचलित आहेत ते खालील प्रमाणे :-
    • अखंड फासेचेकोळपे.
    • फटीचे कोळपे.
    • अकोला कोळप.
    • मोगी एकचाकी कोळपे.
  • अखंड फासेचे कोळपे :- आकाराने लहान व वजनाने हलके असलेल्या या प्रकारातील कोळपे ची रचना कुळवा सारखी असते. दोन ओळीतील अंतर 30 सेंटिमीटर पेक्षा जास्त असलेल्या पिकास या कोळप्याच्या वापर फायदेशीर ठरतो. कोळप्याचीफास दोन ओळींमधून जात असताना सर्व प्रकारचे तणनिर्मूलन होऊन काही प्रमाणात पिकाला भर लावली जाते. एका बैल जोडी वर दोन ते तीन कोळपी सहज चालवता येतात.

फटीचे कोळपे :- शेतीची नांगरणी करण्यासाठी साधारणत: आपली शेती कोणत्या प्रकारचे आहे हे लक्षात घेतले जाते. म्हणजेच काळी कसदार जमीन असेल तर त्यासाठी आपल्याला भारी नांगर वापरावा लागतो. कारण या जमिनीची पाणी धरण्याची क्षमता जास्त असल्यामुळे पिकांची वाढ झपाट्याने होत असते. त्यामुळे आपण पिकांचे पाणी बंद करतो. तेव्हा मात्र या प्रकारच्या जमिनीत नंतर तडे पडतात. त्यामुळे ती शेती नांगरण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात.

  • या जमिनीत भारी नांगराच्या साहाय्यानेजमीन नांगरली जाते. या प्रकारच्या नांगराचे वजन साधारण150 किलो पेक्षा जास्त असते. वजन जास्त असल्याने हा नांगर जमिनीत खोलवर जाऊन जास्तीत जास्त माती मिसळण्यात मदत करतो.त्यामुळे उपयोग करतात.
  • अकोला कोळपे :- लाकडी किंवा लोखंडी पट्ट्याच्या दिंड्यांमध्ये  खालच्या टोकाला त्रिकोणी आकार दिलेले दोन फणया अवजारातबसवलेले असतात. त्यांच्यामध्ये परंतु दिंडापासून थोड्या अंतरावर दांडीवर आणखी एक फणबसवलेला असतो. अशाप्रकारे अकोला कोळप्याला तीन फणबसवून कोळपण्या चे काम केले जाते. लोखंडी कोळप्यात फणातील अंतर कमी-जास्त करण्याची सोय असते.
  • मोगी एक चाकी कोळपे :- या प्रकारच्या कोळप्याची निर्मिती नंदुरबार येथील कृषी विज्ञान केंद्राने केली आहे. 7 किलो वजनाच्या या कोळप्यामुळे तण काढण्याचे काम सुलभ झाले आहे. आदिवासींची देवता असलेल्यायाहामोगी हे नाव या कोळप्यालादेण्यात आलेले आहे.तणांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी म्हणून एक चाकी कोळप्याचा जन्म झालेला आहे.
English Summary: for hoeing is useful this hoe machine for farming and this is traditional hoeing type
Published on: 07 March 2022, 05:19 IST