Farm Mechanization

कृषी यांत्रिकीकरण यामध्ये मळणी यंत्र हे एक प्रमुख यंत्र आहे. मळणी यंत्र खरेदी करत असाल तर त्याची रचना माहीत असणे आवश्यक आहे.तसेच त्याचा वापर कसा करावा. मळणी यंत्र हे वर्षभर वा सतत चालणारी यंत्र नाही. ते फक्त सुगी पुरते चालते. या लेखात आपण मळणी यंत्राची रचना व निगा कशी ठेवावी याबद्दल माहिती पाहणार आहोत.

Updated on 11 December, 2021 8:31 AM IST

 कृषी यांत्रिकीकरण यामध्ये मळणी यंत्र हे एक प्रमुख यंत्र आहे. मळणी यंत्र खरेदी करत असाल तर त्याची रचना माहीत असणे आवश्यक आहे.तसेच त्याचा वापर कसा करावा. मळणी यंत्र हे वर्षभर वा सतत चालणारी यंत्र नाही. ते फक्त सुगी पुरते चालते. या लेखात आपण मळणी यंत्राची रचना व निगा कशी ठेवावी याबद्दल माहिती पाहणार आहोत.

 मळणी यंत्राची रचना

 मळणी यंत्र मध्ये ड्रम, सिलेंडर, चाळणी आणि पंखा यांचा समावेश असतो.

  • ड्रम-मळणी यंत्रातील ड्रम बहिर्गोल असतो. या ड्रममध्येच शेंगा, कणीस  इत्यादीचे दाणे वेगळे केले जातात.
  • सिलेंडर- ड्रमच्या आतील भागात सिलेंडर बसवलेला असतो. दाणे वेगळे करण्यासाठी त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे दाते बसवलेले असतात.
  • चाळणी- वेगवेगळ्या पिकानुसार वेगवेगळ्या आकाराच्या चाळणे वापरल्या जातात.
  • पंखा- पंखा हा चाळणी खाली बसविलेला असतो. त्यांच्या सहाय्याने दान्यापासून भुसा वेगळा केला जातो.

मळणी यंत्राच्या कार्यपद्धतीचे तंत्र व देखभाल

  • मळनी ड्रमची गती कशी निवडावी?- मळणी ड्रमची कधी वाढविल्यास लागणारी ऊर्जा व दाणे तुटण्याचे प्रमाण कमी होते. परंतु एकूण धान्याचा अपव्यय वाढतो. याच स्वच्छ धान्य, मळणी झालेले धान्य तसेच मळणी न करता वाया गेलेल्या धान्य याचा समावेश होतो. याउलट ड्रमची गती कमी केल्यास मळणी यंत्राची क्षमता,धान्य स्वच्छ करण्याची क्षमता कमी होते व धान्य वाया जाण्याचे प्रमाण वाढते.
  • मळणी ड्रम व जाळीतील फट फिरणारा सिलेंडर व ड्रम यामधील अंतर सामान्यतः 12 ते 30 मी मी इतके असावे.हे अंतर कमी असल्यास धान्य बरोबर त्याचे काडी मळली जाते त्यामुळे अधिक प्रमाणात ऊर्जा लागते.
  • ब्लोअर/ पंखा ॲडजस्टमेंट- निर्मात्यांच्या शिफारसीनुसार गती निश्चित करावी. ही गती कमी जास्त करण्यासाठी फॅन पुली किंवा  ड्राईव्ह पुली कमी जास्त व्यासाची वापरावे.फॅनचीगती जास्त झाल्यास भूषा बरोबर धान्याची फेकली जाऊ शकते किंवा कमी झाल्यास  धान्यात भुसा मिसळला जाऊ शकतो.

मळणी यंत्र वापरताना घ्यायची काळजी

  • सुरक्षित मळणी करण्यासाठी आयएसआय मार्क असलेले मळणी यंत्र वापरावे.
  • पिकाची मळणी करण्यापूर्वी पूर्णपणे पीक वाळू द्यावे.
  • पीक मळण्याची जागा राहत्या घरापासून दूर व समतोल  असावी.
  • रात्री मळणी करताना योग्य प्रमाणात उजेड असेल तरच मागणी करावी.
  • मळणी यंत्राची दिशा अशाप्रकारे ठेवावी बाहेर पडणारा भुसा व वाऱ्याची दिशा एकच राहील.
  • सर्व नट बोल्ट व्यवस्थित घट्ट बसवावे.
  • यंत्रामध्ये पिकाची टाकणी एकसारखी व एक प्रमाणात असावी.
  • यंत्राच्या जाळ्यांची वरचेवर पाहणी करावी व स्वच्छ करावेत.
  • आठ ते दहा तासानंतर मळणी यंत्र थोडी विश्रांती द्यावी.
  • मळणी सुरू करण्यापूर्वी यंत्र मोकळे चालवून यंत्राचा कोणता भाग घासत नसल्याची खात्री करून घ्यावी, असल्यास निर्मात्याने दिलेल्या शिफारशीनुसार बदल करावे.
  • मळणी करताना सैल कपडे घालू नये.
  • मळणी यंत्रात पिक टाकताना चालकाने हात सुरक्षित अंतरावर ठेवावे.
  • चालकाने मद्यपान केलेले नसावे किंवा त्या ठिकाणी धूम्रपान करू नये तसेच जवळ पाणी व वायू ठेवावी. कारण कधी कधी आग लागण्याची शक्यता असते.
  • सामान्यता बीआयएस ने प्रमाणित केलेल्या सुरक्षित फीडीग वापरावे.
  • बेरिंग किंवा वळणाऱ्या पार्टलावंगण द्यावे तसेच बेल्ट तणाव चेक करावा.

लेखक:

इंजि.  वैभव सुर्यवंशी

(विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद फार्म, जळगाव)

English Summary: for highly eficency maintain timly servicing and maintainance to thresher machine
Published on: 11 December 2021, 08:31 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)