Farm Mechanization

पिकांच्या वाढीसाठी व अधिक उत्पादन मिळावे यासाठी आपण पिकांना रासायनिक खते देतो.परंतु बऱ्याचदा ही खते देताना आपण ते हाताने देतो. परंतु हाताने खत देत असताना ते पिकाला एक सारख्या प्रमाणात दिले जातेच असे नाही.

Updated on 05 March, 2022 9:42 AM IST

पिकांच्या वाढीसाठी व अधिक उत्पादन मिळावे यासाठी आपण पिकांना रासायनिक खते देतो.परंतु बऱ्याचदा ही खते देताना आपण ते हाताने देतो. परंतु हाताने खत देत असताना ते पिकाला एक सारख्या प्रमाणात दिले जातेच असे नाही.

या समस्येवर उपाय म्हणून ट्रॅक्‍टरचलित फर्टीलायझर ब्रॉडकास्टर हे यंत्राचा वापर केला तर पिकांना एकसमान पद्धतीने एका प्रमाणात खते देणे सुलभ होऊ शकते. या लेखामध्ये आपण या यंत्र विषयी माहिती घेऊ.

 फर्टीलायझर ब्रॉडकास्टरयंत्राची रचना

या यंत्रामध्ये फ्रेम म्हणजे सांगाडा हा एक मुख्य घटक असून यावर या यंत्राचे इतर दुसरे घटक जोडलेले असतात. या सांगाड्याची  जी पुढची बाजू असते ती ट्रॅक्टरच्या तीन पॉईंट लिंकेज प्रणालीला जोडली जाते. याला एका धातूच्या शीट पासून शंकूच्या आकाराचे एक नरसाळे  बसवलेले असते. यामध्ये आपल्याला जे खत द्यायचे आहे ते टाकले जाते. यांना रसाळ याला दोन नळ्या असतात. यांना सगळ्यांना रेग्युलेटिंग लिव्हर द्वारे नियंत्रित केले जाते. याचा फायदा असा होतो की जेव्हा आपण खरच सोडतो तेव्हा ते आपल्या आवश्यकतेनुसार सोडले जाते. या यंत्रामध्ये जो खतांचा वितरण भाग असतो तो नरसाळ्याच्या खालच्या बाजूला असतो.

या वितरण भागांमध्ये खतांच्या येणाऱ्या खडे तोडून खरपुडे पाठवण्यासाठी डिस्क, व्हेन आणि एजिटेटर सारखे घटक आहेत. नर्स यांच्या खाली एक सप्रेडींग तबकडी असते. याद्वारे युनिटवर गुरुत्वाकर्षणामुळे दोन ओपनिंग द्वारे खात पडते. त्यासोबतच वितरक स्प्रेडर सिस्टीम मध्ये एक डिस्क असते ती उभ्याअक्षाभोवती फिरते. या डिस्कमध्ये चार व्हेन असतात. या डिशचा रोटेशन मुळे तयार झालेल्या केंद्र प्रसारक बलामुळे खत पसरली जाते. या सगळ्या वितरण प्रणाली मुळे खते पिकांना एक सारखे दिले जाते व इतकेच नाही तर गरजेनुसार 12 ते 14 मीटर अंतरापर्यंत पसरविता येते.

 फर्टीलायझर ब्रॉडकास्टर यंत्राचे फायदे

  • कमी वेळात मोठा क्षेत्रात खतांची वितरण देणे शक्य होते.
  • दाणेदार सेंद्रिय घन खतांचे एक समान वितरण करता येते.
  • वेळेची तसेच इंधनाची देखील बचत होते.
  • खतांचा शेतकऱ्यांच्या  शरीराशी संपर्क येत नसल्याने ऍलर्जी व इतर समस्या निर्माण होण्याचा धोका कमी होतो.

(स्रोत- ॲग्रोवन )

English Summary: fertilizer brodcaster machine is useful for distribution of chemical fertilizer to crop
Published on: 05 March 2022, 09:35 IST