Farm Mechanization

सध्या आधुनिक पद्धतीने शेती करण्यावर बरेच शेतकरी भर देतात. शेतीकामासाठी लागणारे नवनवीन महत्वाचे यंत्रे देखील उपलब्ध होत असताना पाहायला मिळतात. आज आपण अशाच एका यंत्राबद्दल जाणून घेणार आहोत. ज्याचा उपयोग चार पिकांसाठी शेतकरी करू शकतात. आपण ब्रश कटरबाबत बोलत आहोत.

Updated on 28 October, 2022 12:17 PM IST

सध्या आधुनिक पद्धतीने शेती (farming) करण्यावर बरेच शेतकरी भर देतात. शेतीकामासाठी लागणारे नवनवीन महत्वाचे यंत्रे (machines) देखील उपलब्ध होत असताना पाहायला मिळतात. आज आपण अशाच एका यंत्राबद्दल जाणून घेणार आहोत. ज्याचा उपयोग चार पिकांसाठी शेतकरी करू शकतात. आपण ब्रश कटरबाबत बोलत आहोत.

या ब्रश कटरचा वापर शेतकरी गवत, चारा पीक (fodder crop) कापणीसाठी करतात. ब्रश कटर बरोबर 2 ते 3 वेगवेगळी जोडणी यंत्र उपलब्ध आहेत. त्यामुळे या यंत्राद्वारे आंतरमशागतही करता येते. या यंत्राचे इंजिन, शाफ्ट पाइप, हॅंडल आणि कटिंग युनिट असे चार प्रमुख भाग आहेत.

शेतकऱ्यांच्या माहितीसाठी बाजारात ब्रश कटर (Brush cutter) दोन प्रकारात उपलब्ध आहे. पहिल्या प्रकारातील ब्रश कटर मनुष्याच्या उजव्या खांद्यावर बेल्टद्वारे अडकवून काम करता येते. दुसऱ्या प्रकारातील ब्रश कटर हे पाठीवर घेऊन काम करता येते. ज्याप्रमाणे पाठीवरील फवारणी पंप अडकवला जातो त्याप्रमाणे हा ब्रश कटर फिक्स केला जातो.

तुषार सिंचनाचा वापर करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी; कमी जागेत मिळेल भरघोस उत्पादन

ब्रश कटरचा वापर

1) गहू कापणी तसेच भात कापणी करण्यासाठी जास्त दातेरी ब्लेडचा वापर केला जातो. तसेच शेतातील, बांधावरील गवत जास्त वाढलेले असेल तर त्यासाठी २ ते ३ दातेरी ब्लेडचा शेतकरी वापर करू शकतात.

2) ब्रश कटर बरोबर २ ते ३ वेगवेगळी जोडणी यंत्र उपलब्ध असतात. त्यात दोन छोटे टिलर असतात. एका टिलरला 'L' आकाराचे ब्लेड असतात. दुसऱ्या टिलरला आडवे ब्लेड (blade) गोलाकार पद्धतीने जोडलेले असतात. या टिलरचा उपयोग मातीची वरवर मशागत करण्यासाठी आणि पिकातील तण मुळासकट काढण्यासाठी केला जातो.

'या' महिन्याचे शेवटचे दिवस तुमच्यासाठी कसे असतील? जाणून संपूर्ण राशीभविष्य

3) कटरला चेन सॉ (करवत) जोडणी करता येते. तिचा उपयोग झाडाच्या अतिरिक्त वाढलेल्या फांद्या काढण्यासाठी करता येतो.

महत्वाच्या बातम्या 
ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक; वेळीच अशापद्धतीने घ्या काळजी
सोयाबीनच्या दरात सुधारणा; किती मिळतोय बाजारभाव? जाणून घ्या
शेतकऱ्यांना 'हे' महत्वाचे तणनाशक फवारता येणार नाही; सरकारने घातली बंदी

English Summary: Farmers brush cutter crop harvesting get good profit
Published on: 28 October 2022, 12:12 IST