Farm Mechanization

सांगलीमधील एका शेतकऱ्याने शेतीच्या अंतर्गत मशागतीसाठी जुगाड करून एक चार चाकी अवजार तयार केले आहे.ज्या शेतकऱ्याने हे अवजार बनवले त्यांचे नाव कुमार पाटील आहे.हे अवजार बनवण्यासाठी जवळ जवळ कुमार यांनी एक वर्ष आटोकाट प्रयत्न केले.

Updated on 19 January, 2022 6:21 PM IST

सांगलीमधील एका शेतकऱ्याने शेतीच्या अंतर्गत मशागतीसाठी जुगाड करून एक चार चाकी अवजार तयार केले आहे.ज्या शेतकऱ्याने हे अवजार बनवले त्यांचे नाव कुमार पाटील आहे.हे अवजार बनवण्यासाठी जवळ जवळ कुमार यांनीएक वर्ष आटोकाट प्रयत्न केले.

हे अवजार बनवण्यासाठी त्यांनी दुचाकीचा इंजिनाचा वापर केला असून त्याद्वारे एक चार चाकी बनवली आहे.या चार चाकी गाडीला त्यांनी 60 हजार रुपये खर्च केला असून त्याच्या साह्याने शेतामध्ये उत्तम रीतीने कोळपण्याचे काम करता येते. हे यंत्र एक लिटर पेट्रोल मध्ये जवळ जवळ एक एकर शेताचे कोळपणी उत्तम रित्या करते.

कशी आहे या यंत्राची रचना?

 कुमार यांचा फॅब्रिकेशन चा व्यवसाय असून त्यांनी आतापर्यंत त्यांच्या फॅब्रिकेशन च्या व्यवसायाच्या माध्यमातून छोटी छोटी सायकल,कोळपे तसेच इतर लोखंडी अवजारे बनवले आहे.या सगळ्या प्रकारची यंत्रे बनवत असताना शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अवजार बनवता येईल का? या विचारातून त्यांनीहे यंत्र बनवले.या यंत्रामध्ये त्यांनी दुचाकीचे 100 सीसी इंजिन वापरले असूनत्या माध्यमातून चार चाकी बनवली आहे.नंतर त्यांनी या चार चाकी ला शेतीला उपयुक्त अवजारे कसे जोडता येतील याचा अभ्यास करून त्याची रचना केली. 

चार चाकी यंत्राच्या साह्याने कोळपणी, नांगरट आणि पेरणी तसेच औषध फवारणी या कामासाठी ही उपयुक्त ठरले आहे.तसेच ही अवजार सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येते व शेतातील कामे करता येतात. या चार चाकी यंत्राने 1 लिटर पेट्रोलमध्‍ये 1 एकर शेतीचे कमी वेळात कोळपणी केली आहे.याविषयी बोलताना कुमार सांगतात की त्यांची एक वर्षांची मेहनत फळाला आली आहे. त्यांनी  तयार केलेले हे यंत्र बऱ्याच शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरलेल आहे.

English Summary: farmer in sangli name is kumar patil make a macchine that useful for farm work
Published on: 19 January 2022, 06:21 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)