Farm Mechanization

देशात सर्वाधिक धरणे राज्यात असूनही येथील भौगोलिक परिस्थितिमुळे सिंचन क्षमता १७ ते १८ % दरम्यान आहे. ८२ ते ८३ % शेतीतील उत्पादन मौसमी पावसावर अवलंबून आहे. जागतिक हवामान बदलामुळे पावसाचे प्रमाण व वितरण यात अनिश्चितता वाढली आहे. राज्यात ५२% हून अधिक क्षेत्र टंचाई ग्रस्त आहे तर जवळपास ४०% क्षेत्र हलक्या जमिनीचे आहे. पावसाचे उशिराने आगमन, पावसातील मोठे खंड, अतिवृष्टी, कमी पाऊस या सर्वामुळे कोरडवाहु शेतीतील पिकांचे उत्पादन अनिश्चित असते.

Updated on 11 October, 2018 2:11 AM IST


देशात सर्वाधिक धरणे राज्यात असूनही येथील भौगोलिक परिस्थितिमुळे सिंचन क्षमता १७ ते १८ % दरम्यान आहे. ८२ ते ८३ % शेतीतील उत्पादन मौसमी पावसावर अवलंबून आहे. जागतिक हवामान बदलामुळे पावसाचे प्रमाण व वितरण यात अनिश्चितता वाढली आहे. राज्यात ५२% हून अधिक क्षेत्र टंचाई ग्रस्त आहे तर जवळपास ४०% क्षेत्र हलक्या जमिनीचे आहे. पावसाचे उशिराने आगमन, पावसातील मोठे खंड, अतिवृष्टी, कमी पाऊस या सर्वामुळे कोरडवाहु शेतीतील पिकांचे उत्पादन अनिश्चित असते. आपण ११ महीने चांगला खुराक दिला आणि १ महिना उपाशी ठेवले तर कोणत्याही व्यक्तीची तब्बेत चांगली राहणार नाही. त्या प्रमाणे पीक उत्पादनासाठी चांगली मशागत, उत्तम बियाणे, खते या सर्वाचा वापर केला मात्र पाऊस अनिश्चित झाला तर सर्व नुकसान होते. म्हणून पावसातील खंडाच्या परिस्थितीत पीक वाढीच्या महत्वाच्या अवस्थेत पिकास १ अथवा २ पाणी दिल्यास पिकाचे उत्पादन चांगले येवू शकते. म्हणून कोरडवाहु शेतीला स्थैर्य देण्यासाठी शेततळ्याची गरज आहे.

पिकांना संरक्षित पाणी देण्याबरोबरच मत्स्यपालन, दुबार पीक, फळपीक लागवड यशस्वी करण्यासाठी शेततळे अत्यावश्यक बाब आहे. शासन अनेक योजनांच्या माध्यमातून शेततळ्यासाठी प्रोत्साहन देत आहे. त्यापैकी काही माहिती पुढीलप्रमाणे, सर्व साधारण ३०मी. x ३०मी. x ३मी. आकाराचे  शेततळे गृहीत धरूया. १०मी x १०मी. x ३मी या कमीत कमी आकाराचे शेततळे शेतकऱ्यास काही योजनेत घेता येते.  

योजनेचे नाव

अनुदान रक्कम  मर्यादा

ठळक वैशिष्ट्ये

मागेल त्याला शेततळे योजना

रु.५०,०००/-

राज्यातील कोणताही शेतकरी यात ऑनलाइन अर्ज करून लाभ घेऊ शकतो. यंत्राने शेततळे खोदण्यासाठी अनुदान देय आहे.    

राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत कोरडवाहु क्षेत्र विकास (RAD)

खर्चाच्या ५०% रु.७५,०००/- प्रती लाभार्थी मैदानी प्रदेशात, तर ५०% रु. ९०,०००/- डोंगराळ प्रदेशात

या प्रकल्पात निवडलेल्या गावांमध्ये शेततळे  प्लॅस्टिक अस्तरीकरणासह घेणार्‍यास हे अनुदान देय आहे.

कोरडवाहु शेती अभियान

रु.५०,०००/- मागेल त्याला शेततळे योजने प्रमाणे

या योजनेत निवडलेल्या गावातील शेतकरी याचा लाभ घेऊ शकतात.

अनू.जाती. उपयोजना

रु.३५,०००/- प्रती शेततळे, मृ.स. निकषानुसार

अनुसूचीत जाती व नवबौद्ध शेतकर्‍यांची  या योजनेत जिल्हा परिषद मार्फत निवड झालेल्यांना अनुदान देय आहे.

आदिवासी क्षेत्र उपयोजना

रु.३५,०००/- प्रती शेततळे, मृ.स. निकषानुसार

आदिवासी शेतकर्‍यांची या योजनेत जिल्हा परिषद मार्फत निवड झालेल्यांना अनुदान देय आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान - गहू, भात, कडधान्य

डोंगराळ भाग व ज.जा.उ.यो. क्षेत्रात ५०% रु.५७,८९२/- अनुदान तर इतर क्षेत्रासाठी ५०%  रु.५५,५९४ /-

या योजनेत लागू असलेल्या जिल्हयातिल शेतकर्‍यांसाठी अनुदान देय आहे.

राष्ट्रीय फलोत्पादन अभियान-सामूहिक शेततळे

फूल डग आऊट शेततळे अनुदान
रु. २.०० लाख ते रु. ७.५३ लाख

पुर्णपणे खोदाई करावयाचे शेततळे हे २००० घ.मी. ते १०,००० घ.मी क्षमतेसाठी, लाभधारक शेतकर्‍याकडे फलोद्यान पिकाखाली क्षेत्र असणे आवश्यक

हाफ डगआऊट शेततळे
रु. ०.६५ लाख ते रु. ५.५६  लाख

जमिनीच्या वर बांध घालून पाणीसाठा करावयाचे   शेततळे हे ५००  घ.मी. ते १०,००० घ.मी क्षमतेसाठी, लाभधारक शेतकर्‍याकडे फलोद्यान पिकाखाली क्षेत्र असणे आवश्यक

बोडी टाइप सामूहिक तलाव साठी रु. ०.६७ लाख ते ३.४९ लाख

बोडी टाइप सामूहिक तलाव २५०० घ.मी. ते १५,००० घ.मी. क्षमतेसाठी. बोडी हे पूर्व विदर्भातील पाणी साठवण्याचा तलाव आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी  योजना

रु. १,५६,०२९/- ते रु. २,८७,०१६/- मापदंड (डोंगराळ भागासाठी व ज.जा.उ.यो.क्षेत्र विरहित इतर क्षेत्रासाठी)

राज्यातील सर्व गावातील जॉब कार्ड धारक शेतकरी या योजनेत ग्रामपंचायतीने निवड केल्यास लाभ घेऊ शकतात. डोंगराळ भागासाठी व ज.जा.उ.यो. क्षेत्रात मापदंड या पेक्षा अधिक आहेत.

एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास योजना, गतिमान पाणलोट विकास कार्यक्रम,

शासनाच्या कृषि विभागामार्फत योजनेच्या निकषानुसार शेततळे खोदण्यात येते. 

यात लाभार्थीचा आर्थिक सहभाग नसतो व शेततळे जलसंधारण उपचाराचा भाग म्हणून घेतले जाते. 


या प्रकारच्या योजनेत व निकषात वेळोवेळी बदल होत असतात. त्यामुळे अनेक योजना असल्या तरी प्रत्येक योजनेत भाग घेताना संबंधित तालुका कृषि अधिकार्‍याकडे चौकशी करून सविस्तर माहिती घ्यावी.

शेततळे असले तरी त्यात पाणी साठून राहून त्याचा उपयोग सिंचन देण्यासाठी करण्यासाठी त्यास प्लॅस्टिक अस्तरीकरण आवश्यक आहे. विविध योजनेत खोदलेल्या वा शेतकर्‍याने स्वत: खोदलेल्या शेततळ्यास राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत प्लॅस्टिक अस्तरीकरणासाठी अनुदान देण्यात येते, मात्र त्यासाठी लाभधारक शेतकर्‍याकडे फलोद्यान पिकाखाली क्षेत्र असणे आवश्यक आहे.

प्लॅस्टिक अस्तरीकरणासाठी शेततळ्याच्या आकारमानानुसार ५०% मर्यादेत असलेले अनुदान वेगवेगळे आहे, ते पुढीलप्रमाणे.  

अ.क्र.

शेततळे आकारमान मीटर मध्ये (लांबीxरुंदीxखोली)

प्लॅस्टिक अस्तरीकरणासाठी देय ५०% अनुदान रक्कम रु.

१५x१५x३

२८,२७५/-

२०x१५x३

३१,५९८/-

२०x२०x३

४१,२१८/-

२५x२०x३

४९,६७१/-

२५x२५x३

५८,७००/-

३०x२५x३

६७,७२८/-

३०x३०x३

७५,०००/-

या प्रमाणे शेतकरी शेततळे घेऊ शकतो व आपले उत्पन्न शाश्वत करू शकतो. 

श्री. विनयकुमार आवटे           
अधिक्षक कृषि अधिकारी (मग्रारोहयो), पुणे-१
9404963870

English Summary: Farm Pond for Sustainable Dry Land Agriculture
Published on: 16 July 2018, 10:15 IST