Farm Mechanization

भारतात शेती क्षेत्रात दिवसेंदिवस मोठे आमूलाग्र बदल घडून येताना दिसत आहेत. देशातील अनेक कृषी वैज्ञानिक शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी, उत्पादन वाढीसाठी अनेक प्रकारचे शोधकार्य करत आहेत. देशात शेतकऱ्यांना हायटेक बनवण्यासाठी शासन देखील प्रयत्नरत आहे, शेतकऱ्यांच्या फायद्याच्या शासन दरबारी अनेक योजनावर काम चालू आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे म्हणून पिकांच्या नवनवीन जाती विकसित केल्या जात आहेत, चांगल्या दर्जाचे बियाणे उपलब्ध करून दिले जात आहेत, नॅनो युरियासारख्या खतांची निर्मिती केली जात आहे, उत्पादन वाढीसाठी कारगर सिद्ध होत असलेल्या नवनवीन कीटकनाशकांची निर्मितीदेखील देशात होत आहे, तसेच उत्पादन वाढीसाठी विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीसाठी उपयुक्त अनेक प्रकारची यंत्र देखील विकसित केले जात आहेत. या सर्व शोधकार्य यांचा एकच उद्देश आहे तो म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकांचे उत्पादन वाढ घडवून आणणे आणि शेतकरी राजाला आत्मनिर्भर बनवणे. तसेच देशात पारंपारिक शेतीच्या पद्धती देखील आता बदलताना दिसत आहेत. मध्यप्रदेश राज्यातील जबलपूर मधील एक युवक इंजिनीयर शेतीक्षेत्रात आपले मोलाचे योगदान देत आहेत, हा युवक इंजिनियर गेल्या अनेक वर्षापासून शेती क्षेत्राला लागणारे अनेक प्रकारची यंत्रे विकसित करण्याच्या कामात व्यस्त आहे. या युवक इंजिनियरने पेरणीसाठी एका विशेष प्रकारचा ड्रोन विकसित करून सर्वांना आश्चर्यचकित करून ठेवले आहे. या युवक इंजिनियरच्या कार्याचे चहूकडे कौतुक करण्यात येत आहे.

Updated on 30 December, 2021 11:17 AM IST

पूर्वी बैलांच्या साह्याने पेरणी केली जात असे, नंतर ट्रॅक्टर आणि सीड ड्रीलद्वारे पेरणी करण्याचा युग आला, पण आता यापेक्षा देखील हायटेक पद्धतीने पेरणी करता येणार आहे. आता देशातील शेतकरी चक्क ड्रोनद्वारे पेरणी करू शकतील. हो बरोबर ऐकत आहात तुम्ही चेक ड्रोनद्वारे पेरणी करतील. एमपी च्या जबल्पुर मधील माढोताल क्षेत्रात राहणाऱ्या इंजिनियर अभिनवने एक विशेष ड्रोन विकसित केले आहे, ज्याद्वारे पिकांची पेरणी  केली जाऊ शकते. या ड्रोनची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हे ड्रोन 30 किलोपर्यंत वजन उचलण्यास सक्षम आहे.

देशात हायटेक शेतीला प्रारंभ

अभिनव यांनी विकसित केलेल्या ड्रोन मध्ये एक टॅंक फिट केले गेले आहे. ज्यात तुम्ही ज्या पिकांची पेरणी करायची आहे त्याचे बियाणे भरू शकता. बियाणे भरल्यानंतर ड्रोन ला शेतात उडविले जाते आणि ड्रोन ऑटोमॅटिक पेरणी करते. अभिनव यांनी बीएचयू च्या वैज्ञानिकांच्या आग्रहाखातर याचा वापर मिर्झापूर येथील शेतात करून दाखवला. अभिनव यांनी यावेळी सांगितले की यूपी राज्यात अनेक जिल्ह्यात भात पिकाच्या काढणीनंतर थंडीचा हंगाम सुरू होतो आणि त्यामुळे शेत हे सुकत नाहीत, त्यामुळे पारंपारिक पद्धतीने अथवा ट्रॅक्टर सीडड्रिलद्वारे गव्हाची पेरणी करणे अशक्य होऊन बसते. त्यामुळे उत्तर प्रदेश राज्यातील शेतकरी गव्हाला पेरण्याऐवजी त्याला खतासारखे शिंपडून त्याची पेरणी करतात, अशी पेरणी करताना शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे अभिनव यांनी त्यांच्या ड्रोन ला मॉडीफाय केले, त्यांनी ड्रोन टॅंक च्या खाली सीड ड्रील सारखे एक छिद्र असलेले फनल बसवले याद्वारेच बियाणे जमिनीवर पेरले जातात. अभिनव जेव्हा डेमो देत होते तेव्हा शेकडो शेतकरी तसेच कृषी वैज्ञानिक शेतात हजर होते तेव्हा या वैज्ञानिकांनी आणि शेतकऱ्यांनी या ड्रोनला शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असल्याचे सांगितले आणि याला शेतीचे भविष्य म्हणून संबोधले.

ड्रोन वापरण्याचे ज्ञान आवश्यक

ड्रोन द्वारे पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना विशेष म्हणजे ड्रोन ऑपरेट करण्याचे ज्ञान आवश्यक आहे. मोबाईल किंवा टॅबलेटचा वापर करून गुगल मॅप च्या साह्याने शेतीचा नकाशा यामध्ये ॲड केला जातो. त्यानंतर एकदा हा ड्रोन सुरू केला की बियाणे संपेपर्यंत किंवा बॅटरी संपेपर्यंत थांबत नाही. हा आपल्या शेतीच्या क्षेत्रानुसार ऑटोमॅटिक पेरणी करत राहतो. इंजिनीयर अभिनव यांनी या ड्रोन ला देशातील शेतकऱ्यांच्या गरजेला ध्यानात ठेवून विकसित केले आहे. त्यांनी हा ड्रोन विकसित करण्यासाठी पाच वर्षेपर्यंत कठीण परिश्रम देखील घेतले आहे. शिवाय या ड्रोन द्वारे एका वेळेस 30 लिटर औषधांची फवारणी देखील करता येऊ शकते. एकदा हा ड्रोन सुरू झाला तर सहा हेक्‍टरचे क्षेत्र कवर करू शकतो. अभिनव यांनी विकसित केलेल्या या द्रव्यांमुळे कमी वेळेत आणि कमी खर्चात फवारणी व पेरणी करणे शक्य झाले आहे आणि यामुळे भारतीय शेती संपूर्ण हायटेक बनत चालले आहे असेच म्हणावे लागेल.

English Summary: engineer abhinav developed a drone adrone can sowing automatically as well as spray pesticides
Published on: 30 December 2021, 11:17 IST