Electric Tractor: देशात अगोदर पारंपरिक पद्धतीने शेती केली जात होती. बैलाच्या मदतीने शेतीची मशागत (Cultivation of agriculture) केली जात असायची. मात्र आधुनिक युगात शेतीसाठी अनेक यंत्रे (Modern machines) बाजारात उपलब्ध आहेत. मात्र ही अवजारे पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) शिवाय चालत नाहीत. इंधनाचे दर गगनाला भिडल्यामुळे शेतकऱ्यांना अधिक पैसे खर्च करून शेतीची मशागत करावी लागत आहे.
मात्र शेतकऱ्यांच्या पिकाला बाजारात योग्य तो भावही मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आता पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक गाड्या बाजारात लाँन्च केल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे लवकरच इलेक्ट्रिक ट्रॅक्टरही बाजारात येणार आहे. त्यामुळे पैशाची बचत होणार आहे.
पेट्रोल आणि डिझेलचा सततचा तुटवडा पाहता आता सर्व ऑटो कंपन्या इलेक्ट्रिक मोडवर स्विच करण्यात व्यस्त आहेत. ओमेगा सेकी मोबिलिटी (OSM) कंपनीने पुढील वर्षी मार्चपर्यंत भारतात 10 हजारहून अधिक इलेक्ट्रिक वाहने लॉन्च करण्याची घोषणा केली आहे.
Maharashtra Weather: राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट; पहा या आठवड्यातील हवामान
कंपनीने सांगितले की, लॉन्च करण्यात येणाऱ्या वाहनांमध्ये दुचाकी, तीनचाकी आणि इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा समावेश असेल. ही वाहने चार्ज करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स बनवण्याची व्यवस्थाही करण्यात येणार आहे.
दक्षिण कोरिया आणि थायलंडमध्ये चाचण्या सुरू आहेत
OSM कंपनीचे चेअरमन उदय नारंग यांनी भारतात प्रथमच लाँन्च होणार्या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरबद्दल सविस्तरपणे सांगितले. ते म्हणाले, “कंपनीने दक्षिण कोरिया आणि थायलंडमध्ये आपली संशोधन-विकास केंद्रे स्थापन केली आहेत.
Onion Price: कोणी पैसे देतं का पैसे! कांद्याच्या घसरलेल्या किमतीमुळे शेतकरी मेटाकुटीला...
त्या केंद्रांवर इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची चाचणी सुरू आहे. ही चाचणी पूर्ण होताच, आम्ही हे ट्रॅक्टर इलेक्ट्रिक ट्रॅक्टर भारतात लाँन्च करू. 2022-23 च्या अखेरीस टियर II आणि III शहरांमध्ये या वाहनांची सर्व्हिसिंग आणि भाडेतत्त्वावर देण्याची नवीन संकल्पना देखील आम्ही आणू.
कंपनीचे कार्यालय फरीदाबाद येथे आहे
फरीदाबादस्थित कंपनी OSM इलेक्ट्रिक तीन वाहने बनवते. याशिवाय छोटी व्यावसायिक वाहनेही कंपनी बनवतात. बाजारातील मागणी पाहता त्यांची कंपनी लवकरच ड्रोन, ट्रॅक्टर आणि दुचाकी बाजारात आणणार असल्याचे अध्यक्षांनी सांगितले. OSM कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर लॉन्च करून भारताच्या ऑटो क्षेत्रात प्रवेश केला. दिल्लीत या ऑटोची किंमत 3.40 लाख रुपये आहे.
महत्वाच्या बातम्या:
भारतात या वर्षी येणार मोठं संकट! प्रसिद्ध बाबा वेगांचे भाकीत, आजपर्यंतची भाकीत ठरलीत खरी
मुसळधार पावसातून वाचलेल्या सोयाबीनवर केवडा रोगाचा प्रादुर्भाव; असा करा बचाव
Published on: 30 August 2022, 12:23 IST