डिझेलच्या किमती मध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या खर्चात वाढ होताना दिसत आहे. कारण शेतीमध्ये उपयोगी येणारी सगळी यंत्रे हे डिझेल आणि पेट्रोल वरच कार्यान्वित होतात. यासाठी कृषी वैज्ञानिक एक स्वस्त पर्याय शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या कमी करता येतील. जर शेती मध्ये उपयोग येणाऱ्या यंत्रांचा विचार केला तर त्यामध्ये ट्रॅक्टर सगळ्यात जास्त वापरले जाते. त्यामुळे ट्रॅक्टर इंडस्ट्रीमध्ये मोठे बदल होऊ शकतात. या बदलांचा परिणाम म्हणजे ईलेक्ट्रिक ट्रॅक्टर हे होय.
या पार्श्वभूमीवर चौधरी चरण सिंह हरियाणा कृषि विश्वविद्यालय हिसारयेथील वैज्ञानिकांनी ईलेक्ट्रिक ट्रॅक्टर विकसित केले आहे. वैज्ञानिकांचा दावा आहे की हे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर डिझेल ट्रॅक्टर च्या तुलनेत 25 टक्के स्वस्त आहे.
या इलेक्ट्रिक ट्रॅक्टर ची माहिती
या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरला विश्वविद्यालयाच्या कृषी इंजिनिअरिंग आणि प्रौद्योगिकी कॉलेज नेविकसित केले आहे. हे ट्रॅक्टर 16.2 किलोवॅट च्या बॅटरीवर चालते. तसेच डिझेल ट्रॅक्टर त्या तुलनेत याला कमी खर्च येतो. हे देशातील पहिले कृषि विश्वविद्यालय आहे ज्यांनी ईलेक्ट्रिक ट्रॅक्टर वर संशोधन केले आहे. या ट्रॅक्टर मुळे डिझेलच्या वाढत्या किमती पासून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.
या इलेक्ट्रिक ट्रॅक्टर ची वैशिष्ट्ये
- ईलेक्ट्रिक ट्रॅक्टर 17 किलोमीटर प्रति तासच्या वेगाने चालते.
- हे ट्रॅक्टर पाच टन वजनाच्या ट्रेलर सोबत 80 किलोमीटर पर्यंतचे अंतर चालू शकते.
- या ईलेक्ट्रिक ट्रॅक्टर मध्ये बारा किलो वॅट ची इलेक्ट्रिक ब्रशलेस डीसी मोटर आहे.जी72 होल्टेज आणि 2000 राऊंड प्रति मिनिट याप्रमाणे चालते.
- ईलेक्ट्रिक ट्रॅक्टर मध्ये दोन किलो वॅट अवर चीलिथियम आयन बॅटरी दिली आहे.
- ही बॅटरी नऊ तासात फुल चार्ज होते. या नऊ तासांमध्ये एकोणवीस ते वीस युनिट वीज लागते.
- ह्या ट्रॅक्टर मध्ये जलद चार्जिंगचा पर्याय सुद्धा समाविष्ट करण्यात आला आहे. या पर्यायाच्या मदतीने अवघ्या चार तासात की बॅटरी चार्ज केली जाऊ शकते.
- बॅटरीला चार्ज करण्यासाठी लागणाराखर्च हा 160 रुपये आहे.
- या ट्रॅक्टरला 17 किलोमीटर प्रति तास का टॉप स्पीड देण्यात आला आहे.
- ट्रॅक्टर ऑपरेट करण्यासाठी खूप आरामदायक आहे.
ईलेक्ट्रिक ट्रॅक्टर साठी येणारा खर्च
कृषी वैज्ञानिकांच्या मते, या बॅटरीवर चालणाऱ्या ट्रॅक्टर ची किंमत जवळजवळ साडेसहा लाख रुपये आहे. या तुलनेत सारख्या हॉर्स पावर डिझेल ट्रॅक्टरचा विचार केला तर याची किंमत साडेचार लाख रुपये आहे.
या ट्रॅक्टर चा शेतकऱ्यांना होणारा फायदा
- या बॅटरी चलीत ट्रॅक्टर ची प्रति तास खर्च रोटावेटर साठी त्यांच्या 332 आणि मोल्ड बोर्ड नांगराला तीनशे एक रुपये आहे.
- डिझेल ट्रॅक्टर चा खरच हा रोटावेटर सोबत 447 आणि मोल्ड बोर्ड नांगर ला 353 रुपये येतो.
- त्या तुलनेने ईलेक्ट्रिक ट्रॅक्टर चा खर्च हा डिझेल पेट्रोलच्या तुलनेत 15 ते 25 टक्के स्वस्त आहे.
Published on: 21 October 2021, 02:15 IST