Farm Mechanization

कृषी क्षेत्रात कृषी यंत्रसामग्रीच्या क्षेत्रात नवनवीन घडामोडी घडत आहेत. प्रदूषणाने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. त्यावर मात करण्यासाठी इलेक्ट्रिक किंवा सौर उर्जेवर चालणारी उपकरणे विकसित केली जात आहेत.

Updated on 18 June, 2022 10:02 AM IST

कृषी क्षेत्रात कृषी यंत्रसामग्रीच्या क्षेत्रात नवनवीन घडामोडी घडत आहेत. प्रदूषणाने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. त्यावर मात करण्यासाठी इलेक्ट्रिक किंवा सौर उर्जेवर चालणारी उपकरणे विकसित केली जात आहेत.

शेती क्षेत्रात तिचे पूर्वतयारी पासून ते पिकांच्या काढणीपर्यंत विविध प्रकारची यंत्रे यांचा वापर होऊ लागला आहे. या यंत्राच्या साह्याने शेतीची कष्टाची कामे अगदी कमी वेळेत आणि सहजरित्या करणे सोपे झाले आहे.

देशातील विविध कृषी विद्यापीठे, कृषी स्टार्टअप आणि विविध संशोधक या बाबतीत मोलाची भूमिका पार पाडत आहेत. कृषी यंत्र यांच्या वापरामुळे शेतीतील सगळ्यात मोठी समस्या म्हणजे मजूरटंचाई  यावर प्रभावी मात देण्यास शेतकरी सक्षम होत आहे.

अशा परिस्थितीत या लेखात आपण अशा कृषी उपकरणाची माहिती घेणार आहोत जे प्रत्येक शेतकऱ्याकडे असणे आवश्यक आहे.

नक्की वाचा:गहू आणि इतर पिके कापण्यासाठी वापरा ही स्वस्त कृषी यंत्रे, कमी गुंतवणूकीतून मिळेल जास्त नफा

 शेतात क्रांती घडवण्यासाठी प्राईम मूव्हर मशीन

अलीकडेच केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्था,भोपाळच्या वैज्ञानिकांनी सौर उर्जेवर चालणारे ई प्राईम मूव्हर उपक्रम विकसित केले आहे. या क्षेत्रात नवी क्रांती घडवून आणण्यासाठी सध्या असलेले डॉ. मनोजकुमार त्रिपाठी यांनी हे मशीन बनवले आहे.

या मशीनच्या वापरामुळे शेतकऱ्यांना इंधन वाचवण्यात मदत होईल. तसेच पर्यावरण संरक्षणासाठी ही हे एक उत्तम पाऊल आहे.

या यंत्राच्या वापरामुळे शेतातील तण काढणे, रोपांची लावणी यापासून ते औषध फवारणी साठी शेतकऱ्यांना कोणत्या इंधनाची गरज भासत नाही. हे फक्त आणि फक्त सौरऊर्जेवर चालेल ज्यामुळे ते आणखी खास बनते.

नक्की वाचा:'हे' 6 सीड ड्रील मशीन करतील शेतकऱ्यांचे पेरणीचे काम सोपे, जाणून घ्या त्यांची किंमत आणि वैशिष्ट्ये

प्राईम मूव्हर मशीन ची वैशिष्ट्ये

1- हे मशीन सौर उर्जेवर चालणारे आहे. ज्यामुळे शेतकरी दीड एकर शेतात अवघ्या एका तासात कीटकनाशकाची फवारणी करूशकतील.

2-या यंत्राच्या साहाय्याने एकाच जमिनीची नांगरणी,खुरपणी आणि नांगरणी ही पाच तासांपेक्षा कमी वेळेत करता येते ज्यामध्ये इंधनही खर्च होत नाही.

3- या यंत्राचे बॅटरी एका चार्जवर तीन तासांपर्यंत चालते. याशिवाय सौरऊर्जेवर चार्ज होणाऱ्या बॅटरीने शेतकरी घराची विजेची गरज देखील भागवू शकतात.

4- हे मशीन सौर ऊर्जा वर चालते यामुळे शेतकरी दीड एकर शेतात अवघ्या एका तासात कीटकनाशकांची फवारणी करु शकतील.

नक्की वाचा:लेझर किरणांचा वापर करून 'हे' यंत्र करेल अगदी कमी खर्चात तुमच्या जमिनीचे सपाटीकरण, वाचा सविस्तर माहिती

English Summary: e prime mover machine is so useful to farmer because they oprate by solar energy
Published on: 18 June 2022, 10:02 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)