दिवसेंदिवस शेतीमध्ये मजुरांची कमतरता भासत असल्यामुळे सुधारित अवजारे तसेच कृषी अवजारांचा भर देणे गरजेचे झाले आहे. कारण कमी खर्चात जास्त उत्पादन काढने यामुळे शक्य होईल. नवी दिल्ली येथे अखिल भारतीय समन्वित कृषी अवजारे व यंत्र संशोधन प्रकल्पाची उभारणी करण्यात आलेली आहे. जे की हे प्रकल्प पूर्ण भारतात २५ संशोधन केंद्रावर राबवण्यात येत आहेत. जे की महाराष्ट्र राज्यात १९७५ पासून महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मध्ये कृषी अवजारे तसेच यंत्रे आहेत.
प्रकल्पाचे कार्य :-
१. सुधारित कृषी अवजारांचे संशोधन व त्याचा विकास पाहणे.
२. सुधारित अवजारांचे उत्पादन पाहणे.
३. सुधारित अवजारांच्या प्रक्षेत्रीय पडताळणी चाचण्या करणे.
४. सुधारित अवजारांच शेतकऱ्यांमध्ये प्रसार तसेच प्रात्यक्षिक आयोजन करणे.
५. उत्पादकांनी तयार केलेल्या अवजारांची गुणवत्ता तसेच त्याची चाचणी करणे गरजचे आहे.
६. शेतकऱ्यानं प्रशिक्षण देण्याचे आयोजन करणे.
७. कृषी अवजारांची निमिर्ती व विक्री.
संशोधन आणि विकास कार्य :-
संशोधन कार्यामध्ये शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ व कृषी अवजारे हे घडक उपलब्ध आहेत. ज्यामुळे शेतकऱ्यांना अवजारांचे संशोधन करून विकसित केले जाईल. भारतीय समन्वित कृषी अवजारे व यंत्र संशोधन प्रकल्पाच्या माध्यमातून अवजारांची शिफारस करण्यात आलेली आहे.
सुधारित कृषी अवजारांचे उत्पादन करणे :-
या संशोधन प्रकल्पामध्ये सुधारित अवजारे व यंत्रे विकसित करून राज्यातील विविध संशोधन संस्था व कृषी विद्यापीठे यांच्याकडे प्रेक्षणिय चाचणी करण्यासाठी पाठवली जातात. चाचणी केल्यानंतर जी अवजारे पात्र आहेत ती कृषी अवजारे घेतली जातात. १७,३४१ अवजारे या प्रकल्पाच्या माध्यमातून विकसित केली गेली आहेत.
हेही वाचा:-सरकारच्या या निर्णयामुळे तांदळाचे भाव राहणार स्थिर, मात्र सरकारला जास्त फायदा नाही
प्रक्षेत्रावरील पडताळणी चाचणी :-
विकसित केलेल्या अवजारांची पडताळणी व चाचणी करणे गरजेचे असते तसेच त्यामध्ये सातत्याने सुधारीतपणा आणणे सुद्धा बघणे गरजेचे आहे.
सुधारित कृषी अवजारांची गुणवत्ता तपासणी :-
शेतकऱ्यांमध्ये अवजारांची वितरण करण्याआधी त्याची तपासणी करणे1खूप गरजेचे आहे. संशोधन केले गेलेल्या अवजरांची पडताळणी करून त्यास प्रमाणीकरण करणे गरजचे आहे. या प्रकल्पातून आज पर्यंत सुमारे ३५८ कृषी अवजाराच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
फिरत्या निधीतून अवजारांची निर्मिती व विक्री :-
फिरता निधी या प्रकल्पातून नारळ सोलनी यंत्र, भुईमूग शेंगा फोडण्याचे यंत्र तसेच बैल व ट्रॅक्टर चलीत यंत्र, मका सोलनी यंत्र, भेंडी कात्री, आंबा व चिकू काढणीसाठी झेला, दातेरी विळे, खुरपी, सायकल कोळपे इत्यादी सर्व अवजारे विकसित करण्यात आलेली आहेत.
Published on: 14 September 2022, 03:28 IST