Farm Mechanization

शेती हा प्राचीन व्यवसाय आहे, शेतात अनेक प्रकारचे पिकांचे उत्पादन घेतले जाते. कमी जास्त उत्पन्न घेण्यासाठी नव-नवीन तंत्रज्ञानचा उपयोग करत आहोत, याकरिता शेतीसाठी नवीन उपकरणे तयार होत आहेत. कम्बाईन हार्वेस्टर हे एक बहुउपयोगी व प्रगत असे कृषी उपकरण आहे.

Updated on 22 June, 2022 9:21 PM IST

शेती हा प्राचीन व्यवसाय आहे, शेतात अनेक प्रकारचे पिकांचे उत्पादन घेतले जाते. कमी जास्त उत्पन्न घेण्यासाठी नव-नवीन तंत्रज्ञानचा उपयोग करत आहोत, याकरिता शेतीसाठी नवीन उपकरणे तयार होत आहेत. कम्बाईन हार्वेस्टर हे एक बहुउपयोगी व प्रगत असे कृषी उपकरण आहे. हे उपकरण गहू, तांदूळ, हरभरा, सोयाबीन सूर्यफूल, मुगाची कापणी करण्यासाठी तसेच दाण्याच्या सफाईसाठी कामात येते. या मशीनचा वापर केल्यामुळे लागणारे श्रम कमी होते, तसेच वेळेतही बचत होते. हे मशीनच्या मदतीने शेतीच्या कामामध्ये सुलभता येऊन नफ्यात वाढ होते.

कम्बाईन हार्वेस्टर मशीनचे प्रकार

स्वयंचलित कम्बाईन हार्वेस्टर

ट्रॅक्‍टरचलित कम्बाईन हार्वेस्टर

संचलित कम्बाईन हार्वेस्टर

या प्रकारच्या हार्वेस्टरमध्ये सर्व प्रकारची मशनरी बसविण्यात आली असते. आपल्या शक्तीने इंजन आणि इतर मशीनच्या भागांना संचलित करते. त्यामुळे ती काढणी, कापणी तसेच सफाईचे काम सुलभतेने होते.

हेही वाचा : शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती! भारतातील टॉप 10 रोटावेटर व त्यांच्या विशेषता जाणुन घ्या

ट्रॅक्टर चलित कम्बाईन हार्वेस्टर

याप्रकारच्या कम्बाईन हार्वेस्टर मशीनला ट्रॅक्टरसोबत जोडून चालवले जाते. या प्रकारच्या हार्वेस्टर हे ट्रॅक्टरला असलेल्या पीटीओमुळे चालते. ट्रॅक्टरला कम्बाईन जोडून पिकांची कापणी केली जाते.

शेतात कसे काम करते कम्बाईन हार्वेस्टर मशीन

बाजारांमध्ये सध्या विविध कंपन्यांचे हार्वेस्टर मशीन उपलब्ध आहेत. यंत्रामध्ये सगळ्यात पुणे दोन ते सहा मीटर लांब कटर बार असतात .या मशिनच्या साह्याने पिकांची कापणी, बियाणे व धान्याचे सफाई केली जाते. कम्बाईन हार्वेस्टर मशीन रील हे उभ्या पिकाला मशीनमधील कापण्यासाठी उपयुक्त युनिट्स जवळ पोचवण्याचे काम करतो. त्यानंतर मशीनमध्ये असलेल्या कट्टर बारला जोडलेली कटरमुळे पिकांची कापणी होते. त्यानंतर धान्य हे कन्व्हेअर बेल्टद्वारे रेसिंग युनिटपर्यंत पोहचवले जाते. येथे धान्याचे धरणे हे ड्रेसिंग ड्रम आणि काँक्रीट क्लिअरन्स रगडले जाऊन वेगळे केले जाते. त्यानंतर मशीनला असलेल्या गाळणीमध्ये धान्य साफ केले जाते. कम्बाईन हार्वेस्टर मशीनमध्ये एक स्टोन ट्रॅप युनिट बसवलेले असते. ज्याद्वारे धान्यमध्ये आलेली माती, दगड,बारीक खडे वेगळे केले जातात.

 

कम्बाईन हार्वेस्टर मशीनचे फायदे

कम्बाईन हार्वेस्टर मशीन उपयोग केल्यामुळे मजुरांच्या समस्या दूर होते. तसेच कमी वेळेत जास्त काम केले जाऊ शकते. या मशीनचा एक वेळ वापरामुळे पिकांची कापणी, काढणे आणि धान्याची स्वच्छता केली जाते. हे काम एकदम कमी खर्चात आणि कमी वेळेत पूर्ण होत असते. कम्बाईन हार्वेस्टर मशीनने पिकांची कापणी केल्यानंतर पिकांचे अवशेष शेतातच राहतात. कालांतराने ते अवशेष कुजल्याने त्यांच्या खतात रूपांतर होते. कम्बाईन हार्वेस्टर यंत्राने कापणी केलेल्या पाण्याचे उपयोग बीज उत्पादनामध्ये सुद्धा होतो. नामांकित कंपनीच्या हार्वेस्टर एका तासात चार ते पाच एकर क्षेत्राचे कापणी करतात.

कम्बाईन हार्वेस्टर मशीन साठी अनुदान

वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या वेळी कम्बाईन हार्वेस्टर मशीनवर अनुदान उपलब्ध केले जाते. अनुदानाची रक्कम ही वेगवेगळ्या राज्यानुसार वेगवेगळी आहे. छोटे शेतकरी, महिला शेतकऱ्यांना 50 टक्के व मोठ्या शेतकऱ्यांना 40 टक्केपर्यंत सबसिडी उपलब्ध केली जाते.

 

कम्बाईन हार्वेस्टर मशीनची किंमत

शेतीमध्ये कृषी उपकरणाचा वापर हा सातत्याने वाढत आहे. तर देशामध्ये कमीत-कमी 20 पेक्षा जास्त कंपनी कम्बाईन हार्वेस्टर मशीनचे उत्पादन करतात. कम्बाईन हार्वेस्टर मशीनचे वैशिष्ट्ये आणि स्पेसिफिकेशननुसार 10 ते 50 लाखापर्यंत बाजारात कंबाईन हार्वेस्टरची किंमत आहे. मिनी कंबाइन हार्वेस्टर मशीनची किंमत मोठ्या कंपन्या मिनी कम्बाईन हार्वेस्टर मशीनही तयार करतात मिनी कम्बाईन हार्वेस्टर मशीनची किंमत पाच लाख रुपयांपासून सुरू होते.

English Summary: Combine harvester make easier work of farming
Published on: 22 June 2022, 09:20 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)