सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला पोहोचले आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचा खर्च हापरवडेनासा झाला आहे. सध्या बाजारामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा ट्रेंड सुरू झाला असून इलेक्ट्रिक बाइक सुद्धाबाजारात आले आहेत.
.जर शेतीचा विचार केला तर शेतीकामासाठी ट्रॅक्टरचा चा उपयोग मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. परंतु डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टर चा खर्च शेतकऱ्यांना परवडणे योग्य राहिला नाही. परंतु यावर पंजाबमधील एका विद्यापीठाने चांगला पर्याय काढला असून या विद्यापीठातील इंजिनिअरिंग विभागाने इलेक्ट्रिक वर चालणारा ट्रॅक्टर तयार केला आहे. हा एक ट्रॅक्टर डिझेल इंजिन इतकाच कार्यक्षम असून त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक बचत होऊन नुकसान कमी होणार आहे. चौधरी चरणसिंग हरियाणा कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाने हे मॉडेल विकसित केले आहे. भारतातील विद्यापीठातील ई ट्रॅक्टर वरील हे पहिलेच संशोधन आहे.
ईलेक्ट्रिक ट्रॅक्टर ची वैशिष्ट्ये
- हे ईलेक्ट्रिक ट्रॅक्टर16.2 KWh क्षमता असलेल्या लिथियम आयन बॅटरीने चालते.
- यामध्ये 12KW ची इलेक्ट्रिक बृष्लेस डीसी मोटर आहे. जी 72Vवर चालते.
- या ट्रॅक्टरची बॅटरी नऊ तासांत पूर्ण चार्ज होऊ शकते.
- या ट्रॅक्टरची बॅटरी चार्ज करण्यासाठी 19 ते 20 युनिट वीज लागते. त्यामध्ये जलद चार्जिंगचा पर्याय देखील देण्यात आला आहे यासाठी फक्त चार तास लागतात.
- या ट्रॅक्टर एकदा चार्ज केल्यानंतर 80 किलोमीटर पर्यंत जाऊ शकतो.
- या ट्रॅक्टरला एकदा चार्ज केल्यानंतर दीड टन ट्रेलर्ससह80 किमी पर्यंत जाऊ शकतो.
- या ट्रॅक्टरचा जास्तीत जास्त वेग 23.17 किमी प्रतितास आहे.
- हा ट्रॅक्टर 770 किलो वजन उचलण्यास सक्षम आहे.
- या ट्रॅक्टरच्या वापराने डिझेल इंजिन च्या तुलनेत प्रति तास 15 ते 25 टक्के पैशांची बचत होऊ शकते.
- या ट्रॅक्टरची किंमत सध्या साडेसहा लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
- हे ट्रॅक्टर सध्या बाजारात आले नसून फक्त त्याचा प्रोटोटाइप तयार करण्यात आला आहे.(संदर्भ-पुढारी)
Published on: 10 January 2022, 09:23 IST