ऊस तोडणी केल्यानंतर शेतकरी उसाचे पाचट जाळून नुकसान करून घेतात. पाचट न जाळता ते कुजविले यास,तसेच त्याचा वापर आच्छादन म्हणून केला, तर ऊस उत्पादन वाढीसाठी, मजुरी व पाणी बचतीसाठी उपयोग होऊ शकतो. जमिनीचा पोत सुधारून एकरी उत्पादन वाढीसाठी पाचटाचे आच्छादन फायदेशीर आहे.
जर आपण एक एकर क्षेत्राचा विचार केला तर सुमारे तीन ते चार टन पाचट मिळते. पण, ऊस तुटून गेल्यानंतर ते सरीत किंवा त्याची कुट्टी न करता शेतकरी ते जाळून टाकणे पसंत करतात.यामध्ये शेतकऱ्यांनी बदल करणे गरजेचे आहे. या लेखात आपण ऊस पाचट यंत्र याविषयी माहिती घेणार आहोत.
ऊस पाचट यंत्राचे फायदे
साधारणतः उसाच्या पाचटापासून खत तयार होण्यासाठी जवळजवळ आठ ते दहा महिने चा कालावधी लागतो. मात्र उसाच्या पाचटाचे शेतात छोटे छोटे तुकडे करून से पाचटाचे तुकडे कुजविण्यासाठी जिवाणू कल्चर शेणकाला व नत्रयुक्त खत ही प्रक्रिया केल्याने पाचट कुजण्यास चे कार्य फक्त तीन ते साडेतीन महिन्यांत पूर्ण होते.
ऊस पाचट यंत्र हे रोटावेटर सदृश्य यंत्र असून तीन फूट पिकाच्या खोडव्यात वापरून सरीतील पाचटचे 10 ते 15 सेंटिमीटर चे बारीक तुकडे या यंत्राच्या साहाय्याने करता येतात. पुढच्या बाजूला असलेल्या रोलर मुळे सरित असलेली पाचटसरीतच दाबली जाते. या यंत्राच्या रोडवर मधल्या भागात बसवलेले जेआकाराची पाती तुकडे करत जातात. दोन्ही बाजूस बसवलेली एल आकाराची पाती वरंब्याच्या बदलीची माती काढून पाच तास सोबत थोड्या प्रमाणावर मिसळली जाते.
यंत्राने दिवसभरात अडीच ते तीन एकरातील पाचटाचे तुकडे करता येतात. घोड्याच्या वरंब्यात लगतचे माती काढल्यामुळे तोडला जातो. ज्या शेतकऱ्यांकडे रोटावेटर उपलब्ध आहे. त्यावर पा त्याची जोडणी केल्यास कमी खर्चात उपलब्ध होते.
Published on: 16 October 2021, 10:49 IST