Farm Mechanization

कोरोना संकटाच्या काळामध्ये शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती हवी तेवढी चांगली नाही. तसेच झालेल्या अति पावसामुळे पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली गेली आहे.

Updated on 19 February, 2023 4:59 PM IST


कोरोना संकटाच्या काळामध्ये शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती हवी तेवढी चांगली नाही. तसेच झालेल्या अति पावसामुळे पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली गेली आहे. परंतु तरीही शेतीसाठी आवश्यक असलेले खर्च हे करावेच लागतात. मग त्यामध्ये बियाणे असो किंवा शेतीच्या मशागतीसाठी लागणारा खर्च किंवा कृषी यंत्रासाठी लागणारा खर्च असो हा करणे अपरिहार्य असते. कृषी यंत्र शेतीसाठी आवश्यक झाले आहेत. त्यात ट्रॅक्टर हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. या लेखामध्ये आपण काही ट्रॅक्टरविषयी माहिती घेणार आहोत. जे फारच स्वस्त, फायदेशीर आणि दमदार आहेत.

 मॅसी फरगुशन 1030 डी महाशक्ती (Massey Ferguson 1030 DI MAHA SHAKTI) 

हे ट्रॅक्टर फळबाग शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फारच उपयोगी आहे. फळ बागेतल्या कामासाठी ज्यांना ट्रॅक्टर घ्यायचा असेल त्यांनी मॅसी फरगुशन 1030 डी महाशक्ती (Massey Ferguson 1030 DI MAHA SHAKTI) हे ट्रॅक्टर खरेदी करावे. या ट्रॅक्टरचा उपयोग आंब्याची बाग,  द्राक्षबाग, संत्री आणि पिकांमध्ये जसे की सोयाबीन, मक्का, कापूस, ऊस पिकासाठी उपयुक्त आहे. या ट्रॅक्‍टरची किंमत- ४ लाख ५० हजार ते ४ लाख ८०  हजार आहे. या ट्रॅक्टरमध्ये पावर( एचपी) ३० एचपी देण्यात आली आहे.

 पावरट्रेक 425 एन (Powertrac 425 N)

या ट्रॅक्टरचा उपयोग केवळ शेतीसाठी होत नसून अधिक उत्पन्नासाठी इतर कामांसाठी सुद्धा करता येतो. पावरट्रेक 425 एन या ट्रॅक्टरला मल्टी टास्कर ट्रॅक्टर असे म्हटले जाते. ज्यांना एकदम आधुनिक ट्रॅक्टर घ्यायची इच्छा असते, अशांसाठी हे ट्रॅक्टर अतिशय महत्वाचे आणि उपयोगी आहे. या ट्रॅक्‍टरची किंमत- साधरण ३ लाख ३० हजार रुपये असते. या ट्रॅक्टरला इंजिन एचपी- 25 एचपी
HP- 25 hp देण्यात आले आहे. 

 अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा

http://www.escorttractors.com/

 


आयशर 242  Eicher 242

आयशर 242 हे ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी फारच उपयुक्त आहे. कमी बजेटमध्ये जर चांगले ट्रॅक्टर हवे असेल तर आयशर 242 चांगला ऑप्शन आहे. याच्यामध्ये ही चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्यात आली आहे. या ट्रॅक्टरची किंमत- ३ लाख ८५ हजार ते ४ लाख असते.

 एचपी- 25 एचपी

 अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

https://eichertractor.in

English Summary: Buy these Affordable tractors in festival occasion
Published on: 13 October 2020, 11:11 IST