नाशिक येथे भरलेल्या कृषीथॉनच्या १५ व्या कृषीप्रदर्शनात भारतीय बहुराष्ट्रीय समूह आणि ऑफ-हायवे टायर बाजारपेठेमधील दिग्गज मानली जाणारी बाळकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड (बीकेटी) कंपनी सहभागी होणार आहे. कृषीथॉन कृषी प्रदर्शन २४ ते २८ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत नाशिक येथे आयोजित करण्यात आले आहे.
बीकेटी ओएस - स्टॉल क्रमांक: २ आणि ३ येथे प्रदर्शनात उपस्थित राहणार आहे. कृषीथॉन हे भारताचे महत्वपूर्ण कृषी व्यापार प्रदर्शन मानले जाते. उत्पादने आणि नाविन्यपूर्ण शोध एकाच छताखाली आणण्याचे या प्रदर्शनाचे उद्दिष्ट आहे. हे एक शक्तिशाली व्यासपीठ आहे जे कृषी क्षेत्रातील विविध विभागांना त्यांचा व्यवसाय वाढवण्याची, विविध उत्पादक, पुरवठादार आणि ग्राहकांशी संवाद साधण्याची आणि नवकल्पना आणि तंत्रज्ञानावर आधारित उपायांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्तम संधी प्रदान करते.
कृषीथॉन हे कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान एकत्रित करण्याच्या दिशेने काम करत आहे जेणेकरून उद्योगात वाढ होईल. कृषी क्षेत्रासाठी बीकेटी काही जागतिक उच्च दर्जाची उत्पादने प्रदर्शित करत आहे. बीकेटीचा मुख्य प्रकाशझोत कमांडर या टायर्सच्या श्रॄंखलेवर असेल. बीकेटीने हे टायर्स विशेषतः भारतीय भूभागातील शेतीसाठी डिझाईन केले आहेत.
गळीत हंगाम सुरू करण्यापूर्वी ऊसदर जाहीर केला नाही, कारखान्यावर कारवाई करा
कमांडर सिरीजची निर्मिती मजबूत लग बेस्ससह सखोल रबर संरचना केली आहे ज्यामुळे टायरचे आयुष्य जास्त असते. यात एक विशेष ड्युअल-एंगल लग डिझाइन आहे जे शेतामध्ये उत्कृष्ट कर्षण देते आणि उच्च स्व-स्वच्छता गुणधर्म आहेत.कृषीथॉनमधील बीकेटीच्या सहभागाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना, बाळकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड (बीकेटी)चे कृषी विक्री (डोमेस्टीक बिझनेस) प्रमुख राजीव कुमार म्हणाले, “कृषिथॉनच्या १५ व्या आवृत्तीत सहभागी होताना आम्हाला आनंद झाला आहे.
आम्ही बीकेटीमध्ये टायर्स च्या डिझाइनमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान एकत्रित करत आहोत जेणेकरून ग्राहकांच्या मागणी पूर्ण करणारे उच्च दर्जाचे टायर तयार केले जातील. आम्ही प्रदर्शनात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करत आहोत आणि विविध कृषी पोर्टफोलिओ तयार करण्याच्या दिशेने काम करत आहोत जे कृषी क्षेत्रासाठी बदल करणारे ठरेल.
सर्वसामान्य लोकांना झटका! विजेच्या दरात होणार वाढ..
बाजारातील इतर विभागांसोबत तसेच शेतकरी बांधवांशी संवाद साधण्याची आणि त्यांच्या गरजा समजून घेण्याची संधी मिळाली आहे, याचा आनंद आहे. बीकेटी उत्पादन प्रक्रियेदरम्यान पर्यावरणास पूरक राहून सर्वोत्तम कृषी टायर तयार करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करते.
महत्वाच्या बातम्या;
ढसाढसा रडत शेतकऱ्यांनी थेट धरले अधिकाऱ्यांचे पाय, जाणून घ्या नेमकं काय घडलं...
चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर! बीजिंग, झेंगझोऊमध्ये पुन्हा कडक लॉकडाऊन
मशरूम गर्ल! नोकरी सोडून मशरूमची शेती, आता करोडोंची उलाढाल
Published on: 24 November 2022, 04:44 IST