Farm Mechanization

रुंद वरंबा सरी पद्धतीत सोयाबीन पेरणी वरंब्यावर करण्यात येते. दोन्ही बाजूने सरी पाडण्यात येते व कमी पर्जन्यमानात या साऱ्यांमध्ये पावसाचे पाणी साठवून जमिनीत मुरते त्यामुळे जमिनीत ओलावा अधिक काळ टिकून राहतो तसेच पाऊस जास्त पडला तर या सर यांमधून पाण्याचा निचरा होतो.

Updated on 21 July, 2021 2:50 PM IST

 रुंद वरंबा सरी पद्धतीत सोयाबीन पेरणी वरंब्यावर करण्यात येते. दोन्ही बाजूने सरी पाडण्यात येते व कमी पर्जन्यमानात या साऱ्यांमध्ये पावसाचे पाणी साठवून जमिनीत मुरते त्यामुळे जमिनीत ओलावा अधिक काळ टिकून राहतो  तसेच पाऊस जास्त पडला तर या सर यांमधून पाण्याचा निचरा होतो.

जर आपण सोयाबीन पिकाचा विचार केला तर सोयाबीन पिकास पाण्याचा ताण बसला तर उत्पादनात घट दिसून येते तसेच पाऊस जास्त झाला तर भारी जमिनीत पाणी साचून पिकांचे नुकसान होते. त्यामुळे सोयाबीन साठी रुंद वरंबा व सरी पद्धती जलसंधारण तसेच अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे. या लेखात आपण बीबीएफ पद्धतीचे फायदे व या तंत्राचा वापर करून लागवड पद्धत याविषयी माहिती घेणार आहोत.

 बीबीएफ पद्धतीचे फायदे

  • पावसाचे पाणी सऱ्यांमध्ये मुरते त्यामुळे मूलस्थानी जलसंवर्धन होऊन पावसाच्या दीर्घकालीन खंड काळात याचा लाभ होतो.
  • या पद्धतीमुळे चांगली मशागत होऊन बियाण्यांसाठी चांगले वरंबे तयार होतात. गादी वाफे किंवा दरम्यान मध्ये हवा खेळती राहून पाणी व हवा यांचे योग्य प्रमाण राखले जाते. बियाण्याची उगवण चांगली होते व पिकाची पुढील वाढ जोमदारपणे होते.
  • अधिक पाऊस झाल्यास अधिकचे पाणी योग्य पद्धतीने निचरा होण्यास रुंद वरंबे सोबतच दोन्ही बाजूकडील सऱ्या मुळे मदत होते.
  • बीबीएफ यंत्राच्या साह्याने आवश्यक रुंदीचे वरंबे दोन्ही बाजूने सऱ्या सह तयार करणे, पेरणी करणे व खते देणे अशी विविध कामे एकाच वेळी करता येतात.
  • मजुरांची तसेच ऊर्जेची जवळजवळ 40 ते 60 टक्के बचत होते
  • परिस्थितीनुसार सरासरी पाच ते सात हेक्टर क्षेत्र प्रतिदिन पेरणी करता येते.
  • पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत सरासरी 20 ते 25 टक्के पर्यंत अधिक जलसंधारण आणि 20 ते 25 टक्के पर्यंत उत्पादनात वाढ होते.
  • आंतर मशागत करणे शक्य होते तसेच तण नियंत्रणाच्या दृष्टीने उगवन पूर्व तणनाशकांचा वापर केल्यास प्रभावी तण नियंत्रण होते.
  • सोयाबीन तसेच कपाशी, तूर, हळदइत्यादी पिकांची लागवड या पद्धतीने करता येते.

 

बीबीएफ यंत्राच्या साह्याने लागवड पद्धत

  • योग्य खोलीवर व प्रमाणामध्ये बियाण्यांची खाता सह रुंद वरंबा सरी पद्धतीने विविध पिकांची पेरणी करण्यासाठी बीएफ यंत्र विकसित केले आहे. याशिवाय कपाशी, तुर, हळद, आले या पिकांची लागवड या पद्धतीने करता येते. रब्बी हंगामात भुईमूग व हरभरा लागवड या यंत्राने करता येते.
  • बीबीएफ यंत्राच्या सहाय्याने पिकानुसार योग्य रुंदीचे वरंबे तयार करून जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी तर कमी अंतरावरील पिकाच्या चार ओळी रुंद वरंब्यावर येतील यानुसार नियोजन करून वरंब्यावर लागवड करता येते.
  • सपाट वाफे पद्धतीच्या तुलनेत रुंद वरंबा सरी पद्धतीमुळे सोयाबीन उगवण दोन दिवस आगोदर तसेच जोमदार झाल्याचे प्रयोगाने सिद्ध झाले आहे.
English Summary: bbf yantra use for soyabeon cultivation
Published on: 21 July 2021, 02:50 IST