एका शेतकऱ्याच्या मुलाने बनवले कांदा छाटणीचे यंत्र

22 May 2021 01:19 PM By: KJ Maharashtra
कांदा छाटणीचे यंत्र

कांदा छाटणीचे यंत्र

महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) जर कांदा (onion ) या पिकाचा लागवड क्षेत्राचा विचार केला तर बहुतांशी भागात कांदा पिकाचे उत्पादन हे आता घेतले जात आहे. परंतु मुख्यतः नाशिक जिल्ह्यात कांदा पिकाची उत्पादने विक्रमी असे घेतले जाते. परंतु कांदा पिकाचे अर्थशास्त्र हे जरा गुंतागुंतीचे आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

कारण या पिकाच्या उत्पादनासाठी हा खर्च अफाट येतो. परंतु याच्या बाजार भावामध्ये कायम किमतीची अनिश्चितता असते. एखाद्या वर्षी ४ हजार रुपये क्विंटल तर एखाद्या वर्षी केवळ  २०० ते ३०० रुपये क्विंटल या दराने विकले जाते. कांदा पिकामध्ये त्याच्या लागवडीला आणि काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात मजूर लागतात आणि हे मजूर जर वेळेवर उपलब्ध झाले नाहीत तर शेतकरी फार प्रमाणात अडचणीत सापडतो. आणि विशेष म्हणजे कांदा पिकासाठी त्याची काढणी आणि  कांद्याच्या पाती पासून  कांदे वेगळे करणे म्हणजे छाटणी यासाठी मजुरांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते.. या समस्येवर उपाय म्हणून  अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील वडाळी येथील वैभव वागस्कर या महाविद्यालयीन तरुणाने कांदा छाटणी यंत्र विकसित केले. वैभव हे श्रीगोंदे येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय येथील कला शाखेत शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहे.

हेही वाचा : एकाच यंत्राने होतील पीक काढणीनंतरची कामे, जाणून घ्या या यंत्राची माहिती

याबाबतची पार्श्वभूमी अशी की, वैभव चे काका रामचंद्र वागस्कर आणि वडील बाळासाहेब बावस्कर हे नेहमी कांद्याचे पीक घेत असतात. परंतु वैभव यांनी त्यांच्या वडिलांची यातील कष्ट पाहिले आणि कांदा छाटणी यंत्र तयार करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. वैभव यांनी तयार केलेले हे मशीन कांद्याची हवी तशी काटणी करू शकते म्हणजेच कांद्याची पात किती अंतरावर कापायची याचा बदल करता येतो. या मशीनचे वैशिष्ट्य म्हणजे हे मशीन दोन पद्धतीने कांदा काढण्याचे काम करू शकते एक म्हणजे शेतामधून थेट कांद्याची हार्वेस्टिंग करता येते किंवा हाताने काढलेल्या कांद्याचे पात वेगळी करता येते.

परंतु या मशीनचा उपयोग करायचा असेल तर थोड्या लागवड पद्धतीमध्ये बदल करावे लागतात जसे की, कांद्याचे लागवड ही सरळ रेषेत तसेच मध्यभागी ठराविक अंतर ठेवून वरंबे आणि दंडतसेच मध्यभागी ठराविक अंतर ठेवून वरंबे आणि दंड न ठेवता लागवड करावी लागेल. तसेच पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करणे उपयुक्त ठरेल. परंतु या गोष्टी सगळ्याच जणांना शक्य होतील असे नाही. परंतु जमेची बाजू अशी की कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त पाच व्यक्ती द्वारे हाताने कांदा देऊन आपला वेळ चार पट वाचवता येईल. या यंत्राचे वैशिष्ट्य म्हणजे एका तासातच एक ट्रॉली भर  कांदा कट करू शकते.

हे मशीन पातीपासून कांदा कट करू शकते आणि  कट केलेला कांदा सरळ ट्रॉली मध्ये टाकू शकते. या यंत्राची सगळी रचना आणि कार्य करण्याची पद्धत या सगळ्या गोष्टींचे संशोधन वैभव यांनी स्वतः केले असून या यंत्रांची पेटंट देखील लवकरच त्यांना मिळणार आहे. अगोदर वैभव यांनी या पद्धतीचे छोटे मॉडेल तयार करून पाहिले आणि त्यात यश मिळाल्यानंतर आता ते मोठे मशीन बनवण्याचा विचारात  आहेत. या मशीनची रचना जर पाहिले तर त्यामध्ये दहा पुल्या, 24 गिअर आणि 140 बेरिंग  वापरले आहेत.

onion कांदा छाटणीचे यंत्र Onion pruning machine
English Summary: An onion pruning machine made by a farmer's son

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.