Farm Mechanization

पुणे : सध्या शेतीतील बरीचशी कामे ही ट्रॅक्टरने केली जात आहेत. अगदी शेत जमीन बनवण्यापासून ते पीकांच्या कापणीपर्यंत ट्रॅक्टरच्या मदतीने सर्व कामे केली जातात. परंतु ट्रॅक्टरला डिझेल अधिक लागत असल्याने शेतकऱ्यांना इंधनाचा खर्च अधिक द्यावा लागतो.

Updated on 27 July, 2020 3:18 PM IST


पुणे : सध्या शेतीतील बरीचशी कामे ही ट्रॅक्टरने केली जात आहेत. अगदी शेत जमीन बनवण्यापासून ते पीकांच्या कापणीपर्यंत ट्रॅक्टरच्या मदतीने सर्व कामे केली जातात. परंतु ट्रॅक्टरला डिझेल अधिक लागत असल्याने शेतकऱ्यांना इंधनाचा खर्च अधिक द्यावा लागतो. यामुळे सामान्य शेतकऱ्यांनासाठी ट्रॅक्टरने शेताची कामे करणे हे महागाचे पडत असते. पण लवकच शेतकऱ्यांचा हा अतिरिक्त खर्च वाचणार आहे. कारण हैदराबादेतील एका अभियंत्यांनी एक ट्रॅक्टर बनवले असून याला इंधनाची गरज नाही.

शेतीसाठी अत्याधुनिक आणि परवडणारी यंत्रांची निर्मिती करणाऱ्या हैद्राबाद येथील अभियंत्यांनी, इंधनांच्या वाढणाऱ्या किमती आणि त्यातून हिवरे प्रदूषण कमी करण्यासाठी विजेवर चालणाऱ्या इलेट्रॉनिक ट्रॅक्टरची निर्मिती केली आहे. पारंपरिक डिझेलवरील ट्रॅक्टरला तासाला इंधनाचा खर्च पकडून १०० ते १५० रुपये लागतात. तर इलेट्रॉनिक ट्रॅक्टरचा खर्च प्रतितास फक्त २० ते २५ रुपये येत असल्याचा दावा सैद मुबशीर आणि सिद्धार्थ दुराईराजन यांनी केला आहे.

या दोन्ही अभियंत्याच्या मतानुसार, पारंपरिक पद्धतीची शेती यंत्रे वापरल्यास अधिकच खर्च येतो. त्यामुळे शेतकऱ्याचा नफा कमी होतो. तसेच पारंपरिक ट्रॅक्टरच्या देखभालीमध्ये तुलनेने जास्त खर्च येतो. त्यामुळे हा ट्रॅक्टर वापरल्यास शेतकऱ्याच्या खर्चात बचत होऊन त्याचा नफा वाढू शकतो. तसेच यामुळे प्रदूषणदेखील कमी होण्यास हातभार लागू शकतो.

काय आहेत या ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये

१ ) या ट्रॅक्टरचे वजन ६०० ते ८०० किलोच्या दरम्यान आहे.
२ ) हा १.२ टनापर्यंत माल वाहून देऊ शकतो.
३ ) त्याला रिचार्ज होण्यासाठी ६ ते ८ तास लागतात.
४ ) याला घरी रिचारग करता येते.
५ ) बॅटरी संपूर्ण चार्ज असेल तर तो २ किमी प्रतितास याप्रमाणे ७५ किमी एवढं अंतर पार करू शकतो.

English Summary: An electric tractor made by an engineer from Hyderabad
Published on: 25 July 2020, 03:14 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)