पुणे: सध्याच्या दिवसात शेती व्यवसायात अधुनिकता वाढली आहे. शेतकरी शेतीची कामे आता यंत्राच्या मदतीने करत आहे. यासह हवामानाची माहिती देणाऱ्या ऍपच्या मदतीने शेतकरी माहिती घेऊन शेतीची तयारी करत असतात. हवामानाची स्थिती पाहून बळीराजा शेतीच्या मशागतीचे कामे करत आहे. आता मशागतीच्या कामांसह शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापनाचा सल्लाही मोबाईलच्या माध्यमातून मिळणार आहे.
पुण्यातील वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टने राज्यतील शेतकऱ्यांसाठी फार्मप्रिसाईझ नावाचे मोबाईल अप्लिकेशन विकसित केले आहे. या ऍपच्या माध्यमातून जमिनीच्या विशिष्ट परिस्थितीनुसार आणि हवामानाच्या आधारावर पिके व्यवस्थापन यासाठी सल्ला आणि कीड व्यवस्थापनसाठी साल देण्यात येणार आहे. या संस्थेने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
या ऍपनुसार पिकाची नोंदणी कशी करावी याची माहिती मिळणार आहे. हे एप्लिकेशन गूगल प्ले स्टोरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना डाउनलोड करता येणार आहे. या माध्यमातून वेगवेगळ्या भागातील हवामान, जमीन आणि पीक पद्धतीचा अब्यास करण्यात आला आहे. उदा. एखाद्या विशीष्ट भागात कोणते पीक चांगले येऊ शकते, किस पडल्यावर त्याचे व्य्वस्थावण कसे करायचे याची सविस्तर माहिती या अप्लिकेशमध्ये असणार आहे. वॉटरशेड ही संस्था गेल्या ३० वर्षांपासून शेती क्षेत्रात कार्यरत आहे. त्याचे वातावरण बदल आणि शेती यावर सखोल अभ्यास असून त्यांच्या मार्फत वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येतात.
Published on: 04 August 2020, 07:44 IST