Farm Mechanization

शेतीमध्ये मागील काही वर्षापासून वेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान येऊ घातले आहे. वेगळ्या प्रकारचे यंत्राच्या साह्याने शेती केली जात आहे. मग ती लागवडीपूर्वी ची पूर्वमशागत असो, पिकांची आंतरमशागत तास ओके काढणे किंवा कापणी यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान वापरून बनवलेले यंत्राचा वापर केला जातो.

Updated on 09 January, 2022 9:29 AM IST

शेतीमध्ये मागील काही वर्षापासून वेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान येऊ घातले आहे. वेगळ्या प्रकारचे यंत्राच्या साह्याने शेती केली जात आहे. मग ती लागवडीपूर्वी ची पूर्वमशागत असो, पिकांची आंतरमशागत तास ओके काढणे किंवा कापणी  यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान वापरून बनवलेले यंत्राचा वापर केला जातो.

शेती कामांमध्ये यंत्राचा वापर केल्यामुळे  वेळेची आणि खर्चाची मोठ्या प्रमाणात बचत होते.व त्याचा परिणाम हा उत्पादनवाढीवर पाहायला मिळतो. या नियंत्रण मध्येच एक मैलाचा दगड म्हणता येईल असे काम अमेरिकेने केले आहे. अमेरिके मधील जॉन डीअर या कंपनीने चक्क ड्रायव्हरलेस म्हणजेच ड्रायव्हर शिवाय चालणारा ट्रॅक्टर तयार केला आहे. या लेखात आपण या ट्रॅक्टर विषयी माहिती घेऊ.

अमेरिकेने बनवला  ड्रायव्हरलेस ट्रॅक्टर

जॉन डियर या अमेरिकेतील आजच्या कंपनीने ड्रायव्हर शिवाय चालणारा पहिला ट्रॅक्टर निर्माण केला आहे. या ट्रॅक्टर चे नियंत्रण आणि मॉनिटरिंगचक्क शेतकरी आपल्या स्मार्टफोन च्या सहाय्याने करू शकतात. या ट्रॅक्टर मध्ये एवढे उच्च तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे की, चालताना एखादे जनावर किंवा एखादा अडथळा आला तर हा ट्रॅक्टर आपोआप थांबतो.

8R असे या ट्रॅक्टरचे नाव असून कृषी क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठी हा ट्रॅक्टर उपयोगी ठरेल असे म्हटले जाते.

 अमेरिकेतील लास वेगास मध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका इलेक्ट्रॉनिक्स शोमध्ये ट्रॅक्टरचे सादरीकरण करण्यात आले होते. शेतकऱ्यांपुढे असलेल्या मजुरांच्या समस्येवर हा ट्रॅक्टर खूप उपयोगी पडणार आहे. इतकेच नाही तर या  ट्रॅक्टर वर बारा कॅमेरे बसविण्यात आले असून त्यामध्ये पूर्णता आर्टिफिशिअल इंटेलिजन्स वापर करण्यात आला आहे.

English Summary: american company john deer make a driverless tractor to do help farmer
Published on: 09 January 2022, 09:29 IST