काळाच्या ओघात शेतीत मोठा बदल बघायला मिळत आहे. आता शेती करण्यासाठी आधुनिक यंत्राचा वापर वाढला आहे ट्रॅक्टर देखील आधुनिक यंत्रचाच एक भाग बनला आहे. हे शेतीसाठी एक अत्यंत उपयुक्त असे कृषी यंत्र आहे. याच्या मदतीने शेतीची पेरणीपासून ते काढणी पर्यंत सर्व कामे सहज करता येतात. पण ट्रॅक्टर हे सर्व कामे कशामुळे करते माहितीये का? नाही तर आम्ही आपणांस सांगू इच्छितो की ट्रॅक्टर हे सर्व कामे टायरच्या मदतीनेच करत असते. यामुळे जर ट्रॅक्टरचे टायर चांगले नसतील तर ते शेतात नीट काम करू शकत नाही. हेच महत्व लक्षात घेता चांगल्या ट्रॅक्टरसोबतच ट्रॅक्टरचे टायरही मजबूत आणि टिकाऊ असणे गरजेचे असते. आज या लेखात आपण लहान ट्रॅक्टरसाठी कोणता टायर सर्वोत्तम आहे याविषयी सविस्तर जाणुन घेणार आहोत.
मित्रांनो जसं की आपणांस ठाऊक आहे की, आपल्या देशात अनेक मोठ्या कंपन्या गरजेनुसार ट्रॅक्टरचे टायर बनवतात. मात्र यातील काही कंपन्यांच सर्वाधिक चांगल्या आणि विश्वासू ट्रॅक्टरच्या टायर्स बनवत असतात. या सर्व कंपन्या त्यांचे सर्व टायर बजेटनुसार तयार करतात. या कंपन्यांच्या टायरची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
»अपोलो टायर्स
»बीकेटी टायर्स
»गुड ईयर टायर्स
»सिएट टायर्स
»एमआरएफ टायर्स
»बिरला टायर्स
»जेके टायर्स
या कंपन्यांपैकी कुठल्याही एका कंपनीचे टायर तुमच्या मिनी ट्रॅक्टरला लावून तुम्ही शेतीची व इतर कामे सहज करू शकतात. या टायर्सची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हे टायर दीर्घकाळ टिकतं असतात.
टायरची किंमत नेमकी किती?
जर आपण छोट्या ट्रॅक्टरच्या टायरच्या किमतीबद्दल बोललो तर, सर्व कंपन्यांचे हे टायर बाजारात वेगवेगळ्या श्रेणींमध्ये उपलब्ध आहेत आणि ह्या टायरची किंमत भिन्न भिन्न आहे मात्र हे शेतकऱ्यांसाठी खूपचं किफायतशीर आहेत. बाजारात अपोलो टायरची किंमत 1198 रुपये ते 17800 रुपये पर्यंत आहे. CEAT ट्रॅक्टर टायरची किंमत 4459 रुपये ते 25000 रुपये पर्यंत आहे आणि MRF टायरची किंमत 1550 रुपये ते 19150 रुपये पर्यंत आहे तसेच जेके टायरची किंमत 2337 रुपयांपासून 21328 रुपयांपर्यंत आहे.
याव्यतिरिक्त बिर्ला टायर 652 रुपये ते 3500 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. आम्ही तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, तुम्ही या सर्व ट्रॅक्टरचे टायर ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने खरेदी करू शकता. तुम्ही हे ऑनलाइन खरेदी केल्यास, तुम्हाला या टायर्सवर चांगली सूट देखील दिली जाते.
Published on: 16 April 2022, 10:12 IST