शेतकरी शेतीसाठी लागणारी विविध प्रकारची यंत्रे आणि अवजारे भाड्याने देऊन चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवूशकतात. नवीन उपकरणे भाड्याने देण्याची सुविधाॲप द्वारे उपलब्ध करण्यात आली आहे. या ॲपचं नाव आहे किसान क्राफ्ट(Kisan Craft).
किसान क्राफ्ट चेप्रमोटर मॅनेजिंग डायरेक्टर रवींद्र के. अग्रवाल या ॲप विषयी म्हणाले की, किसान क्राफ्ट ने एक विशेष ॲप तयार केले आहे.याद्वारे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना उपकरणे भाड्याने देण्याची सेवा उपलब्ध करण्यात आले आहे.उपकरणे भाड्याने देऊन त्याद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात कमालीची वाढ होत आहे.
उपकरणे भाड्याने देण्याच्या व्यवसायातुन अनेक शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे आणि तसेच भाड्याने उपकरणे येणारे शेतकरी ही चांगली पिके घेऊन उत्पन्न घेऊ लागले आहेतव शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे. याद्वारे अनेक शेतकऱ्यांनी उपकरणे भाड्याने देणे,हा जोडधंदा सुरू केला आहे.
काही जणांनी भाड्याने देण्याच्या उद्देशाने शेतीची यंत्रे खरेदी केली आहेत. यामध्ये शेतकरी उपकरणे भाड्याने घेऊ शकता आणि देऊही शकता.
किसान क्राफ्ट ॲपचे वैशिष्ट्ये (Feature of Kisaancraft App)
- किसान क्राफ्ट ॲप म्हणजे मोबाईल फोनद्वारे एका विशेष डिजिटल अप्लिकेशनचा वापर करून उपकरणे असलेले आणि नसलेले अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांना मदत करणारी सेवा आहे.
- कोविड मुळे शेत मजुरांचा तुटवडा निर्माण झाल्याने उपकरणे भाड्याने द्या ही किसान क्राफ्ट ची सुविधा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरले आहे.
- किसान क्राफ्ट एप 11 भाषांमध्ये उपलब्ध असून ते दाखल झाल्यापासून केवळ काही महिन्यातच लाखो शेतकऱ्यांनी डाउनलोड केले आहे.
- किसान क्राफ्ट हे बियाणांपासून ते पिकापर्यंत सर्व सेवा देणारी कंपनी आहे.
- लहान शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे मध्ये व आयुष्यामध्ये सुधारणा करणे आणि शेतीच्या उत्पन्नात मदत करणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
Published on: 21 November 2021, 07:47 IST