पारंपारिक पद्धतीने वाळलेली मिरची पोत्यात भरून काठीच्या सहाय्याने झोडपून काढणे व त्यानंतर सुपाच्या सहाय्याने टरफलापासून बियाणे वेगळे करणे अतिशय त्रासाचे काम आहे. श्वासाद्वारे मिरचीची बारीक कण नाकात गेल्यास मजुराला एक सारख्या शिंका येतात,तसेच शरीराचा दाह होतो
कमी प्रमाणात बी काढायची असल्यास हे शक्यही होते. परंतु मोठ्या प्रमाणात तसे बियाणे महामंडळ,बिजो उत्पादक,बीज संस्था, कंपन्या एखाद्या ठिकाणी करायचे असल्यास त्यासाठी मजूर मिळणेही दुरापास्त होते.
या सर्व बाबींचा विचार करून अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प, कापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञानडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला अंतर्गत, लाल ओली मिरची बीज निष्कासन यंत्र विकसित केले आहे. हे बीज निष्कासन यंत्र शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरू शकते. शेतकरीबीज निष्कासन यंत्राच्या साह्याने बियाणे व्यवसाय करू शकतो. व त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात अतिरिक्त भर पडण्यास मदत होईल .
यंत्राची परिणामे:
1) सर्वसाधारण मापे:-
- लांबी-1.28 मिटर
- रुंदी – 0.73 मिटर
- उंची-1.60 मिटर
2) विद्युत मोटर :- 3 अश्वशक्ती ( तीन फेज )
यंत्राचे प्रमुख भाग :
बीज निष्कासन यंत्राचे प्रामुख्याने प्रमुख फ्रेम,हाँपर(चाडी), बीज निष्कासन युनिट व विद्युत मोटर असे महत्त्वाचे एकूण चार भाग आहेत.
- मुख्य फ्रेम:-
या यंत्राची मुख्य फ्रेम स्टीलच्या अँगल सेक्शन पासून तयार केली गेली आहे.हाँफर (चाडी), बीज निष्कासन ड्रमबियाणे बहीद्वार, टरफल बहीद्वार आणि मोटर मुख्य फ्रेमवर बसविण्यात आले आहेत.
- हाँपर(चाडी)
साधारणत पाच किलो ओल्या मिरच्या राहतील अशा आकारमानाची चाडी आहे.चाडीची एक बाजू वाढवली गेली आहे. जवळपास 360 चा उतार दिला आहे जेणेकरून मिरच्या चाडीमध्ये एक सारखे जाण्यास मदत होते.
बीज निष्कासन युनिट :-
यंत्राच्या बीज निष्कासन युनिटमध्ये प्रथम बीच निष्कासन ड्रम,दितीय बीज निष्कासन ड्रम, अर्धवर्तुळाकार गोलछिद्रीतचाळणी, प्रथम बियाणे बहीद्वार,द्वितीय बियाणे बहीद्वार, व टरफल बहीद्वार यांचा समावेश आहे. विद्युत मोटर विज निष्कासन यंत्र कार्यरत करण्यासाठी तीन अश्वशक्तीची 3 फेज मोटर जोडलेली असते.
मिरची बीज निष्कासनाची प्रक्रिया:
या यंत्रामध्ये साधारणत: दोन ड्रम असून हे ड्रम फिरवण्यासाठी यंत्राला विद्युत मोटरदिली आहे. वरच्या बाजूला असलेल्या चाडी मधून ओल्या मिरच्या घातल्यानंतर पहिल्या ड्रममध्ये शाफ्टव फ्लॅट पेग्सच्या क्रियेच्या सहाय्याने मिरच्या चिरडले जाऊन बियाणी वेगळे होतात. निष्कासन झालेले बियाणे अर्धवर्तुळाकार गोल छिद्रीतचाळणीतून जातात आणि प्रथम बियाणे बहीद्वारातून गोळा केले जाते.
काही बियाणे बरोबर राहीलेल्या मिरच्या उर्वरित बियाणे निष्का सणासाठी पहिल्या ड्रम खाली असलेल्या द्वितीय ड्रम पर्यंत पोचविल्या जातात. या ड्रम मध्ये सुद्धा वरील प्रमाणे निष्कासन क्रिया होऊन निष्कासन झालेले बियाणे दुसऱ्या बही द्वारातून गोळा केले जाते. तसेच निष्कासन झालेल्या टरफल हे टरफल बही द्वारातून गोळ्या केले जाते.
यंत्राची वैशिष्ट्ये :-
- बीज निष्कासन यंत्र बियाणे उत्पादकां करिता उपयुक्त आहे.
- या यंत्राद्वारा बीच निष्कासन क्षमता 301 किलोग्रॅम प्रति तास आहे.
- यंत्र 3 अश्वशक्ती3 फेज विद्युत मोटर वर चालते.
- बीज निष्कासन करण्यासाठी यंत्राची कार्यक्षमता 95 ते 97 टक्के पर्यंत आहे.
यंत्राचे फायदे:-
- यंत्राचे कार्य अगदी सुलभ आहे.
- यंत्र पूर्णपणे बंद असल्याने अंगाचा होणारा दाह व एक सारख्या येणाऱ्या शिंका कमी करण्यास मदत होते.
- यंत्र चालवणारा व्यक्ती दिवसभर काम करू शकतो जे पारंपारिक पद्धती मध्ये शक्य होत नाही.
- संपूर्ण बियाणे (94-99%) निष्कासन एकाच पास मध्ये शक्य.
- बियाण्यांची उगवण क्षमता कमी होत नाही.
यंत्राविषयी घ्यावयाची काळजी :-
- यंत्राचा वापर झाला की, लगेच यंत्र खोलून स्वच्छ धुऊन व कोरडी करून ठेवावे. मुख्यत; रोलर, अर्धवर्तुळाकार चाळण्या स्वच्छ धुऊन आणि कोरडी करून ठेवावे.
- यंत्राचे सर्व नट व बोल्ट वेळोवेळी कसून घ्यावे.
- मशीन बेल्टचा तान तपासून घ्यावा.
Published on: 08 February 2022, 01:53 IST