Farm Mechanization

सध्याच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे विजेचा लपंडाव आणि कायम रात्रीचा वीजपुरवठा या कारणांमुळे शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी खूप त्रस्त होतात. त्यातल्या त्यात रात्रीच्या वेळी शेतकरी राजांना अन्य वन्य श्वापदांचा पासून देखील धोका निर्माण होतो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सोलर वॉटर पंपाचा वापर खूप किफायतशीर आणि फायद्याचे ठरेल.

Updated on 31 July, 2022 3:01 PM IST

सध्याच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे विजेचा लपंडाव आणि कायम रात्रीचा वीजपुरवठा या कारणांमुळे शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी खूप त्रस्त होतात. त्यातल्या त्यात रात्रीच्या वेळी शेतकरी राजांना अन्य वन्य श्वापदांचा पासून देखील धोका निर्माण होतो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सोलर वॉटर पंपाचा वापर खूप किफायतशीर आणि फायद्याचे ठरेल.

सोलर वॉटर पंप

 केंद्र सरकारकडून पीएम कुसुम योजनेचा लाभ घेऊन शेतकरी सोलर वॉटर पंप बसवू शकतात. भारताला सौर ऊर्जेच्या बाबतीत खूप उपयुक्त मानले जाते. कारण भारतामध्ये उष्णता चांगल्या प्रकारे उपलब्ध आहे त्यामुळे आपल्याकडील शेतकरी मोठ्या प्रमाणात सोलर पॅनलला कृषी पंप जोडून शेतातील पाण्याची गरज सहज रित्या भागवू शकतात.

तसे पाहायला गेले तर या क्षेत्रामध्ये बऱ्याच कंपन्या असून जास्तीत जास्त प्रमाणात शेतकऱ्यांना स्वतःकडे आकर्षित करणे हा या कंपन्यांचा हेतू आहे. बाजारामध्ये तर जास्त कंपन्या एकमेकांना स्पर्धक म्हणून उतरल्या तर येणार्‍या काळात सोलर कंपन्यांच्या उत्पादनांमध्ये घसरण होऊन त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो. आपल्याला किर्लोस्कर कंपनी माहिती आहे.

नक्की वाचा:शेतकरी बंधूंनो! पिकांना खते देताना घ्या 'ही' विशेष काळजी, मिळेल भरघोस उत्पादन आणि आर्थिक उत्पन्न

कंपनी देखील सोलर वॉटर पंप बनवित असून या सगळ्या सिस्टीम मध्ये एक सोलर पॅनल देखील असतो. या पॅनलवर सूर्याची किरणे पडल्यानंतर ऊर्जेचे रूपांतर डी सी मध्ये परावर्तित होते व या डीसी ला कंट्रोलच्या साहाय्याने एसीमध्ये परावर्तित केले जाऊन वॉटर पंप चालवणे सुलभ होते.

किर्लोस्कर कंपनी शेतकऱ्यांना सल्ला देते की, आपल्या बोरवेलची मर्यादेनुसार सोलार वॉटर पंप निवडावा तसेच या पंपाच्या साह्याने किती अंतरापर्यंत पाणी न्यायचे आहे याचा विचार करणे देखील महत्त्वाचे आहे.

 सोलर वाटर पंपाची किंमत

कंपन्यांकडून सोलर पॅनल सहित वॉटर मोटर चा सगळा संच दिला जातो. यासाठी किर्लोस्कर कंपनी चा एक एचपी पंपाची किंमत दीड लाख रुपयांपर्यंत आहे.

परंतु यामध्ये सोलर पॅनल, मोटर, पंप आणि  इंस्टॉलेशन चा सगळा खर्च पकडलेला आहे. तसेच तीन एचपी पंपाची किंमत अडीच लाख रुपये असून दोन एचपी पंपाची किंमत एक लाख 80 हजार रुपये आहे. दहा एचपी पंपाची किंमत सहा लाख रुपये आहे.

नक्की वाचा:आता टाळा कीटकनाशकांवरचा खर्च आणि शेतात लावा इको लाईट ट्रॅप, चिकट सापळे जाणून घ्या का लावावे ट्रॅपच?

हा पंप दिवसभरात दहा तास चालू शकतो

 सोलर वॉटर पंप दिवसभरात सहा ते दहा तासांत पर्यंत चालतो. जर प्रकार सूर्यप्रकाश असेल तर हा कालावधी वाढु शकतो. डिझेलच्या आणि विजेचा विचार केला तर सोलर वॉटर पंप  स्वस्त आहेत. अनुदानावर सोलर वॉटर पंप मिळाला तर मोटारीसाठी पाच वर्षाची आणि सोलर पॅनल साठी पंचवीस वर्षाचे वारंटी मिळते.

जर विनाअनुदानित सोलर वॉटर पंप मिळाला तर मोटारीसाठी दीड वर्ष आणि सोलर पॅनल साठी पंधरा वर्षाची वारंटी मिळते. या सोलर वॉटर पंपाचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये एक स्विचप्लग असतो त्याच्या सहाय्याने तुम्ही विजेवर देखीला पंप चालू शकतात.

नक्की वाचा:Scheme: 'या' शेतकऱ्यांना मिळते विहीरीसाठी अनुदान,वाचा योजनेबद्दल महत्वाची माहिती

English Summary: 10 hp solar water pump is so benificial for farmer for water supply to crop
Published on: 31 July 2022, 03:00 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)