Education

राज्यात MSRTC अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळमध्ये ऑक्टोबर 2021 पासून मोठा वाद बघायला मिळत आहे. एसटी महामंडळमधील कर्मचारी शासनात विलीनीकरण करण्यात यावे म्हणून ऑक्टोबर पासून संपावर गेले आहेत. एसटी मधील हा संपाचा खेला अजूनही संपुष्टात आला नसून न्यायालयाकडून गेल्या अनेक दिवसांपासून "तारीख पे तारीख" दिली जात असल्याने राज्यातील नागरिकांना वाहतुकीसाठी मोठी अडचण येत आहे.

Updated on 13 March, 2022 11:51 AM IST

राज्यात MSRTC अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळमध्ये ऑक्टोबर 2021 पासून मोठा वाद बघायला मिळत आहे. एसटी महामंडळमधील कर्मचारी शासनात विलीनीकरण करण्यात यावे म्हणून ऑक्टोबर पासून संपावर गेले आहेत. एसटी मधील हा संपाचा खेला अजूनही संपुष्टात आला नसून न्यायालयाकडून गेल्या अनेक दिवसांपासून "तारीख पे तारीख" दिली जात असल्याने राज्यातील नागरिकांना वाहतुकीसाठी मोठी अडचण येत असल्याने

त्यामुळे पुन्हा एकदा प्रवासी वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी एसटी महामंडळ 10000 कंत्राटी चालकांची भरती करणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. संपामुळे प्रवासी वाहतूक विस्कळीत झाली असल्याने प्रवाशांना मोठी अडचण होत आहे याच पार्श्वभूमीवर कंत्राटी एसटी चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला गेला असल्याचे महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा:- आनंदाची बातमी! 10वी आणि 12वी पास उमेदवारांसाठी 'या' ठिकाणी नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या याविषयी

राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचा शासनात विलीनीकरण करण्याच्या मुद्यावर एक त्रिसदस्यीय समिती नेमली होती. समितीने आपल्या अहवालात महामंडळ शासनात विलीन करता येणे अशक्य असल्याचे स्पष्ट केले. यानुसार, राज्य शासनाने संपकरी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा कामावर रुजू होण्याचे आवाहन केले आणि त्यांच्यावर कुठलीच कारवाई न करण्याचे देखील आश्वासन दिले. महामंडळाच्या या निर्णयाला अनेक संपकरी यांनी प्रतिसाद दाखवला असल्याचे सांगितले जात आहे.

असे असले तरी जे संपकरी कामावर रुजू होत आहेत ते प्रशासकीय दर्जाचे असल्याने एसटी महामंडळात एसटी चालकांची संख्या अद्यापही नगण्य आहे. त्या अनुषंगाने हळूहळू 10,000 एसटी चालकांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यापैकी दोन हजार चालकांची भरती झाली असल्याचे महामंडळ कडून सांगितले गेले आहे.

हे पण वाचा:-खरं काय! 70 हजाराचा iPhone 13 Mini मिळतोय मात्र 45 हजारात; जाणुन घ्या या स्पेशल ऑफर विषयी

English Summary: What do you say Recruitment of 10 thousand posts in ST; Learn about it
Published on: 13 March 2022, 11:51 IST