Education

बारावी हे आयुष्याच्या पुढील भविष्याचे आणि करिअरचे टर्निंग पॉईंट असते असे म्हटले जाते. कारण पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये बऱ्याचदा बारावीचा निकाल लागल्यानंतर पुढे काय? कोणत्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा याबाबत संभ्रमाचे वातावरण तयार होते. कारण या वळणावर जर निर्णय चुकला तर पुढील करीअर चुकण्याची दाट शक्यता असते.

Updated on 29 August, 2022 5:25 PM IST

 बारावी हे आयुष्याच्या पुढील भविष्याचे आणि करिअरचे टर्निंग पॉईंट असते असे म्हटले जाते. कारण पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये बऱ्याचदा बारावीचा निकाल लागल्यानंतर पुढे काय? कोणत्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा याबाबत संभ्रमाचे वातावरण तयार होते. कारण या वळणावर जर निर्णय चुकला तर पुढील करीअर चुकण्याची दाट शक्यता असते.

त्यामुळे बारावीनंतरच्या या निर्णायक वळणावर योग्य तो पदवी अभ्यासक्रम निवडून भविष्यात उत्तम करिअरच्या संधी निर्माण होऊन चांगल्या पगाराची नोकरी मिळणे शक्य आहे.

या लेखात आपण बारावी सायन्सनंतर कुठले कोर्सेस करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, अशा अभ्यासक्रमांची माहिती घेऊ.

नक्की वाचा:Job: सुवर्णसंधी! भारतीय तटरक्षक दलात आहे 'इतक्या' पदांसाठी भरती,संधीचे करा सोने

 बारावी सायन्स नंतर महत्त्वाच्या अभ्यासक्रम

1- बारावी सायन्स नंतर ग्रॅज्युएशन करता येण्यासारखे क्षेत्रे- बीई/ बी टेक-बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी,बी.आर्च.( बॅचलर ऑफ आर्किटेक्चर), बीसीए( बॅचलर ऑफ कॉम्प्युटर एप्लिकेशन्स), बीएससी( माहिती तंत्रज्ञान), बीएससी( नर्सिंग), बीएससी( इंटेरियर डिझाईन),

बीडीएस( बॅचलर इन डेंटल), बीएससी( पोषण आणि आहार शास्त्र),  बीपीटी( बॅचलर ऑफ फिजीओथेरपी) आणि बी.फार्म. ( बॅचलर ऑफ फार्मसी) तसेच बीएससी( अप्लाइड जिओलॉजी),  बीएससी( भौतिकशास्त्र),  बीए/ बीएससी( उदारमतवादी कला),  बीएससी( रसायन शास्त्र) आणि बीएससी( गणित)

नक्की वाचा:Agriculture Education: शेतकरी पुत्रांनो! दहावीनंतर 'कृषीतंत्र' अभ्यासक्रम हा आहे एक चांगला पर्याय,घडेल उत्तम करिअर

बारावी सायन्स (पीसीएम ग्रुप) नंतर अभ्यासक्रमाची यादी

यामध्ये कमर्शियल पायलट ट्रेनिंग, सांखिकीची पदवी, सागरी प्रशिक्षण कार्यक्रम, बीबीए( बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन)

 काही महत्वाचे डिप्लोमा प्रोग्राम( अभ्यासक्रम)

 बी. डेस. ( बॅचलर ऑफ डिझाईन),बीआयडी( बॅचलर ऑफ इंटरियर डिझाईन), बीएमएस( बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज), बीबीएस( बॅचलर ऑफ बिझनेस स्टडीज),

बीआयबीएफ( आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि वित्त पदवी), इपीईडी( शारीरिक शिक्षण पदविका) आणि इंटिग्रेटेड लॉ कोर्सेस इत्यादी.

 वरीलपैकी हे कुठले ही पदवी अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी चांगले असून पुढील आयुष्याचा पाया भक्कम करण्यासाठी उपयोगी ठरू शकतात.

नक्की वाचा:Job: सुवर्णसंधी! 10 वी पास उमेदवारांना संरक्षण क्षेत्रातील 'या'भरतीत मिळणार साठ हजार रुपये प्रतिमहा पगार, वाचा माहिती

English Summary: this is so benificial degree courses after 12th science pass out
Published on: 29 August 2022, 05:25 IST