शिक्षण म्हटले म्हणजे दहावी पर्यंत ठीक आहे परंतु त्यानंतर शिक्षणाला लागणारा खर्चामध्ये प्रतिवर्षी वाढ होत जाते. त्यातच वेगवेगळ्या प्रकारचे डिप्लोमा, डिग्री कोर्सेस इत्यादीसाठी खूप प्रमाणात शुल्क भरावे लागते. कॅटेगरीनुसार काही शुल्कात सवलत मिळते तो भाग वेगळा. परंतु आधी आपल्याला पैसे भरावे लागतात. परंतु प्रत्येक अशी पालकांची आर्थिक स्थिती इतकी भक्कम नसते की कितीही शुल्क भरून आपल्या पाल्याला योग्य शिक्षण देऊ शकतील.
आता या बाबतीत शासनाच्या काही योजनांचा विचार केला तर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून सरकारकडून मदत करण्यात येते.
परंतु त्यामध्ये कितपत आधार मिळतो हे सगळ्यांना माहिती आहे. या सगळ्या समस्या वर उपाय म्हणून सरकारने 'प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना' सुरू केली आहे. या योजनेचा विद्यार्थ्यांना कसा फायदा होतो? याबद्दल या लेखात माहिती घेऊ.
विद्यार्थ्यांसाठी सरकारचे फायदेशीर योजना
या योजनेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेच्या किंवा पोर्टलच्या माध्यमातून सरकार विद्यार्थ्यांना तब्बल 13 बँकांकडून कर्ज उपलब्ध करून देते. एवढेच नाही तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केंद्र सरकारच्या दहापेक्षा जास्त मंत्रालय आणि विविध विभागांच्या शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून पैसे दिले जातात.
सरकारने या माध्यमातून अनेक प्रकारच्या स्कॉलरशिप आणि कर्जाच्या योजना या एकाच ठिकाणी आणले असून तुम्ही निवडत असलेल्या अभ्यासक्रमाला किती पैशांची किंवा कर्जाची गरज आहे त्यानुसार यामध्ये कर्ज दिले जाते.
तुमच्या आई-वडिलांच्या आधारे तुम्हाला चार लाख रुपयांपर्यंतचा शैक्षणिक कर्ज यामध्ये मिळू शकते. परंतु तुम्हाला जर चार ते साडेचार लाख रुपयांदरम्यान कर्ज घ्यायचं असेल तर तुम्हाला गॅरेंटर द्यावा लागतो. साडे सहा लाखापेक्षा जास्त रक्कम असेल तर तुम्हाला मॉर्गज (एखादी वस्तू तारण)बँक मागू शकते.
तुम्ही जर आर्थिक दुर्बल घटकातून असाल तर सहकारी बँकेकडून कर्ज घ्यावे कारण तुम्हाला ब्याज अनुदानाच्या सरकारी योजनेचा लाभ मिळणे शक्य होते. हे कर्जाची रक्कम प्रत्येक सेमिस्टरच्या सुरुवातीला थेट आपल्या कॉलेज किंवा विद्यापीठापर्यंत पोचवली जाते. आमच्या कॉलेजचा सर्व खर्च यामध्ये होतो.
या योजनेसाठी अर्ज कसा करावा?
1- सगळ्यात आधी तुम्हाला या योजनेच्या पोर्टल वर जाऊन संबंधित लिंक वर क्लिक करावे लागेल व त्यानंतर रजिस्ट्रेशन करावे लागेल.
2- रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ईमेल आयडी आणि पासवर्ड मिळतो. मिळालेला ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला लॉगीन करता येणार आहे.
3- तुम्हाला शिक्षणासाठी कर्ज हवे असेल तर तुम्ही कॉमन एज्युकेशन लोन हा फॉर्म भरावा.
4- तुमचे कर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला आपोआप सगळी माहिती पोर्टलवर उपलब्ध होते.
5- या योजनेच्या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही स्कॉलरशिप साठी देखील अर्ज करू शकतात. परंतु यासाठी तुम्हाला तुमचा कोर्स निवडावा लागेल आणि त्यानुसार पोर्टलवर त्याची माहिती मिळेल.
लागणारी कागदपत्रे
आधार कार्ड,पालकांचा उत्पन्नाचा दाखला, विद्यार्थ्याचा पासपोर्ट साईज फोटो, पत्त्याच्या पुराव्यासाठी विज बिल किंवा आधार कार्ड, हायस्कूल आणि इंटरमिजिएट मार्कशीटचे फोटो कॉपी,
तुम्ही ज्या संस्थेमध्ये अभ्यास करणार आहात त्या संस्थेचे प्रवेश मान्यताप्राप्त व संबंधित अभ्यासक्रमाचा कालावधी किती आहे त्याचा पुरावा व संपूर्ण खर्च किती लागणार याचा तपशील दाखवावा लागतो.
Published on: 30 August 2022, 07:09 IST