Education

SSC Result 2023 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) कडून इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा दहावीचा निकाल 98.83 टक्के लागला आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली असून 95.87 टक्के मुली पास झाल्या आहेत. तर 92.05 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत.

Updated on 02 June, 2023 12:25 PM IST

SSC Result 2023 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) कडून इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा दहावीचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली असून 95.87 टक्के मुली पास झाल्या आहेत. तर 92.05 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. तर निकालात 98.11 टक्क्यांसह कोकण विभाग पहिल्या स्थानावर आहे. तर सर्वात कमी नागपूर विभागाचा निकाल लागला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेऊन दहावीचा निकाल आणि विभागावार टक्केवारीची माहिती दिली.

राज्यातून एकूण 1577 लाख विद्यार्थ्यांनी 10वीची परीक्षा दिली होती आणि ही परीक्षा केवळ 533 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती. माध्यमिक मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी 84 हजार 416 मुले आणि 73 हजार 62 मुली आहेत.

दरम्यान महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च-एप्रिल 2023 मध्ये परीक्षा घेण्यात आल्या होत्या. तर इयत्ता 10वी मार्च-एप्रिल 2023 च्या परीक्षेत बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असणार आहेत.

SSC Result 2023: प्रतीक्षा संपली! 10वीचा निकाल आज जाहीर होणार, तुम्ही निकाल इथे पाहू शकता

25 विषयांचा निकाल 100 टक्के

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल तीन टक्क्यांनी घटला असून 25 विषयांचा निकाल 100 टक्के लागला असल्याची माहिती शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे.

राज्याचा निकाल: 93.83 टक्के

पुणे: 95.64 टक्के

नागपूर: 92.05 टक्के

औरंगाबाद: 93.23 टक्के

मुंबई: 93.66 टक्के

कोल्हापूर: 96.73 टक्के

अमरावती: 93.22 टक्के

नाशिक: 92.22 टक्के

लातूर: 92.67 टक्के

कोकण: 98.11 टक्के

नागपूर विभाग: 92.05 टक्के

मुलींचा निकाल: 95.87 टक्के

English Summary: SSC Result 2023 : Which students will get more percentage? big update regarding the results
Published on: 02 June 2023, 12:25 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)