१. Bsc Agri -
Bsc Agri या कृषी विषयक पदवीमध्ये तुम्हाला शेतीविषयी विविध प्रकारचे ज्ञान दिले जाते जसे की तुम्हाला यामध्ये शेतीमध्ये कोणत्या प्रकारची खते वापरली जातात तसेच जास्तीत जास्त उत्पादन पाहिजे असेल तर कोणत्या प्रकारे नियोजन केले जाते हे सर्व शिकवले जाते. या पदवी शिक्षणात तुम्हाला कोणत्या पिकावर कोणते औषध मारायचे आहे तसेच रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कोणत्या प्रकारची फवारणी करावी हे सगळे ज्ञान दिले जाते.Bsc Agri हा कोर्स चार वर्षाचा असतो जे की सुमारे प्रति वर्ष १ लाख रुपये फी असते. तुम्हाला चार वर्षात ४ लाख रुपयांच्या आसपास फी जाते.
Bsc Agri ची महाविद्यालये पुढील प्रमाणे -
१. आप्पासाहेब पवार कृषी विद्यालया बारामती.
२. महात्मा फुले कृषी विद्यापीठ.
३. आनंद निकेतन ऍग्री कॉलेज चंद्रपूर.
४. Dr. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ रत्नागिरी.
हेही वाचा:तुमच्या घामाला सन्मानाचं मोल, महाराष्ट्र शासनाचे सर्व कृषी पुरस्कार एका क्लिकवर-
२. Msc Agri -
Msc Agri मध्ये सुद्धा तुम्हाला शेतीविषयी वेगवेगळ्या तंत्रज्ञान विषयी माहिती दिली जाते. आजच्या युगात जास्तीत जास्त तरुण पिढी Agri मधून शिक्षण घेऊन आपला कल नोकरीकडे न ओळवता शेतीकडे ओळवत आहे. शेती विषयक जी आधुनिक तंत्रज्ञान आहेत त्याबद्धल माहिती भेटली जाते. जसे की चांगल्या प्रकारची बी बियाणे तसेच रासायनिक खते याबद्धल माहिती भेटते. शेतामध्ये जे जे आधुनिक यंत्र वापरून आपण शेती करायचो त्या तंत्रज्ञानाची माहिती आपल्याला या पदवी मधून भेटते.
Msc Agri ची महाविद्यालये पुढीलप्रमाणे -
१. कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर नागपूर.
२. Dr. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ रत्नागिरी.
३. Dr. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला.
३. Horticulture -
Horticulture Agri ही एक शेतीबद्धल असणारी शिक्षणाची शाखा आहे. या कोर्स मध्ये तुम्हाला फळझाडे, फुले, फळे, शेती, धान्य या सर्व गोष्टींचा अभ्यास यामध्ये शिकवलं जातो. जे की यामध्ये तुम्हाला शेतात नेहून प्रात्यक्षिक नॉलेज सुद्धा दिले जाते. कोणत्या प्रकारे रोपे लावावी तसेच कलम कशा पद्धतीने करावे याचे ज्ञान या कोर्स मध्ये दिले जाते.
४. B.tech Agriculture Engineering -
B.tech Agriculture Engineering हा कोर्स चार वर्षाचा असतो जे की यामध्ये तुम्हाला शेतीबद्धल माहिती तसेच तंत्रज्ञान ओळख करून दिली जाते. या कोर्स ची कॉलेज पुढीलप्रमाणे -
१. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी.
२. KIT'S कॉलेज ऑफ इंजिनीरिंग कोल्हापूर.
३. Dr. अण्णासाहेब शिंदे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अहमदनगर.
४. Dr. DY patil कॉलेज ऑफ Agriculture इंजिनीरिंग कोल्हापूर.
५. पोल्ट्री फार्मिंग -
पोल्ट्री फार्मिंग हा diphloma कोर्स ३ वर्षाचा असतो जे की त्यासाठी प्रति वर्ष १२ हजार रुपये फी आहे.
पोल्ट्री फार्मिंग कॉलेज पुढीलप्रमाणे -
१. Dr. BV राव इन्स्टिट्यूट ऑफ पोल्ट्री मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी पुणे.
Published on: 13 September 2021, 08:02 IST