Education

Krushi Sevak Bharti 2023 :-महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून विविध विभागांतर्गत आता भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून कोरोना कालावधीपासून रखडलेल्या भरती प्रक्रिया आता वेगाने पूर्ण करण्यात येतील अशी शक्यता आहे. सध्या राज्यातील विविध जिल्हा परिषद अंतर्गत भरती प्रक्रिया देखील राबवण्यास सुरुवात झाली असून त्यांचे अर्ज प्रक्रिया सुरू आहे. त्यासोबतच तलाठी भरती प्रक्रिया देखील सुरू झालेली असून नुकतीच वनरक्षक पदासाठी असलेली परीक्षा देखील पार पडल्या.

Updated on 13 August, 2023 9:30 AM IST

त्यामुळे आता विविध प्रकारच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी चालून आलेली आहे असेच म्हणावे लागेल. याच अनुषंगाने आता एक महत्त्वाची बातमी म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून कृषी विभागात देखील रिक्त पदांसाठी भरती केली जाणार असून ती विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयासाठी केली जात आहे.

 कृषी सेवक पदासाठी होणार भरती

 त्याबद्दल सविस्तर वृत्त असे की राज्यातील छत्रपती संभाजी नगर, लातूर, कोल्हापूर आणि नासिक या विभागांमध्ये ही भरती होणार असून या भरतीमध्ये भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील जे काही गट क संवर्गातील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे आहेत ती रिक्त पदे आता कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर नामनिर्देशनाने/ सरळ सेवा अंतर्गत स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणार आहे. त्याकरिता आता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येणार आहे.

कोणत्या विभागात आहेत किती रिक्त जागा?

 जर आपण एकूण रिक्त जागांचा विचार केला तर त्या 952 असून यामध्ये छत्रपती संभाजीनगर एकूण रिक्त जागा 196, लातूर एकूण रिक्त जागा 170, नासिक एकूण रिक्त  जागा 336 आणि कोल्हापूर एकूण रिक्त जागा 250 असून या जागा भरण्यात येणार आहेत.

 कृषी सेवक पदासाठी उमेदवारांना अर्ज करण्याचे संकेतस्थळ

 https://krishi.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या लिंकच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

 या भरतीची सविस्तर जाहिरात पाहण्याचे संकेतस्थळ

www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सविस्तर जाहिरात पाहता येणार आहे.

 या भरती करिता 31 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहेत.

 महत्वाचे

 याबाबतचा जो काही प्रस्ताव आहे त्याला अद्याप पर्यंत प्रशासकीय मान्यता मिळणे बाकी असून ही मान्यता न मिळाल्याने जाहिरात देण्यात आलेली नाही. परंतु सदर प्रक्रिया ही आता अंतिम टप्प्यात असल्यामुळे लवकर जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असल्याचे देखील कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी सांगितले आहे.

English Summary: so many seats to be filled in agriculture department read in which department how many seats?
Published on: 13 August 2023, 09:30 IST