Education

नोकरी किंवा बऱ्याचशा उद्योगधंद्यांमध्ये विविध कौशल्य असणार्या उमेदवारांची नितांत आवश्यकता भासते. अशी बऱ्याच प्रकारची क्षेत्रे आहेत की त्या ठिकाणी अजून देखील पुरेशा कुशल मनुष्यबळाची कमतरता भासते. बरेच विद्यार्थी इंजीनियरिंग, मेडिकल या विद्याशाखांकडे खूप मोठ्या प्रमाणात जातात. परंतु या रुळलेल्या शाखांकडे न जाता काही तरी वेगळे करण्याची जिद्द असते आणि अशा अभ्यासक्रमांना किंवा काहीतरी वेगळ्या तंत्रज्ञानातील क्षेत्रात कौशल्य मिळवले तर येणारा भविष्यकाळ विद्यार्थ्यांसाठी नक्कीच सुवर्ण संधी घेऊन येणारा असतो हे नक्की.

Updated on 14 September, 2022 3:32 PM IST

नोकरी किंवा बऱ्याचशा उद्योगधंद्यांमध्ये विविध कौशल्य असणार्‍या उमेदवारांची नितांत आवश्यकता भासते. अशी बऱ्याच प्रकारची क्षेत्रे आहेत की त्या ठिकाणी अजून देखील पुरेशा कुशल मनुष्यबळाची कमतरता भासते. बरेच विद्यार्थी इंजीनियरिंग, मेडिकल या विद्याशाखांकडे खूप मोठ्या प्रमाणात जातात.

परंतु या रुळलेल्या शाखांकडे न जाता काही तरी वेगळे करण्याची जिद्द असते आणि अशा अभ्यासक्रमांना किंवा काहीतरी वेगळ्या तंत्रज्ञानातील क्षेत्रात कौशल्य मिळवले तर येणारा भविष्यकाळ विद्यार्थ्यांसाठी नक्कीच सुवर्ण संधी घेऊन येणारा असतो हे नक्की.

नक्की वाचा:BSF Bharti 2022: दहावी आणि आयटीआय पास उमेदवारांना बीएसएफ मध्ये सुवर्णसंधी, वाचा माहिती

असेच एक क्षेत्र आहे ते म्हणजे पर्यावरण संरक्षण आणि त्यामधील विविध प्रकारचे संशोधन हे होय. या क्षेत्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांना आवड आहे त्यांच्यासाठी येणारे पाच वर्षात खूप मोठ्या संधी चालून येतील. या क्षेत्राला एअर कॉलीटी मॅनेजमेंट असे देखील म्हणतात.

 एअर क्वलिटी मॅनेजमेंट म्हणजे नेमके काय?

 आपल्याला माहित आहेच कि प्रदूषणाची समस्या खूप मोठ्या प्रमाणात भेडसावत असून त्यातल्या त्यात जागतिक पातळीवर वायुप्रदूषण खूप वेगाने वाढत आहे. वायु प्रदूषण कमी करण्यासाठी शासकीय स्तरावर विविध प्रकारचे प्रयत्न केले जातात किंवा करण्यात येत आहेत.

परंतु या क्षेत्रांमध्ये कुशल व्यक्तींची संख्या खूपच कमी असल्यामुळे या क्षेत्रात येणाऱ्या काळात खूप मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळाची मागणी वाढणार असूनही एक चांगली संधी आहे.

जर आपण एकंदरीत भारताचा विचार केला तर अमेरिकेतील हेल्थ इफेक्ट इन्स्टिट्यूट या संस्थेच्या अहवालात असे म्हटले आहे की भारतात येणाऱ्या पाच वर्षात एअर क्वलिटी मॅनेजमेण्ट क्षेत्रात दहा लाख मनुष्यबळाची गरज असेल व जवळजवळ पन्नास हजार नोकऱ्या यामध्ये उपलब्ध होते.

नक्की वाचा:Education: बारावीनंतर बि.होक पदवी म्हणजे करिअर मधील नामी संधी,वाचा याबद्दल माहिती

वायु प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी करण्यात येत असलेली नियोजन तसेच वायू प्रदूषण कमी करण्यासाठी खाजगी व सरकारी विभागात मोठ्या संख्येत नोकऱ्यांच्या संधी निर्माण होईल. या संधी प्रामुख्याने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच स्थानिक स्वराज्य संस्था, वायु प्रदूषण नियंत्रित करणाऱ्या संस्था तसेच शासकीय विभाग, खाजगी संस्था तसेच मंत्रालय इत्यादी ठिकाणी उपलब्ध होतील.

या अहवालाचा विचार केला तर देशात जवळजवळ दोन लाख आठ हजार संस्थांना व उद्योगांना एअर क्वलिटी मॅनेजमेंट संबंधित क्षेत्रात पारंगत असलेल्या उमेदवारांची गरज आहे. एवढेच नाही तर वायु प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी जवळ  प्रकारच्या नोकऱ्यांसाठी पात्र उमेदवारांची गरज असेल. त्यामुळे या क्षेत्रामध्ये भरपूर संधी असून त्यातली या दृष्टिकोनातून तयारी करणे खूप गरजेचे आहे.

नक्की वाचा:For Student: बारावी सायन्सनंतर 'हे' पदवी कोर्स म्हणजेच भविष्यामध्ये करिअरची उत्तम संधी,वाचा सविस्तर यादी

English Summary: so many job apportunitys in air quality management sector in upcoming few years
Published on: 14 September 2022, 03:32 IST