Education

मुंबई- देशभरातील 10 लाखांहून अधिक विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला प्रविष्ट होतात. उच्चपदस्थ अधिकारी होण्याची संधी अजमाविताना कष्टासोबत नियोजनपूर्वक अभ्यासाची आखणी महत्वाची ठरते.

Updated on 13 October, 2021 11:25 AM IST

मुंबई- देशभरातील 10 लाखांहून अधिक विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला प्रविष्ट होतात. उच्चपदस्थ अधिकारी होण्याची संधी अजमाविताना कष्टासोबत नियोजनपूर्वक अभ्यासाची आखणी महत्वाची ठरते.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत संपूर्ण देशातून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याची किमया साधलेल्या शुभम कुमारने पेनाच्या निवडीपासून थेट मुलाखतीच्या तयारीपर्यंत कृषीजागरणशी बोलताना यशाचा ‘खास’ मार्ग सांगितला आहे.

जाणून घेऊया यशवंताच्या नजरेतून यूपीएससीचे अभ्यास शिखर कसे सर करावे:

1. प्रयत्नांवर श्रद्धा हवी:

यशाचा मार्ग प्रशस्त असला तरी अपयशाचे थांबे लागू शकतात. शुभमला यशापर्यंत पोहचण्यासाठी तीन संधी अजमाव्या लागल्या होत्या. तयारी ते निवड या संपूर्ण प्रक्रियेत आपल्या प्रयत्नांवरील श्रद्धा अत्यंत महत्वाची असल्याचे शुभमने म्हटले आहे.

2. सराव अर्थातच ‘नेट प्रॅक्टिस’

परीक्षेला सामोरे जाताना परिपूर्ण सराव असल्यास यशाचा मार्ग सुकर होतो हे शुभमने जाणले आहे. दिवसाला प्रत्येक विषयाची एक प्रश्नपत्रिका सोडविण्याचा नित्यक्रम शुभमने आखून घेतला होता. मित्रांसोबत गट बनवून प्रश्नांची देवाणघेवाण देखील केली जात असे.

3. ग्रामीण हीच ताकद

स्पर्धा परिक्षेत यश मिळविण्यासाठी आर्थिक पार्श्वभूमी, शहरी किंवा ग्रामीण यापेक्षा इच्छाशक्ती महत्वाची ठरते. ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रबळ इच्छाशक्ती बाळगल्यास यश हमखास पदरात पडेल असे शुभम याने म्हटले आहे.

तंत्रज्ञानाच्या जगात अभ्यास साहित्य एका क्लिकवर उपलब्ध होते. शुभमने महत्वाचे अभ्यास साहित्य वगळता अन्य अभ्यास ऑनलाईन माध्यमातूनच पूर्ण केला.

4. सकारात्मतेचे टॉनिक

अभ्यास करताना सकारात्मक राहण्याचा सल्ला शुभमने दिला आहे. सकारात्मक विचारांना बळ देणारे मित्र तसेच कुटुंबाच्या संपर्कात राहिल्यामुळे आपल्या अभ्यासाला गती मिळते असे शुभम याने म्हटले आहे.

5. सोशल मीडिया

सोशल मीडियापासून दूर राहण्याचा सल्ला शुभम याने दिला आहे. सोशल मीडियाच्या अतिरेकी वापरामुळे ध्येयापासून परावृत्त होऊ शकतो. परीक्षांची तयारी करताना वेळेचे व्यवस्थापन अत्यंत महत्वाचा भाग आहे.

6.

 सराव परीक्षा :

सराव परीक्षा अत्यंत महत्वाच्या असतात. तुमच्या अभ्यासाची तयारी जाणून घेण्यासाठी मॉक टेस्ट मोलाच्या ठरतात.  2019 प्रयत्नावेळी शुभमने किमान 75-70 आणि 2020 प्रयत्नावेळी 40-45 सराव परीक्षा दिल्या होत्या. सराव चाचण्यांमुळे अभ्यासातील अनेक बाबींचे आकलन करणे सोपे ठरते.

7. मुख्य परीक्षेचे चक्रव्यूह-

मुख्य परिक्षेसाठी लेखनाची गती हा अत्यंत महत्वाचा भाग ठरतो. प्रत्येक प्रश्नासाठी साधारण 10-11 मिनिटांचा कालावधी असतो. तुम्हाला लेखनासाठी सुलभ ठरू शकेल अशा पेनची निवड करावी. तुमचे उत्तर मुद्देसुद्द लिहिण्याचा प्रयत्न करावा. 

English Summary: shubham kumaar upsc toppers strategy of study
Published on: 13 October 2021, 11:25 IST