Education

नाशिक- कृषी शाखेच्या पदवी अभ्यासक्रमासाठी च्या प्रवेशासाठी पहिला कॅपराउंडची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता आज शनिवारी दिनांक अकरा रोजी रिक्त जागांचा तपशील जाहीर होऊन त्यानंतर 12 ते 14 डिसेंबर या दरम्यान कॅप राऊंड दोन साठी ऑप्शन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यातआली आहे.

Updated on 11 December, 2021 6:58 PM IST

 नाशिक- कृषी शाखेच्या पदवी अभ्यासक्रमासाठी च्या प्रवेशासाठी पहिला कॅपराउंडची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता आज शनिवारी दिनांक अकरा रोजी रिक्त जागांचा तपशील जाहीर होऊन त्यानंतर 12 ते 14 डिसेंबर या दरम्यान कॅप राऊंड दोन साठी ऑप्शन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यातआली आहे.

 यासंबंधी होणारा दुसरा कॅप राऊंड हा 12 ते 14 डिसेंबर यादरम्यान ऑप्शन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. 16 डिसेंबरला अलॉटमेंट जाहीर होऊन 17 ते 20 डिसेंबरया कालावधीत विद्यार्थ्यांना रिपोर्टिंग करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. या सगळ्या प्रोसेस नंतर संस्था स्तरावरील प्रवेश होतील. 29 डिसेंबर पर्यंत प्रवेशासाठी अंतिम कट ऑफ डेट देण्यात आली आहे. कृषी विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या महाविद्यालयांमध्ये बीएस्सी कृषी पदवी सह प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी कॅप राऊंड द्वारे विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जात आहे. 

पहिल्या व दुसऱ्या फेरीनंतर 20 डिसेंबरपासून ऑफलाइन वर्गही सुरू होतील.  महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांच्या संबंधित अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जातआहे.कृषी विद्यापीठांच्या संलग्न महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल.पहिल्या कॅप राऊंड साठी 9 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आले होते. 

त्यानंतर आता 18 डिसेंबरला रिक्त जागांचा तपशील प्रसिद्ध होणार असून त्यानंतर दुसरा कॅप राऊड होईल.महाविद्यालय स्तरावरील उपलब्ध जागांचाजागांची डिटेल्स 21 डिसेंबरला प्रसिद्ध झाल्यानंतरसंबंधित संस्था, महाविद्यालयाकडे व्यक्तिगत प्रवेशाचा अर्ज दाखल करण्यासाठी23 व 24 डिसेंबर ही मुदत असेल.25 डिसेंबरला निवड यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना 27 ते 29 डिसेंबरदरम्यान प्रवेश घ्यावा लागेल.( संदर्भ- दिव्य मराठी)

English Summary: second cap round of agri degree course from 12 december
Published on: 11 December 2021, 06:58 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)