Education

राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना १३ जून तर विदर्भातील शाळांना २८ जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. गेले वर्षभर शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. मध्यंतरी काही माध्यमिक शाळा ऑफलाइन सुरू करण्याचे प्रयत्न राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने केले होते, पण नंतर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ऑफलाइन वर्ग पुन्हा बंद झाले होते.

Updated on 01 May, 2021 11:07 PM IST

राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी शुक्रवारी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. यात असं स्पष्ट करण्यात आलं आहे की, 'शनिवार १ मे २०२१ पासून उन्हाळी सुट्टी लागू करण्यात आल्या आहेत. सुट्टीचा कालावधी १३ जून २०२१ पर्यंत ग्राह्य धरण्यात यावा. पुढील शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये सोमवार १४ जून २०२१ रोजी शाळा सुरू करण्यात याव्यात.

जून महिन्यातील विदर्भाचे तापमान पाहता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर सोमवार २८ जून २०२१ रोजी शाळा सुरू होतील.' शाळा जेव्हा सुरू होतील तेव्हा सध्याच्या करोना स्थितीच्या पार्श्वभूमीवर वर्ग ऑनलाइनच होणार आहेत. स्थानिक प्रशासनाने शाळांबाबच स्थानिक कोविड स्थितीनुसार निर्णय घ्यायचा आहे. दरम्यान, शाळांना सुट्टी जाहीर करावी अशी मागणी अनेक शिक्षक संघटनांनी केली होती. ही मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री व शिक्षण संचालकांकडे केली होती.

आमदार कपिल पाटील यांनीही पत्र लिहून ही मागणी केली होती. 'वडिलांच्या निधनाने दुःखात असूनही शिक्षणमंत्री यांनी तातडीने या प्रस्तावाला मान्यता दिली', अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली आहे.

English Summary: Schools announce summer vacation; Schools will be closed from May 1 to June 13
Published on: 01 May 2021, 11:07 IST