शाळेची कागदपत्रे म्हटली म्हणजे आपल्या जीवनातील अतिशय महत्त्वपूर्ण कागदपत्रे असतात. तुम्ही केलेल्या शिक्षणाचा पुरावाच ही कागदपत्रे असतात. याशिवाय तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या पुढील शिक्षणात अडचणी येऊ शकतात. पण जर ही महत्त्वाची कागदपत्र हरवले तर काय करावे? हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
परंतु आता जरी तुमच्या शैक्षणिक कागदपत्र हरवले तरी घाबरून जाण्याची गरज नाही. तुम्हाला ते आता एका क्लिकवर मिळू शकते. ते कसे याबाबत या लेखात माहिती घेऊ.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड आणि अर्थात सीबीएसई ने यावर उपाय शोधला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डने डुप्लिकेट एकेडमी डॉक्युमेंट्स सिस्टम अर्थात डीएडीएस ची सुरुवात केली आहे. या सीबीएसई बोर्डच्या प्लॅटफॉर्मचा वापर करून तुम्ही तुमच्या शैक्षणिक कागदपत्रे म्हणजे त्याच्या डुप्लिकेट कॉपी मिळवू शकतात.
अगोदर तर एखाद्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक कागदपत्र हरवले तर अशा विद्यार्थ्यांना संबंधित रीजनल ऑफिस मध्ये जाऊन एक फॉर्म भरून व काही फी भरून अर्ज करावा लागत होता. परंतु हा होणारा त्रास आता वाचणार आहे. या सिस्टम मुळे विद्यार्थ्यांना ही प्रक्रिया सोपी होणार आहे. हे सर्व काम घरबसल्या ऑनलाइन केले जाऊ शकेल.
काय आहे हा प्लॅटफॉर्म?
केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड डुप्लिकेट अकॅडमिक डॉक्युमेंट्स सिस्टीम मुळे विद्यार्थ्यांना होणारा मोठा त्रास कमी होणार आहे. त्यामुळे कागदपत्र हरवल्यावर जाणारा वेळ वाचणार आहे आणि होणारा मनस्ताप पासूनही सुटका मिळणार आहे.
या प्लॅटफॉर्मच्या मदतीने विद्यार्थ्यांना ऑनलाइन डुप्लिकेट मार्कशीट, पासिंग सर्टिफिकेट आणि मायग्रेशन सर्टिफिकेट देखील मिळवता येईल.
या सुविधेसाठी अर्ज कसा करावा?
सीबीएसई बोर्ड च्या या प्लॅटफॉर्मचा फायदा घेण्यासाठी https://cbse.in/cbse/web/dads/home.aspx या लिंक वर जावे लागेल. येथे अर्ज करण्याची पूर्ण प्रक्रिया करावी लागेल. तुमचा अर्ज रिजनल ऑफिस ला प्राप्त झाल्यानंतर रीजनल ऑफिस डुप्लिकेट पेपर प्रिंट करतील आणि स्पीड पोस्ट वर विद्यार्थ्यांना पाठवतील.
साभार -News18 लोकमत
Published on: 07 July 2021, 08:35 IST