नवसंशोधकांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य विभागाकडून 'पॉवर 2022' हा एक नावीन्यपूर्ण कार्यक्रम हाती घेतला असून तो राबविण्यात येत आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वतःचे स्टार्टअप सुरू करायचे असेल तर त्यासाठी लागणारे आवश्यक मार्गदर्शन व त्या सोबत पाच लाख रुपयांपर्यंतचे बीज भांडवल देखील मिळण्याची संधी उपलब्ध केली जाणार आहे.
काय आहे नेमका 'पॉवर-2022' कार्यक्रम
हा एक फ्री इनक्यूनेशन कार्यक्रम असून या माध्यमातून नव्या कल्पना, स्वतःचे स्टार्टअप सुरू करण्यासाठी नवसंशोधक तयार करणे, व्यावसायिक दृष्ट्या सक्षम करणे व व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या ज्या काही आवश्यक कायदेशीर बाबी आहेत यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यासाठी हा कार्यक्रम आखण्यात आला आहे.
नक्की वाचा:मातीची गुणवत्ता जपण्यासाठी नैसर्गिक शेतीचा अवलंब करणे गरजेचे:पंतप्रधान नरेंद्र मोदी
या कार्यक्रमाबाबत अधिक माहिती देताना इनोव्हेशन सेलच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर यांनी म्हटले की, जे स्टार्टअप प्राथमिक अवस्थेत आहेत, अशांना बऱ्याचदा मार्गदर्शनाची गरज भासते.
एवढेच नाही तर असे स्टार्टअप भविष्यात पुढे जाण्यासाठी त्यांना निधीची गरज असते. यासाठी 'पॉवर-2022' च्या माध्यमातून आम्ही या दोन्ही गोष्टी देणार आहोत.
तसाच एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी प्राथमिक आवश्यक माहिती तसेच कायदेशीर बाबी इत्यादी या कार्यक्रमात शिकायला मिळणार आहेत.
बिझनेस आयडिया: लक्षाधीश होण्यासाठी करा 'हा' व्यवसाय सुरु, आयुष्यात दरवळेल सुगंध
वाचा:बिझनेस आयडिया: लक्षाधीश होण्यासाठी करा 'हा' व्यवसाय सुरु, आयुष्यात दरवळेल सुगंध
यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून आय टू ई मधील स्पर्धकांना ही सहभागी होता येणार आहे.
या स्पर्धकांसाठी पाच हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. नव्याने नोंदणी करणाऱ्या साठी या कोर्सचे शुल्क दहा हजार असेल. जर कोणाला या साठी अर्ज करायचा असेल तर ते https://seedfund.startupindia.gov.in ह्या लिंक वर अर्ज करू शकतात.
Published on: 10 July 2022, 08:18 IST