तुम्ही बीएससी पदवीधारक आहात पण तुमच्याकडे नोकरी नाही तर ऑइल इंडिया लिमिटेड मध्ये नोकरीची सुवर्णसंधी तुमच्यासाठी चालून आली आहे. ऑल इंडिया लिमिटेड ने नुकतेच वार्डन आणि केमिकल असिस्टंट पदांच्या भरतीसाठी नुकतेच अर्ज मागवले आहेत.
या भरती अंतर्गत 28 पदांवर पात्र उमेदवारांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत.या लेखात आपण या भरती बद्दल सविस्तर माहिती घेऊ.
ऑल इंडिया लिमिटेड मध्ये नोकरीची संधी
ऑल इंडिया लिमिटेड अंतर्गत 28 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार असून यामध्ये वार्डन ( महिला)तीन जागा आणि केमिकल असिस्टंट च्या 25 जागांचा समावेश आहे. जे उमेदवार यासाठी पात्र आणि इच्छुक असतील अशा उमेदवारांनी ओईल इंडिया लिमिटेड च्या https://www.oil.india.com/या संकेतस्थळावर जाऊन आपला अर्ज करू शकतात
अर्ज करण्याची अंतिम मुदत
- ज्या उमेदवारांना वार्डन पदासाठी अर्ज करायचा आहे अशी उमेदवार 8 मार्च 2022 पर्यंत अर्ज करू शकतात.
- ज्या उमेदवारांना केमिकल असिस्टंट पदासाठी अर्ज करायचा आहे असे उमेदवार 15 मार्च 2012 पर्यंत अर्ज करू शकतात.
या भरतीबद्दल महत्त्वाच्या तारखा
- केमिकल असिस्टंट पदासाठी नोंदणीची तारीख 15 मार्च 2022 असून वेळ सकाळी सात ते सकाळी अकरा पर्यंत आहे
- वार्डन( महिला ) पदासाठी अर्ज करायचा असेल नोंदणीची तारीख 8 मार्च 2022 पासून वेळ सकाळी सात ते सकाळी 11 पर्यंत आहे.
या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता
- वार्डन( महिला ) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी होम सायन्स मध्ये बीएस्सी पदवी किंवा हाउसकीपिंग किंवाकेटरिंग मध्ये डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
- च्या उमेदवारांना केमिकल असिस्टंट पदासाठी अर्ज करायचा आहे असे उमेदवार बीएससी ( रसायन शास्त्र ) विषयात पदवीधारक असणे आवश्यक आहे.
Published on: 06 March 2022, 09:52 IST