Education

एमकेसीएल हे नाव माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रेसर असून संगणक साक्षरता मध्ये खूप महत्त्वाचे काम एमकेसीएल ने केलेले आहे.

Updated on 08 June, 2022 2:08 PM IST

 एमकेसीएल हे नाव माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रेसर असून संगणक साक्षरता मध्ये खूप महत्त्वाचे काम एमकेसीएल ने केलेले आहे.

 जर आपण आजवरचा संगणक साक्षरतेचा विचार केला तर दीड कोटीपेक्षा जास्त लोकांना एमकेसीएलने संगणक साक्षर बनवले आहे. आता नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एमकेसीएल मार्फत एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे, एमकेसीएल मध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर( प्रोजेक्ट ट्रेनि) या पदासाठी भरती प्रक्रियेची सुरुवात करण्यात आली असून

ज्या उमेदवारांना या भरती प्रक्रियेचा लाभ घ्यायचा असेल अशा इच्छुक उमेदवारांनी एमकेसीएलच्या https//:mkcl.org/careers या संकेतस्थळावर भरती प्रक्रियेचे संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यात आली असून या पदासाठी फक्त फ्रेशर्स म्हणजेच 2022 मधील आवश्यक अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज मान्य केले जाणार असल्याचे एमकेसीएलने म्हटले आहे.

नक्की वाचा:Job Alert: मुंबई मेट्रो मध्ये जॉब करण्याची सुवर्णसंधी! 2 लाख रुपये मिळणार पगार; वाचा याविषयी

 एकंदरीत निवड पद्धत

 या भरतीचे अर्ज करण्याची शेवटची मुदत ही 22 जून 2022 असून पहिल्या टप्प्याचे ऑनलाइन प्रवेश परीक्षाही रविवार दिनांक 26 जून 2022रोजी सकाळी 11 ते साडेबारा या वेळेत घेतली जाणार आहे.सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही परीक्षा घेण्यात येणार आहेत

ती कुठल्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल याच्या मार्गदर्शन करणाऱ्या लिंक्स एमकेसीएलच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या पदासाठी पहिल्या टप्प्यात जे उमेदवार यशस्वी होतील, पुढील दोन टप्प्यांमध्ये प्रॅक्टिकल एक्झाम द्यावी लागणार आहे.या सगळ्या टप्प्यांमधून ज्या उमेदवारांची निवड होईल अशा उमेदवारांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाणार असून

त्यानंतर ते एमकेसीएल मध्ये संबंधित तंत्रज्ञानात काम करायची संधी निवड झालेल्या उमेदवारांना मिळणार आहे. मागच्या वर्षी देखील एमकेसीएल मे संपूर्ण भारतातून या पदासाठी अर्ज मागवले होते तेव्हा जवळजवळ 21 हजार विद्यार्थ्यांनी या पदासाठी अर्ज केले होते.

नक्की वाचा:कमवा आणि शिका' अंतर्गत टाटा मोटर्स मध्ये सुवर्णसंधी! बारावी पास असाल तर करा संधीचे सोने

नक्की वाचा:Student term loan: उच्च रोजगारभिमुख अभ्यासक्रमांसाठी एसबीआय देईल दीड कोटीपर्यंत शैक्षणिक कर्ज

English Summary: recruitment in maharashtra knowledge corporation for software developer
Published on: 08 June 2022, 02:08 IST