महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीच्या माध्यमातून येणारा दोन महिन्याच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या अंतर्गत वेगवेगळ्या संवर्गातील तब्बल 961 रिक्त पदांसाठी मेगा भरती केली जाणार असून जे विद्यार्थी भरती पडण्याची चातकासारखी वाट पाहत होते त्यांच्यासाठी ही चांगली बातमी आहे. या लेखात आपणया भरती प्रक्रिये विषयी थोडक्यात जाणून घेऊ.
या भरती विषयी माहिती
एकूण 961 जागा आहेत त्यापैकी 161 पदांच्या भरती करिता येणाऱ्या 21 ऑगस्टला म्हणजेच रविवारी राज्यसेवेची(2022) पूर्व परीक्षा ही राज्यातील 37 जिल्हा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. व या प्रेलिमस अर्थात पूर्वपरीक्षेत जे उमेदवार पात्र ठरतील अशा उमेदवारांची मुख्य परीक्षा 21 ते 23 जानेवारी 2023 यादरम्यान होईल.
आगामी काळात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या विविध विभागांतर्गत विविध संवर्गातील एकूण 800 पदांची भरती होणार असून त्यासाठी आयोगातर्फे महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 येत्या 8 ऑक्टोबर रोजी घेतली जाणार असून महत्त्वाचे म्हणजे दुय्यम निबंधक व मुद्रांक निरीक्षक हे पद प्रथमच एमपीएससी द्वारे आता भरले जाणार आहे.
पूर्वपरीक्षेचा निकालाचा आधार घेऊन मेन एक्झाम अर्थात मुख्य परीक्षेसाठी जे उमेदवार पात्र ठरतील अशा करीता मुख्य परीक्षा डिसेंबर 2022 नंतर होईल.
दुय्यम सेवा अराजपत्रित,गट ब संयुक्त पूर्व परीक्षेतील संवर्ग आणि एकूण पदे-2022
1- सहाय्यक कक्ष अधिकारी गट ब- एकूण 42 पदे
2- राज्य कर निरीक्षक- एकूण 77 पदे
3- पोलीस उपनिरीक्षक- 603 पदे
4- दुय्यम निबंधक व मुद्रांक निरीक्षक- 78 पदे
अशी एकूण आठशे पदे आहेत
Published on: 19 August 2022, 11:36 IST