यवतमाळ| यवतमाळ जिल्ह्यातील दहावी पास व आयटीआय झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. जिल्ह्यात महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड अर्थात एमएसईबी अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदासाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात वीजतंत्री या पदासाठी शिकाऊ उमेदवारांची भरती प्रक्रिया पार पडणार आहे.
जिल्ह्यात एकूण 24 पदांची भरती होणार आहे यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2022 ठेवण्यात आली आहे, त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करणे अपरिहार्य राहणार आहे.
पदाचे नाव:- विजतंत्री (शिकाऊ उमेदवार)
एकूण पदे:- 24 पदे
शैक्षणिक अहर्ता:- दहावी पास तसेच आयटीआय अनिवार्य (अधिक माहितीसाठी जाहिरात बघणे)
वय:- 18 ते 38 या दरम्यान असलेले उमेदवार
नौकरीचे ठिकाण:- यवतमाळ जिल्हा
अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
अर्जाचा अंतिम दिवस:- 21 मार्च 2022
अर्ज पाठवणार कुठं:- कार्यकारी अभियंता कार्यालय, आउदा संवयू विभाग,उद्योग भवन, चौथा मजला, दारव्हा रोड यवतमाळ
अर्जाची प्रत पाठवण्याची लास्ट डेट:- 23 मार्च
आवश्यक कागदपत्रे
दहावीचे मार्कशीट, आयटीआय वीजतंत्री मार्कशीट,आधार कार्ड, जात प्रमाणपत्र/ कास्ट व्हॅलेडीटी सर्टिफिकेट, वय व अधिवास प्रमाणपत्र, नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट इत्यादी.
अधिकृत संकेतस्थळ:-महापारेषन
अधिकृत जाहिरात:- यवतमाळ जाहिरात
(माहिती स्रोत:- लोकशाही)
Published on: 10 March 2022, 12:17 IST