Education

पॉलिटेक्निकच्या डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी ची प्रवेश प्रक्रिया 30 जून पासून सुरू करण्यात आली आहे. याबाबतीतली सगळ्या प्रकारची प्रक्रिया जसे की ऑनलाईन अर्ज भरणे, कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती अपलोड करणे, त्यासह डॉक्यूमेंट पडताळणी आणि अर्ज निश्चिती यासाठी ची मुदत 23 जुलै पर्यंतची आहे. तर तात्पुरती गुणवत्ता यादी 26 जुलै रोजी जाहीर केली जाणार आहे. इंजिनिअरिंग डिप्लोमा साठीचे अभ्यासक्रमाचे 2021 22 या शैक्षणिक वर्षासाठी चे प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयने मंगळवारी जाहीर केले.

Updated on 02 July, 2021 6:54 PM IST

 पॉलिटेक्निकच्या डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी ची प्रवेश प्रक्रिया 30 जून पासून सुरू करण्यात आली आहे.  याबाबतीतली सगळ्या प्रकारची प्रक्रिया जसे की ऑनलाईन अर्ज भरणे, कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती अपलोड करणे, त्यासह  डॉक्यूमेंट पडताळणी आणि अर्ज निश्चिती यासाठी ची मुदत 23 जुलै पर्यंतची  आहे. तर तात्पुरती गुणवत्ता यादी 26 जुलै रोजी जाहीर केली जाणार आहे. इंजिनिअरिंग डिप्लोमा साठीचे अभ्यासक्रमाचे 2021 22 या शैक्षणिक वर्षासाठी चे प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयने मंगळवारी जाहीर केले.

 दहावीच्या निकालाची वाट न पाहता पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दहावीचा निकाल अजून लागला नसल्याने पॉलिटेक्निक साठी चा अर्ज भरताना त्यामध्ये विद्यार्थ्यांकडे मार्कशीट नसल्यामुळे संबंधित अर्जात विद्यार्थ्यांना त्यांचा बैठक क्रमांक नोंद करायचा आहे यासंबंधीची ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरू होणार आहे त्यासाठीची अंतिम मुदत ही 23 जुलै पर्यंत असणार आहे.

 कागदपत्र तपासणी साठी विद्यार्थ्यांना दोन प्रकारचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना सर्व सुविधा केंद्रात येऊन कागदपत्रांची प्रत्यक्ष छाननी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. टाईम टेबल नुसार अर्ज भरणे, डॉक्युमेंट तपासणी, अर्ज निश्चिती आणि अंतिम गुणवत्ता यादी ही सर्व प्रक्रिया 30 दिवसांचे असणार आहे.

 प्रवेश प्रक्रिया संबंधीच्या हेल्पलाइन साईट

 विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया संबंधित काही समस्या असतील तर त्यांनी 8698742360,8698781669 या क्रमांकावर सकाळी दहा ते संध्याकाळी सहा पर्यंत संपर्क साधावा किंवा https://poly21.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊ शकता.

 या प्रक्रियेसंबंधी चे वेळापत्रक

  • कागदपत्र पडताळणी आणि अर्ज निश्चिती – 30 जून ते 23 जुलै दरम्यान
  • तात्पुरती गुणवत्ता यादी – 26 जुलै
  • गुणवत्ता यादीवरील अक्षेप – 27 ते 29 जुलै दरम्यान
  • अंतिम गुणवत्ता यादी 31 जुलै

 

 

 

 

 प्रवेश प्रक्रिये संबंधी काही महत्वाच्या गोष्टी

  • ई अर्ज किंवा प्रत्यक्ष अर्ज पडताळणी चा पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांना निश्चित कालावधीत अर्ज प्रक्रिया आणि पात्रता पूर्ण केले नाही तर विद्यार्थ्यांना कॅप प्रवेश प्रक्रियेत अर्ज करता येणार नाही.
  • रिझर्व कॅटेगरीतील उमेदवाराने 31 मार्च 2022 पर्यंत वैध  असलेले नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक
  • राज्य शिक्षण मंडळातील विद्यार्थ्यांनी अर्ज करताना आपला परीक्षेतील बैठक क्रमांक भरावा. तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर शाळेतून उपलब्ध होईल.
  • तुमचा बैठक क्रमांक टाकल्यानंतर या परीक्षेत प्राप्त गुण थेट  मंडळाकडून घेऊन ते अपडेट केले जातील.
  • निकालामध्ये जर ग्रेड  असेल तर समकक्ष गुणांमध्ये रूपांतर करून प्रमाण पत्र सादर करावे.
  • सीबीएसई, आयसीएसई मंडळाच्या विद्यार्थ्यांना निकाल जाहीर झाल्यानंतर अर्ज  पूर्ण करावे लागणार आहे.

 

साभार – महाराष्ट्र टाइम्स ( मटा )

 

English Summary: polytechnic admission
Published on: 02 July 2021, 06:54 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)